Maharashtra News LIVE: लासलगावात दीड महिन्यानंतर दमदार पावसाची हजेरी
Maharashtra News LIVE: ठाण्यात डीजेवर बंदी घालण्यात आली आहे, तरी ध्वनिप्रदूषण कायम मात्र कायम आहे. तर अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आलेल्या नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची मोठी गर्दी झाली. यासह राज्य, देश-विदेशातील, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES
-
भीमाशंकर साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ
भीमाशंकर साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ झाला आहे. भाग विकास निधी कपात आणि कारखान्याच्या शिक्षण संस्थेला शैक्षणिक निधी कपातीच्या विषयाला मान्यता देण्याच्या मुद्द्यावरून गोंधळ झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम आणि शिंदे शिवसेनेचे अरुण गिरे यांनी भाग विकास निधी आणि शैक्षणिक निधी कपातीला विरोध केला आहे.
-
लासलगावात दीड महिन्यानंतर दमदार पावसाची हजेरी
लासलगावात दीड महिन्यानंतर दमदार पावसाने हजेरी दाखवली आहे. १५ ते २० मिनिटे झालेल्या या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून दिलासा आहे. मका, सोयाबीन, बाजरी, भेंडीसह खरीप पिकांना पावसामुळे मोठा आधार मिळाला आहे. पावसाअभावी करपू लागलेल्या पिकांना पावसाच्या हजेरीने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
-
-
मतदानावरुन तरुणाला मारहाण, पाच जणांविरोधात गुन्हे दाखल
अशोक चव्हाण या युवकाला जिल्हा परिषदेच्या सदस्याचे पती सुनील देशमुख यांच्यासह पाच जणांनी मारहाण केल्याची तक्रार दाखल झाली आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या अशोक चव्हाण यांच्यावर धाराशिव शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सुनील देशमुख यांच्यासह पाच जणांविरुद्ध धाराशिव येथील वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
-
परभणीच्या टाकळी शिवारात रोहित पवार यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी
परभणीच्या टाकळी शिवारात रोहित पवार यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली आहे. कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी50हजार तर शेतमजूरांना 25हजार मदत दया अशी मागणी यावेळी रोहित पवार यांनी केली आहे. 90 टक्के शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळाली नाही ,त्यांना 10दिवसात मदत मिळेल यासाठी प्रयत्न करावेत, असंही यावेळी रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
-
गंगापूर रोड दुभाजकावरील झाडे तोडल्याप्रकरणी ६ जणांना न्यायालयी कोठडी
गंगापूर रोड दुभाजकावरील झाडे तोडल्याप्रकरणी ६ जणांना न्यायालयी कोठडी
नाशिक सत्र न्यायालयात आरोपींना करण्यात आले होते हजर
नम्रता अॅडव्हर्टायझिंगचे संचालक मच्छिंद्र देशमुख यांच्यासह सहा जणांवर कारवाई
अभिमन खैरनार, दिलीप बेंडकुळे, दीपक दाते यांचा अटकेतील आरोपींमध्ये समावेश
रोहिदास खुरखुटे, अर्जुन चारोस्कर यांच्यावरही कारवाई
जाहिराती दिसाव्यात म्हणून रात्रीतून झाडांची कत्तल केल्याचा आरोप
दुभाजकावरील ५० हून अधिक झाडे तोडल्याची तक्रार
गंगापूर पोलिसांची मोठी कारवाई
-
-
गडचिरोली – अवैधपणे जुगार खेळणाऱ्या 26 आरोपींवर गडचिरोली पोलिसांची कारवाई
गडचिरोली जिल्ह्यात अवैधपणे जुगार खेळणाऱ्या 26 आरोपींवर गडचिरोली पोलिसांनी कारवाई केली 22 चारचाकी व 6 दुचाकी व 26मोबाईल फोन सह एक कोटी 34 लाख 14 हजार रुपयाची रोकड जप्त करण्यात आली.
बेळगाव पोलीस उप मदत केंद्र अंतर्गत गहाणेपाडा जंगल परिसरात अवैधरित्या मोठ्या प्रमाणात जुगार सुरू असल्याची माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली. याआधारे जंगल भागात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून मोठ्या प्रमाणात चार चाकी व दुचाकी वाहनांसह रोख रक्कम जप्त केली.
-
MPSC पेपर लीक प्रकरण, सर्व आरोपींना 5 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी
MPSC पेपर लीक प्रकरण, सर्व आरोपींना 5 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज फक्त ऋतुजा पाटील कोर्टात हजर होती, बाकी आरोपी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होते. आत्तापर्यंत कोणत्याही आरोपीने जामीनासाठी अर्ज केलेला नाही.
-
लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावा – भाजप नेते रावसाहेब दानवे
आमची सार्वत्रिकरित्या आमच्यात सरकारला अशी आग्रहाची विनंती आहे की लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावा – असं विधान भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. तर तुम्ही चित्रीकरण करून लोकांना दाखवता आणि आमची बदनामी करता, असा मिशकिल टोला रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांसमोर लगावला
-
मिरा रोड – कबुतरखाने बंद ठेवण्याच्या निर्णयाला मराठी एकीकरण समितीचा पाठिंबा
मिरा रोड – नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कबुतरखाने बंद ठेवण्याच्या शासनाच्या निर्णयाला मराठी एकीकरण समितीने पाठिंबा दर्शवला आहे. कबुतरांना मोठ्या प्रमाणात दाणे टाकल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असून, कबुतरखाने बंद ठेवण्याऐवजी त्याठिकाणी कठोर नियमांची अंमलबजावणी करावी, अशी भूमिका समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी व्यक्त केली. निलेशचंद्र यांच्या भूमिकेवर टीका करण्यात आली.
-
उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी
गेल्या काही दिवसांपासून या भागात पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके कोमेजू लागली होती. त्यातच विहिरींची पाणीपातळी झपाट्याने खालावत असल्याने शेतीसाठी पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात उष्णता जाणवत होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा पावसाकडे लागल्या होत्या. अखेर आज दुपारी आकाशात ढगांची गर्दी होऊन अनेक भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे कोमेजू लागलेल्या खरीप पिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
-
नाशिक : डॉ. मनीषा जेजुरकर आत्महत्या प्रकरण – डॉ. स्वाती चव्हाणला 22 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
नाशिक : आयुर्वेद तज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर आत्महत्या प्रकरणी डॉ. स्वाती चव्हाणला 22 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. ‘तुझ्या नवऱ्याला तू आवडत नाही, तुझं शिक्षण चांगलं नाहीये’ असं डॉ स्वातीने डॉ मनीषाला म्हटलं होतं असं तपासाता समोर आली आहे. डॉ. निलेश जेजुरकरने डॉ. स्वातीसोबत प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर पोलीस तपासाला वेग आला आहे.
-
जालन्यात करपलेली पिके डोक्यावर घेत शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक
जालना जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला आहे,यावेळी काजू बदाम खाणाऱ्या लोकप्रतिनिधींचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली शिवाय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काही बदाम देखील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात फेकून सरकारचा निषेध व्यक्त केलाय,तर काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील करपलेली सोयाबीनची पिके डोक्यावर आणल्याच पाहायला मिळालं, दरम्यान येत्या आठ दिवसाच्या आत दुष्काळ जाहीर केला नाही तर कृषीमंत्र्याच्या घरावर मोठा मोर्चा काढू असा थेट इशारा पदाधिकाऱ्यांनी दिलाय
-
सुकलेला सोयाबीन, दुपट्टा देत अमरावतीच्या मोर्शीत शेतकऱ्यांचं प्रतिकात्मक आंदोलन
सुकलेला सोयाबीन, दुपट्टा देत अमरावतीच्या मोर्शीत शेतकऱ्यांचं प्रतिकात्मक आंदोलन. दुष्काळाचे कोणतेही निकष न लावता सरसकट दुष्काळ घोषित करावा, शेतकऱ्यांची मोर्शीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मागणी….
-
कष्टाने उभे केलेले धानपीक रोगांच्या विळख्यात; भंडारा जिल्ह्यातील बळीराजा चिंतेत
भंडारा जिल्ह्यात दीड महिन्याच्या ढगाळ व दमट हवामानामुळे शेकडो हेक्टरवरील धानपीक करपा आणि खोडकिड्याच्या विळख्यात सापडले आहे. एकट्या मोहाडी तालुक्यात ३३ हजार ७०७ हेक्टर धान पिकाचे क्षेत्र असून, त्यापैकी सुमारे १० ते १५ टक्के धान पीक बाधित झाल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. वाढता उत्पादन खर्च, मजुरी आणि औषध फवारणीचा अतिरिक्त भार यामुळे बळीराजा आर्थिक अडचणीत सापडला असून, पीक कसे वाचवायचे या विवंचनेत शेतकरी आहेत. शासनाने त्वरित शेतीच्या पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी आता शेतकरी करत आहेत.
-
मिरज सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रवेशद्वार काम सुरु असताना दुर्घटना
सांगली-मिरज सिव्हिल हॉस्पिटलच्या नूतन प्रवेशद्वार काम सुरु असताना दुर्घटना. प्रवेशद्वाराचं काम सुरु असताना स्लॅब कोसळला. स्लॅब कोसळून 6 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती.
-
मुंबईत प्रवीण दरेकरांच्या ताफ्यातील गाडीला अपघात
मुंबईत प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
-
आठ दिवसांच्या आत दुष्काळ जाहीर करा अन्यथा..; जालन्यात शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा इशारा
जालना जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला आहे. यावेळी काजू बदाम खाणाऱ्या लोकप्रतिनिधींचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. शिवाय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काही बदाम देखील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात फेकून सरकारचा निषेध व्यक्त केला. तर काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील करपलेली सोयाबीनची पिकं डोक्यावर आणल्याच पाहायला मिळालं. दरम्यान येत्या आठ दिवसांच्या आत दुष्काळ जाहीर केला नाही तर कृषीमंत्र्याच्या घरावर मोठा मोर्चा काढू असा थेट इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
-
कोरडा दुष्काळ जाहीर करा, काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांची मागणी
कोरडा दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी केली आहे. सरकारने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत केली तर संपूर्ण महाराष्ट्रभर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी दिवे लावले त्याप्रमाणे दिवे लावून आनंद उत्सव साजरा करू, असं ते पुढे म्हणाले.
-
तुळजापूरमध्ये काँग्रेसच्या मोर्चात शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं
तुळजापूरमध्ये काँग्रेसच्या मोर्चात शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं. दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यानी अंगावर पेट्रोल ओतून घेतलं. दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा तुळजापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चादरम्यान एका शेतकऱ्याने मागण्या मान्य होत नसल्याच्या निषेधार्थ तहसील कार्यालयाच्या आवारात स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेतलं.
-
विनोद आडे यांचं 16व्या दिवशीदेखील बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण द्या, या मागणीसाठी उपोषण सुरू
परभणीच्या जिंतूर शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात विनोद आडे यांचं 16व्या दिवशी देखील बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण द्या, या मागणीसाठी उपोषण सुरू आहे. सोळाव्या दिवशी विनोद आडे यांची तब्येत खालावल्याने बंजारा समाज आक्रमक झाला आहे. बंजारा समाजाकडून जिंतूर जालना हायवेवर ठिय्या आंदोलन सुरू आहे.
-
चाळीसगाव तालुक्यात दुष्काळसदृश्य स्थिती; उभी पिके जळाली, शेतकरी मोठ्या संकटात
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हातगाव शिवारासह परिसरातील खरीप पिकांना मोठा फटका बसला असून, शेतातील उभी बाजरी आणि कपाशीची पिके करपली आहेत. बाजरी दाणे भरण्यापूर्वीच जळून गेल्याने ती चाऱ्यासारखी झाली आहे, तर कपाशीला बोंडेच न लागल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने दिवाळीही अंधारात जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
-
पुण्यात रोहित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर
पुण्यात रोहित पवार यांचे भावी मुख्यमंत्री अश्या आशयाचे बॅनर लागले , कार्यकर्ते प्रेमापोटी आणि नेत्याला चांगल वाटावं म्हणून असे बॅनर लावत असतील पण हे योग्य नाही अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली.. आम्ही विरोधात आहोत , लोकांमध्ये जाऊन आम्ही लोकांच्या अडचणी सोडण्याच आम्ही काम करत आहोत .. एकाद्या कार्यकर्त्याने बॅनर लावला तर त्याची इतकी चर्चा होणे योग्य नाही .. आताचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी दुष्काळ लवकर जाहीर करावा, शेतकऱ्यांना मदत करावी, शेतकऱ्यांची मुलं जी स्पर्धा परीक्षा देत आहेत त्यांच्या अडचणी सोडवाव्यात , लाडक्या बहीण योजनेतून महिलांची नावं कमी केलीत ती परत घ्या अस रोहित पवार म्हणाले ..
-
संतोष पंडित यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची गरज नव्हती- रवींद्र धंगेकर
संतोष पंडित यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची गरज नव्हती. संतोष पंडित यांना माझे समर्थन आहे. पोलीस नेमकं कुणासाठी काम करत आहेत?कलियुगाची सुरुवात आता कोथरूडपासून झाली आहे. दादा प्रतिष्ठानच्या माध्यमातून धरून केले जात आहेत. हिटलरशाही आणि हुकूमशाही फारकाळ टिकणार नाही. एखाद्या गुंडा प्रमाणे संतोष पंडितला रात्री अटक केली. पुणे पोलिसांची भूमिका पारदर्शन नाही, शिवसेना नेते रवींद्र धंगेकर
-
सोलापुरात संभाजी ब्रिगेडच्या वतीने सरकार विरोधात निदर्शने
सरकारच्या मंत्र्यांच्या निषेधार्थ एका ताटात गाईचे शेण आणत आंदोलन. ‘सुकामेवा नको मंत्र्यांनो शेण खावा’ असं म्हणत संभाजी ब्रिगेड आक्रमक. जळून गेलेले पीक आंदोलन स्थळी आणत निदर्शने
-
सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत टंचाई आढावा बैठक
पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या उपस्थितीत ही बैठक पार पडतेय. सोलापूर जिल्ह्यात एकूण 56 प्रकल्पात केवळ 2.88 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील खरीप पिकं पूर्णपणे करपून जाण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी हवालदिल झालाय. जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी विविध पक्षाकडून होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकारी बैठकीला उपस्थित असणार आहेत.
-
शासकीय भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी गठित केलेले उच्चस्तरीय समिती संभाजीनगरमध्ये
विद्यार्थ्यांशी संवाद साधून जाणून घेणार भरतीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे मत. छत्रपती संभाजीनगरच्या स्मार्ट सिटी कार्यालयात समितीची बैठक सुरू, मोठ्या संख्येने विद्यार्थी हजर.
-
अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण
अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डीजे, साऊंड, लाईट, जनरेटर असोसिएशनचं आमरण उपोषण सुरू. उपोषणाचा आज चौथा दिवस, एका उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली. मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही. ध्वनी मर्यादा आणि वेळेच्या नियमांचं पालन करून डीजेला परवानगी देण्याची मागणी. साऊंड यंत्रणेवरील सरसकट निर्बंध हटवून शुभकार्यासाठी पोलीस परवानगीची अट शिथिल करण्याची मागणी. मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा डीजे चालकांचा इशारा.
-
हिंगोलीत पाच एकर मधील सोयाबीन वाळून गेलं
हिंगोलीत पाच एकर मधील सोयाबीन वाळून गेले. मुलीचं लग्न कसं करायचं शेतकऱ्यांचे tv9 मराठीच्या कॅमेऱ्यासमोर अश्रू अनावर. पाच एकर सोयाबीन मध्ये शेतकऱ्यांनी बैल सोडले. माझ्याकडे 20 जनावरे आहेत. भविष्यात त्यांना चारा कुठून आणू शेतकऱ्यांचा सवाल.
-
परभणीत शेतकऱ्यांनी सोयाबीनची होळी करत केला सरकारचा निषेध
परभणी जिल्ह्यात मागील दीड महिन्यापासून पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभी असलेली पिकं वाळून गेलेली आहेत. सगळ्यात जास्त फटका हा सोयाबीनच्या पिकाला बसला असुन संपूर्ण पिकं उद्धस्त झालं आहे.ज्या सोयाबीनच्या भरोशावर शेतकरी दिवाळी साजरी करतात. तेच पीक उध्वस्त झाल्याने शेतकऱ्याने शेतात सोयाबीनची होळी करत सरकारचा निषेध केला. सरकारने बैठका न घेता तात्काळ शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
-
वडिलांनी गणेश विसर्जनाला जाऊ दिले नाही, 12 वर्षांच्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं
जळगावच्या चोपडा तालुक्यातील घुमावल गावात बारा वर्षाच्या विद्यार्थ्याने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जयेश संदीप पाटील असं मयत १२ वर्षीय मुलाचे नाव आहे. वडिलांनी गणपती विसर्जन मिरवणुकीत जाऊ दिले नाही म्हणून मुलाने संतापाच्या भरात गळफास घेतल्याची पोलिसांची माहिती आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
-
जालन्यात पहाटे भीषण आग, 5 दुकाने जळून खाक
जालन्यातील अंबडमध्ये पहाटेच्या सुमारास दुकानाला भीषण आग लागली आहे. तर यात 4 ते 5 दुकानात जळून खाक झाली आहेत. दुकानात झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आली आहे.
-
धुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट!
धुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झालं आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मका पिकातून उत्पन्न तर सोडाच, चाऱ्याचीही चिंता आहे. पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली जात आहे. धुळे जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
-
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मंत्री बावनकुळे यांनी प्रशासनाला दिला अलर्ट मोड
दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला अलर्ट मोड दिला आहे. शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज देण्याबाबत तसेच कर्जमाफी व पीक कर्जासंदर्भात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आज दिवसभर अमरावतीत बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांबाबत कोणतीही चालढकल करू नका, असा इशारा महसूल मंत्र्यांनी प्रशासनाला दिला आहे.
-
राहुल गांधींनी आता नरेंद्र मोदींना ‘पप्पू’ ठरवलं, संजय राऊतांचा टोला
राहुल गांधी यांना पप्पू ठरवण्यासाठी लाखो रुपये खर्च केले. परंतु राहुल गांधी आता देशाचे नेते आहेत. आता नरेंद्र मोदी पप्पू झाले, अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली. राहुल गांधींनी मारलेला बाण भाजपच्या काळजात घुसला आहे, अशी टीका राऊतांनी केली.
-
खासदार भास्कर भगरेंच्या घरी गणेशोत्सवानिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक संघर्षाचा देखावा
खासदार भास्कर भगरे यांच्या घरी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक संघर्षाचा देखावा साकारण्यात आला आहे. पल्लवी भगरे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित देखावा साकरला आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित मालिकेतील दुर्गा देशमुखची भूमिका साकारणारी बालकलाकार गार्गी आहेरने देखाव्याला भेट दिली. गार्गी आहेरने गणरायाची आरती करत सावित्रीबाई फुले यांच्या देखाव्याचे दर्शन घेतले.हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. देखाव्यातील शैक्षणिक साहित्य गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्याचा पल्लवी भगरे यांचा संकल्प आहे.
-
सिया गोयल आणि चेतन चौधरीच्या गुपचूप लग्नाचा फोटो समोर
केतन अग्रवाल खून प्रकरणाच्या तपासात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या कथित गुप्त विवाहाचा मुद्दा समोर आला आहे. राजस्थानमधील खाटूश्याम मंदिरात दोघांनी लग्न केल्याचा संशय पोलिसांना होता. मात्र, राजस्थानमध्ये चौकशी करूनही लग्नाची अधिकृत नोंद किंवा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
-
आदिवासी विकास विभाग ॲक्शन मोडवर
एका महिन्यात राज्यातील पाच लाख विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करणार. आदिवासी आश्रमशाळेत आणि खाजगी शाळेत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी सुरु आहे. १७ सप्टेंबर ते १७ ॲाक्टोबर या काळात सेवा सप्ताह आणि आरोग्य तपासणी होणार असे आदिवीसी विकास मंत्री अशोक उईके यांनी म्हटले आहे.
-
अमरावती जिल्ह्यातील तळेगाव ठाकूर मध्येही दुष्काळाची परिस्थिती
अमरावती जिल्ह्यातील तळेगाव ठाकूरमध्येही दुष्काळाची परिस्थिती. पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान. सरकारने कुठलीही अटी शर्ती न ठेवता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी.
-
गुलाबराव पाटील यांचे परतीच्या जोरदार पावसासाठी बाप्पाला साकडे
परतीचा पाऊस जोरदार पडावा असं साकडं मंत्री गुलाबराव पाटलांनी बापाला घातला आहे. जळगावातील एका सार्वजनिक गणेश मंडळात मंत्री गुलाबराव पाटलांचे हस्ते आरती झाली. त्यावेळी त्यांनी आता पाऊस पडूनही पीक येणार नाही. मात्र पिण्याच्या पाण्याची टंचाई होऊ नये म्हणून परतीचा पाऊस जोरदार व्हावा असे साकडं मंत्री गुलाबराव पाटलांनी घातले.
-
नाशिकरोड बसस्थानक आजपासून ३ राहणार महिने बंद
नाशिकरोड बसस्थानकात काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने बस स्थानक पुढील तीन महिने बंद राहणार आहे. २१ सप्टेंबर ते २० डिसेंबरपर्यंत बसस्थानक पूर्णपणे बंद राहणार. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सिटीलींक बससेवेच्या मार्गात आणि थांब्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
-
नांदेड – आमदार रोहित पवारांना परभणीच्या शेतकऱ्याने वाळलेली पीक आणून दाखवली
आमदार रोहित पवारांना परभणीच्या शेतकऱ्याने वाळलेली पीक आणून दाखवली. सोयाबीनच वाळलेल पीक आणून नांदेड येथे आणून दाखविले. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील आलेगावाच्या तरुण शेतकऱ्यांनी पीक आणून दाखविली. मंगेश धवन नावाच्या तरुण शेतकऱ्याने पीक आणून दाखवत मदत मिळवून देण्याची मागणी केली. कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, मागच्या वर्षीचा पीक विमा सुद्धा मिळाला नसल्याची शेतकऱ्याने सांगितलं आहे.
-
शिरूर तालुक्यातील धामारी-खैरेनगर रोड परिसरात बिबट्याचा वावर; रात्री पथदिवे नसल्याने शेतकऱ्यांचे जीवन धोक्यात
धामारी-खैरेनगर रोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर आढळून येत असल्याने परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या रस्त्यावर पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात ये-जा करणे धोकादायक ठरत आहे. शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतीची कामे, पिकांना पाणी देणे तसेच जनावरांची देखभाल करण्यासाठी घराबाहेर पडावे लागते. मात्र रस्त्यावर पथदिवे नसल्याने अंधाराचा फायदा घेऊन बिबट्याचा वावर वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या परिसरात तातडीने पथदिव्यांची व्यवस्था करण्यात यावी, तसेच वनविभागाने बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेऊन आवश्यक ती खबरदारीची उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.
-
पुणे-नाशिक रेल्वेचा गणेशोत्सवात देखावा; शेतमालाला बाजारपेठ मिळण्यासाठी युवकांचा अनोखा संदेश
उत्तर पुणे जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून पुणे-नाशिक प्रस्तावित रेल्वेमार्गाच्या मागणीवरून जनभावना तीव्र होताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या निमित्ताने जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार येथील सारंग बाबा नवतरुण मित्र मंडळाने पुणे-नाशिक रेल्वेचा देखावा सादर केला आहे. या देखाव्यामध्ये पुणे-नाशिक रेल्वेचा प्रस्तावित मार्ग खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा आणि संगमनेर या मार्गे दाखवण्यात आला आहे. या माध्यमातून परिसरातील युवकांनी रेल्वे मार्गाची आवश्यकता आणि त्यामागची स्थानिक शेतकऱ्यांची भावना मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला स्थानिक बाजारपेठेपलीकडे देशातील विविध बाजारपेठांमध्ये योग्य भाव मिळावा, तसेच शेतमालाची वाहतूक सुलभ आणि कमी खर्चात व्हावी, यासाठी पुणे-नाशिक रेल्वे मार्ग महत्त्वाचा ठरू शकतो, अशी भावना मंडळातील युवकांनी व्यक्त केली आहे. गणेशोत्सवाच्या देखाव्याच्या माध्यमातून मांडलेली ही संकल्पना सध्या जुन्नर तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
-
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेची मोठी तयारी
नाशिक शहरातील ३० प्रमुख वाहतूक चौकांची सर्वंकष पुनर्रचना आणि सुधारणा होणार आहे. वाहतूक अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञ सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेकडून ‘रिक्वेस्ट फॉर प्रपोजल’ (RFP) प्रसिद्ध करण्यात आला आहे. चौकांचा प्रत्यक्ष अभ्यास करून वाहतुकीचा प्रवाह, वाहनांची संख्या आणि वळणांवरील अडथळे तपासले जाणार आहेत. सप्टेंबरअखेर किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सल्लागार नियुक्तीची शक्यता आहे.
-
कल्याण कोर्टात जामिनासाठी बनावट पत्ता अन् खोटी कागदपत्रे; पोलिसांच्या पडताळणीत प्रकार उघड, दोन जामीनदारांवर गुन्हा दाखल
अंमली पदार्थांच्या गुन्ह्यातील अटक आरोपी मनोजकुमार पांडे याच्या जामिनासाठी दोन जामीनदारांनी कल्याण न्यायालयात कागदपत्रे सादर केले होते. सलमान अहमद शेख (नालासोपारा) आणि सना फहीम खान (उल्हासनगर) यांनी न्यायालयात दिलेल्या पत्त्यावर राहत नसल्याचे पोलिसांच्या पडताळणीत समोर आले. दोघांनी आधारकार्ड, सातबारा उतारा, शिधापत्रिका आणि प्रतिज्ञापत्राद्वारे जामीन प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद. साहाय्यक अधीक्षक मुकुंद कांबरी यांच्या तक्रारीवरून महात्मा फुले पोलिसांनी दोन्ही जामीनदारांविरोधात गुन्हा दाखल करत पोलीस तपास केला सुरू.
-
कळंबमध्ये गावठी पिस्टलसह एकाला अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
कळंब तालुक्यातील भाटसांगवी पाटीजवळ गावठी पिस्टलसह एका व्यक्तीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. आरोपीकडून गावठी पिस्टल आणि एक जिवंत काडतूस, जप्त करण्यात आले. आरोपीविरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्या पथकाची कारवाई केली असून नवनाथ उर्फ बालाजी बब्रुवान काळे असे आरोपीचे नाव आहे.
-
अमरावती शहरात मोकाट श्वानाचा हैदोस, अमरावती शहरात रोज दहा जणांना डॉग बाईट
अमरावती शहरात मोकाट श्वानाचा हैदोस दिसत आहे. अमरावती शहरात रोज दहा जणांना डॉग बाईट होत आहे. प्रशासनाचं दुर्लक्ष होत असून श्वानाचें निर्भीजीकरणही बंद करण्यात आलं आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
-
बाप्पांच्या विसर्जन मिरवणूकित डीजे बँजोच्या तालावर खासदार अनिल बोंडे यांनी धरला ठेका
अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील अंबाडा येथे गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणूकित डीजे बँजोच्या तालावर खासदार अनिल बोंडे यांनी धरला ठेका. यावेळी खासदार बोंडे यांच्या पत्नी देखील उपस्थित होत्या त्यांनी देखील ठेका धरला. दरम्यान बोंडे दाम्पत्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
रावेरमध्ये घरगुती गणपती विसर्जनावरून दोन गटात दगडफेक
रावेरमध्ये घरगुती गणपती विसर्जनावरून दोन गटात दगडफेक झाली आहे. दोन ते तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती घटने संदर्भात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या ठिकाणी शांतता असून पोलीस तैनात असून कुठलीही अफवा पसरू नका असं आव्हान पोलिसांनी केला आहे.
ठाण्यात डीजेवर बंदी घालण्यात आली आहे, तरी ध्वनिप्रदूषण कायम मात्र कायम आहे. विसर्जन मिरवणुकीत डीजेचा आवाज 105 डेसिबलपर्यंत गेला. डीजे बंदीचा परिणाम मात्र ढोल-ताशांच्या गजरात ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न कायम राहिला आहे. अशात ठाण्यात विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषणाचा कहर पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर, अहिल्यानगरच्या शेवगाव शहरातील खंडोबानगर येथील खंडोबा मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची मोठी गर्दी झाली. गौतमीची एक झलक पाहण्यासाठी अनेकांनी मोठी गर्दी केली आहे. तर दुसरीकडे डोंबिवलीत मोबाईल दुकानाचं शटर उचकटून महागडे मोबाईल आणि रोकड लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्ररकरणी विष्णुनगर पोलिसांनी तिघांना आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. 9 महागडे मोबाईल, चार्जर आणि इतर साहित्य देखील जप्त करण्यात आली आहे. तर पोलिसांचा याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची देखील माहिती समोर येत आहे. यासह राज्य, देश-विदेशातील, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.