Maharashtra News LIVE : अन्न व औषध प्रशासनात कर्मचाऱ्यांचा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याविरोधात एल्गार
Maharashtra News LIVE : भंडारा जिल्हा आणि लगतच्या गोंदिया जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या सततच्या या पावसामुळे गोसेखुर्द धरणाच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
आमदार तानाजी सावंत यांचा पुण्यातून तहसीलदारांना फोन
आमदार तानाजी सावंत यांच्या मतदारसंघातील 7 महसूल मंडळे पीकविम्यातून वगळली शेतकरी संतप्त.अतिवृष्टीग्रस्त भागातील 7 महसूल मंडळे पीकविमा भरपाईतून वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर आमदार तानाजी सावंत यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू आहे. शेतकऱ्यांचा आरोप आहे की, अतिवृष्टीच्या वेळी ज्या भागाची आमदार सावंत यांनी हेलिकॉप्टरमधून पाहणी केली त्याच महसूल मंडळांना विम्यापासून वंचित ठेवण्यात आले.
-
उल्हासनगर महापालिकेच्या ६५ लाखांच्या गुवाहाटी दौऱ्यावरून वाद
शहर विकास रखडला,नगरसेवकांचा ६५ लाखांचा गुवाहाटी दौरा चर्चेत. नगरसेवकांसोबत पत्नी, आई, मुलांचाही प्रवास? गुवाहाटी दौऱ्यावरून खळबळ. प्रशिक्षणाच्या नावाखाली नातेवाईकांची सहल? मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांचा सवाल
-
-
कोयना धरणाचे वक्री दरवाजे पाच वाजता उघडणर
कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे एक फूट उघडून 5079 कयुसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात पाच वाजता करण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे.
-
उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाणी सोडल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील आळगे बंधारा पाण्याखाली
पुणे जिल्ह्यात सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलं.. अक्कलकोट तालुक्यातील आळगे बंधाऱ्यावरून पाणी आल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.. वीर आणि उजनी धरणातून सोडलेल्या भीमा नदी पात्रात जवळपास 60 हजारचा विसर्ग वाहत आहे. भीमा नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे..
-
अन्न व औषध प्रशासनात कर्मचाऱ्यांचा आयुक्तांविरोधात एल्गार
२९ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मंत्री नरहरी झिरवळ यांना निवेदन. अपुरे मनुष्यबळ असतांना लॅब मध्ये काम करण्यासाठी दोन शिफ्ट, शनिवारची सक्ती व रजा निर्बंधांवर गंभीर आक्षेप. जुनी कार्यालयीन वेळ पूर्ववत करा; दोन शिफ्ट तात्काळ रद्द करण्याची मागणी
काय आहेत का मित्रांच्या मागण्या.
– 1) शासन निर्णयानुसार पूर्ववत कार्यालयीन वेळ लागू करावी.
– 2) दोन शिफ्टची कार्यपद्धती तात्काळ रद्द करावी.
– 3) इतर शासकीय कार्यालयांप्रमाणे शनिवार-रविवारच्या शासकीय सुट्ट्यांचा लाभ द्यावा.
– 4) रिक्त पदे भरून पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे आणि अतिरिक्त कामाची दखल घ्यावी. -
-
पावसाचा ऑरेंज अलर्ट कुठे?
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पावसाचा जोर अधिक वाढेल. मराठवाडा, विदर्भ आणि कोकण घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. राज्यातील जवळपास जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला.
-
नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आणखी एका नागरिकाचा दुर्देवी मृत्यू
नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आणखी एका नागरिकाचा दुर्देवी मृत्यू. अंबड एमआयडीसीतील एक्सलो पॉईंट परिसरात चिखल आणि खड्ड्यांमुळे दुचाकीला अपघात. अपघातात नीलेश कोतकर (वय 40) यांचा उपचारादरम्यान मृत्यू. गेल्या काही दिवसांमध्ये खड्ड्यांमुळे झालेला हा पाचवा मृत्यू.
-
वैनगंगा नदीच्या पाणी पात्रात वाढ
गोंदिया जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. परिणामी वैनगंगा नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे. त्यामुळे वैनगंगा नदीवर बनविण्यात आलेल्या धापेवाडा बॅरेजचे 17 दरवाजे उघडले असुन 1 लक्ष 27 हजार 256 क्युसेकने सध्या पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
-
गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसामुळे मोठी वाढ
भंडारा जिल्हा आणि लगतच्या गोंदिया जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या सततच्या या पावसामुळे पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. पाण्याचा वाढता साठा नियंत्रणात आणण्यासाठी धरण प्रशासनाकडून आता सर्व ३३ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. धरणातून १ लाख ३५ हजार ६९१ क्युसेक वेगाने वैनगंगा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे वैनगंगा नदीकाठच्या सर्व गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
-
Nanded Rain : नांदेड शहरासह काही भागात सकाळ पासूनच मुसळधार पावसाला सुरुवात
नांदेड शहरासह काही भागात सकाळ पासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. या पावसाळ्यातील हा सगळ्यात मोठा पाऊस आहे. अर्धातासापासून पडत असलेला पाऊस पिकांना वरदान ठरणार आहे. या पावसामुळे पहिल्यांदाच नद्या, नाले भरुन वाहणार आहेत. जलसाठे भरण्यासाठी नांदेड जिल्ह्यात आणखीन मोठ्या पावसाची गरज आहे.
कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन आता थांबलं असलं तरी शाब्दीक वादावादी सुरुच आहे. अभिनेत्री कंगना राणौत आणि सीजेपीचा प्रवक्ता सौरव दास यांच्यातील शाब्दीक युद्ध मीडियामध्ये गाजत आहे. दरम्यान महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यांमध्ये पावसाच इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पावसाचा जोर अधिक वाढेल. मराठवाडा, विदर्भ आणि कोकण घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नांदेड शहरासह काही भागात सकाळ पासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. या पावसाळ्यातील हा सगळ्यात मोठा पाऊस आहे. अर्धातासापासून पडत असलेला पाऊस पिकांना वरदान ठरणार आहे. या पावसामुळे पहिल्यांदाच खळखळून भरून नाल्या वाहणार आहेत. जलसाठे भरण्यासाठी नांदेड जिल्ह्यात आणखीन मोठ्या पावसाची गरज आहे. सध्या शेतकऱ्यांचे पावसाकडे डोळे लागले आहेत.