Maharashtra News LIVE : नाशिक धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणाची सुनावणी इनकॅमेरा होणार
Maharashtra News LIVE Updates: दोन्ही राष्ट्रवादीची शिष्टाई काल कामी आली. काँग्रेसने बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून उमेदवारी मागे घेतली. पण ही निवडणूक बिनविरोध होणार नाही. भोंदू खरात याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अखेर बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसने आपली उमेदवारी मागे घेतली आणि राज्याच्या सांस्कृतिक आणि सदभावना धोरण कायम असल्याचे काँग्रेसने अधोरेखित केले. पण ही निवडणूक बिनविरोध करण्यास मात्र अपयश आले आहे. सुनेत्रा पवार या बहुमताने निवडून येतील. पण बिनविरोध निवडणूक करण्यात यश आले नाही. नाशिक सध्या लैंगिक अत्याचार आणि लैंगिक शोषणाने हादरलेले आहेत. एकामागून एक प्रकरणं समोर येत आहेत. भोंदू खरात याला पाच दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे. तर एरंडे याला चांगलाच प्रसाद मिळाला आहे. आयटी कंपनीत धर्मांतराचे आणि महिलांच्या शोषणाचे प्रकरण सध्या ऐरणीवर आले आहे. तर राजकीय भूकंप घडवणारी बातमी समोर येत आहे. ऑपरेशन टायगरची शक्यता बळावली आहे. दरेगावातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सूत्र हलवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासह राज्यातील इतर ठळक घडामोडी इथे वाच
LIVE NEWS & UPDATES
-
सोलापूर : प्रहार संघटनेकडून आंदोलन
प्रहार संघटनेच्या वतीने सोलापूरमध्ये झेडपी सीईओंच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. काही शाळांकडून आरटीई कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने कारवाईची मागणी आंदोलकांनी केली. यावेळी आंदोलकांनी शाळेचा गणवेश घालून शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा फोटो हातात घेत घोषणाबाजी केली.
-
बीड : हॉकी स्टिकने दोन तरुणांना अमानुष मारहाण
बीडमध्ये दोन तरूणांना काही दिवसांपूर्वी ओंकार सातपुते नामक तरूणाने हॉकी स्टिकने अमानुष मारहाण केली होती. मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल माध्यमांवर व्हायरल झाला आहे. मारहाण करणारा आरोपी दादासाहेब खिंडकर याच्या विरोधात फिर्यादी आहे. या प्रकरणात अद्याप पर्यंत कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही.
-
-
सांगली – कुपवाडमध्ये चोरट्यांकडून एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न
सांगलीच्या कुपवाड मध्ये चोरट्यांकडून दोन एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र चोरट्यांना यश आलं नाही. कुपवाड शहरातील मंगळवार बाजारपेठेतील आर. पी. पाटील चौकात लगत-लगत असणाऱ्या दोन एटीएम मशीन सेंटरचं शटर उचकटून चोरट्यानी एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरट्यांच्या हाताला काहीच लागलं नाही. सदर घटनेची माहिती मिळतात कुपवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत एटीएम सेंटरचा पंचनामा करत तपास सुरू केला आहे.
-
पिंपरी चिंचवड : नदी पात्रात रसायन मिश्रित पाणी सोडल्याने इंद्रायणी फेसाळली
पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना आणि इंद्रायणी नदी पात्रात रसायन मिश्रित आणि सांड पाणी वारंवार सोडल्याने पवना आणि इंद्रायणी नदी वारंवार फेसाळत आहे. याचीच पाहणी आज राज्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील रावेत बंधारा या ठिकाणी पंकजा मुंडे यांनी पवना नदी पात्राचं निरीक्षण केलं आहे. यावेळी पवना नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचा आढावा पंकजा मुंडे यांनी घेतला आहे.
-
कल्पना खरात अटकपूर्व जामीन अर्ज सुनावणी पुढे ढकलली
कल्पना खरात अटकपूर्व जामीन अर्ज सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता पुढील सुनावणी १६ एप्रिल रोजी होणार आहे. शिर्डी पोलिसांनी आपले लेखी म्हणणे न्यायालयात सादर केले आहे. आरोपींचे मुख्य वकील आज हजर नसल्याने केलेल्या विनंतीवरून म्हणणे ऐकण्यासाठी कोर्टाने मुदतवाढ दिली आहे. आता अटकपुर्व जामीनाबाबत पुढील सुनावणी गुरुवारी १६ एप्रिलला रोजी ठेवली आहे.
-
-
वांद्रे पश्चिमेत पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया
वांद्रे पश्चिमेत पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटल्याची मोठी घटना घडली आहे. लकी हॉटेल जंक्शन परिसरात झालेल्या या घटनेमुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. पाईपलाईन फुटल्याने रस्ते जलमय झाले असून पाणी परिसरातील दुकानांमध्येही शिरले आहे. त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे.
-
नाशिक धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणाची सुनावणी इनकॅमेरा होणार
बहुचर्चित कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाला वेगळं वळण लागले आहे. धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणाच्या सुनावणीवेळी माध्यमांना सुनावणी ऐकण्यास प्रतिबंध करण्यात आला. न्यायमूर्ती आर.सी. नरवाडिया यांच्या समोर सुनावणी सुरु होती. आरोपींची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले होते. आरोपींच्या नातेवाईकांच्या मागणीनुसार प्रसार माध्यमांना बाहेर काढण्याचे आदेश न्यायमूर्तींनी दिली.
-
काँग्रेसच्या नागपूर शहरातील संघटनात्मक रचनेत मोठे बदल होणार – अरुण यादव
काँग्रेसच्या “संघटन सृजन” अभियानांतर्गत नागपूर शहरातील संघटनात्मक रचनेत मोठे बदल होणार असल्याची माहिती पर्यवेक्षक अरुण यादव यांनी दिली आहे.आठवड्यापर्यंत आम्ही विविध सामाजिक संघटनेसोबत चर्चा करू असे अरुण यादव यांनी म्हटले आहे. मंडळ, बूथ आणि सेक्टर स्तरावरील कार्यकारिणीत फेरबदल करण्यात येणार आहे.बदल करण्यापूर्वी स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या सूचनांचा विचार केला जाणार असल्याचे यादव यांनी म्हटले आहे.
-
गोदावरी वाचवण्यासाठी रयत क्रांती संघटना आत्मक्लेश यात्रा काढणार
वाळू माफियापासुन गोदावरी वाचवण्यासाठी गोदावरी नदीच्या काठाने रयत क्रांती संघटना आत्मक्लेश यात्रा काढणार आहे. या संदर्भात नेते सदाभाऊ खोत यांनी घोषणा केली आहे. बेसुमार वाळू उपश्यामुळे येत्या काळात शेतीच्या, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊन हा भाग उजाड होईल. गोदावरीचे वस्त्रहरण हे सगळे कौरव करायला लागले आहेत. त्याच्या विरोधामध्ये नागरिकांनी उठाव करायला पाहिजेत असेही खोत यांनी म्हटले आहे.
-
शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे २ दिवसांच्या राज्य दौऱ्यावर
शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे २ दिवसांच्या राज्य दौऱ्यावर
मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात लोकसभानिहाय बैठका घेणार
१२ एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना आणि पुणे लोकसभा मतदार संघांचा आढावा घेणार
सोलापूर, माढा, धाराशीव, नांदेड, परभणी, हिंगोली लोकसभा मतदार संघाबाबत १३ एप्रिल रोजी बैठकीचे आयोजन
बैठकांना आमदार, खासदार सर्व लोकप्रतिनीधी, संपर्क प्रमुखांना उपस्थित राहण्याचे निर्देश
-
अहेरी आगाराच्या बसमध्ये तांत्रिक बिघाड, तब्बल अडीच तास प्रवाशांचा खोळंबा
अहेरी आगाराच्या बसमध्ये तांत्रिक बिघाड, तब्बल अडीच तास प्रवाशांचा खोळंबा
अहेरी आगारातील बस सिरोंचा येथे जात असताना रस्त्यातच पडली बंद
बस मध्येच बंद पडल्यानं तब्बल 70 प्रवाशी अडीच तास ताटकाळले
प्रवासी भर उन्ह्यात अडीच तास रस्त्यावरच
राज्य परिवहन महामंडळाच्या ढिसाळ कारभाराचा प्रवाशांना फटका
-
कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणीला सुरुवात
कल्पना खरात अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी
शिर्डी पोलिसांनी आपले लेखी म्हणणे केले न्यायालयात सादर
पोलिसांनी दिलेल्या आक्षेपाबाबत आरोपीच्या वकीलांचे म्हणणे ऐकल्यावर निर्णय होणार
आरोपींच मुख्य वकील आज हजर नसल्याने सुनावणी पुढे ढकलण्याची शक्यता
अटकपूर्व जामीनाबाबत पुढील सुनावणीत निर्णय होण्याची शक्यता
न्यायालय काय निर्णय देते याकडे लक्ष
राहाता जिल्हा सत्र न्यायालयात सुरू आहे सुनावणी
-
नाशिक धर्मांतर प्रकरणी संशयित आरोपींना कोर्टात केले हजर
नाशिक धर्मांतर प्रकरणी संशयित आरोपींना कोर्टात केले हजर या प्रकरणात एकूण 6 संशयित आरोपींना पोलिसांनी घेतले होते ताब्यात मागील सुनावणीत आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी आली होती सुनावण्यात आज पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने आरोपींना पुन्हा कोर्टात हजर केले आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष
-
राज्यातील शेतकऱ्यांचे 1 हजार 12 कोटी FRP साखर कारखान्याकडे थकीत
राज्यातील शेतकऱ्यांचे 1 हजार 12 कोटी FRP साखर कारखान्याकडे थकीत…. राज्यातील 29 साखर कारखान्यांना साखर आयुक्तालयाची नोटीस… शेतकऱ्यांना FRP देण्यास टाळाटाळ करणाऱ्या साखर कारखान्यांना नोटीस बजावली… याप्रकरणी 13 एप्रिलला सुनावणी होणार…
-
शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात SITला 3 महिन्यांची मुदतवाढ
शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात SITला 3 महिन्यांची मुदतवाढ…. या प्रकरणात शिक्षण उपसंचालक, वरिष्ठ लेखाधिकाऱ्यांसह 27 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अटक…विशेष पथकाला तपास करण्यासाठी 7 जून पर्यंत मुदतवाढ
-
सोलापुरात शासकीय सेंटरमधून बनावट पॉझिटिव्ह HIV रिपोर्ट दिल्याचा आरोप
सोलापुरात शासकीय सेंटरमधून बनावट पॉझिटिव्ह HIV रिपोर्ट दिल्याचा आरोप. सरकारी अनुदान मिळवण्यासाठी बनावट पॉझिटिव्ह HIV रिपोर्ट दिल्याचा आरोप. बनावट पॉझिटिव्ह HIV रिपोर्ट दिल्यामुळे पीडितेचा संसार उद्ध्वस्त. महिलेने खासगी सेंटरमध्ये टेस्ट केल्यानंतर मात्र HIV रिपोर्ट निगेटिव्ह आला. संबंधित महिला 7 महिन्यांची गरोदर असताना HIV रिपोर्ट दिला होता. पीडितेच्या पतीचा आणि पोटातील बाळाचा रिपोर्टही 5वेळा निगेटिव्ह आला. बनावट पॉझिटिव्ह HIV रिपोर्ट प्रकरणी समितीची नेमणूक. त्रिसदस्यीय समिती तपास करुन संबंधितांवर कारवाई करणार. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांची माहिती
-
नाशिकच्या IT कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतराचं प्रकरणात नवी माहिती समोर आलीय
नाशिकच्या IT कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतराचं प्रकरणात नवी माहिती समोर आलीय. पीडित तरुणीच्या वर्तणुकीत मोठा बदल आढळला, नवी माहिती समोर. सलग 2 वर्षे महिनाभर उपवास केल्याची माहिती. वर्षभरापासून लिपस्टिक लावणंही पूर्णपणे बंद केल्याची माहिती.
-
मनमाड : नगर परिषदेमध्ये सर्वसाधारण सभा संपन्न..
नाशिकच्या मनमाड नगर परिषदेमध्ये सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत शहर विकासाच्या संदर्भात विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. तसेच आयत्या वेळेच्या विषयांमध्ये अतिक्रमणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आले. वाहतुकीला अडथळे ठरणाऱ्या अतिक्रमण काढून रहदारी सुरळीत करण्याचे ठरवण्यात आले. या बैठकीला सत्ताधारी व विरोधक नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.
-
पुलावरुन उडी मारण्याच्या तयारीत असलेल्या तरुणीला वाचवलं
पुलावर चढून खाली उडी मारण्याच्या तयारीत असलेल्या एका तरुणीला तरुणांनी वाचवले. नागपूर शहरातील अजनी रेल्वे पुलावरची ही घटना असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित युवती पुलाच्या भिंतीवर बसून खाली उडी मारण्याच्या तयारीत होती. पुलाच्या खाली रेल्वे लाईन आहेत तर वरून वाहने जातात.
-
फेक एचआयव्ही पॉझिटीव्ह रिपोर्ट प्रकरणी चौकशी समिती
महिलेच्या फेक एचआयव्ही पॉझिटीव्ह रिपोर्ट प्रकरणी चौकशी समिती नेमली. त्रिसदस्यीय समिती तपास करुन संबंधितांवर कारवाई करणार. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा डोईफोडे यांची माहिती.
-
दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी मध्यरात्री घरफोडी
बीडच्या मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी मध्यरात्री घरफोडी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. रात्री घरात दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, पत्नी अश्विनी देशमुख, आई आणि कुटुंबातील सर्व सदस्य झोपलेले असताना हा प्रकार घडला आहे.
-
खोटा एचआयव्ही रिपोर्ट दिल्याने महिलेचा संसार उद्धवस्त
सोलापुरात आयसीटीसी सेंटर कडून फेक एचआयव्ही रिपोर्ट दिला. एचआयव्ही रिपोर्ट पॉजिटीव्ह दिल्याने महिलेचा संसार उद्धवस्त. संबंधित आयसीटीसी सेंटरने सरकारी अनुदान मिळवण्यासाठी फेक एचआयव्ही पॉझिटिव्ह रिपोर्ट दिल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप. संबंधित महिला सात महिन्याची गर्भवती असताना एचआयव्ही रिपोर्ट पॉझिटिव्ह दिला होता. मात्र तिचे पती आणि पोटातील मुलाचा रिपोर्ट पाच वेळा निगेटिव्ह आला. संबंधित महिलेने इतर ठिकाणच्या खाजगी सेंटरमधून टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट निगेटिव्ह आले.
-
टोल नाक्यावर मिलिट्री सामानाच्या ट्रकला भीषण आग
येवला तालुक्यातील पिंपळगाव टोल नाक्यावर मिलिट्री सामानाच्या ट्रकला भीषण आग. वाहतूक पोलिसांनी आग लावल्याचा ट्रक चालकाचा गंभीर आरोप. मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे ट्रकचालकांची थेट तक्रार. या घटनेची दखल घेत भुजबळ यांनी तातडीने ॲडिशनल डीजी साळुंखे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क. संबंधित वाहतूक पोलिसांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना.
-
बीडच्या केज पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडितेकडून औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न
बीडच्या केज पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीवर बळजबरी करत अत्याचार करण्यात आला आहे. या अत्याचारानंतर पिडीतेने औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी पिडीतेच्या फिर्यादीवरून दोन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून दुसऱ्या आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले आहे. पिडीतेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्या ठिकाणी बीड येथील पिंक पथक दाखल झाले असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू करण्यात आला आहे.
-
वसई औद्योगिक वसाहतीत टेम्पोचालकांमध्ये तुंबळ हाणामारी; व्हिडिओ व्हायरल
वसई पूर्व औद्योगिक वसाहतीतील वोरा इंडस्ट्रियल इस्टेट क्रमांक 4 येथे गुरुवारी दुपारी दोन टेम्पोचालकांमध्ये झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर जोरदार हाणामारीत झाले. या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वर चांगलाच व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिस्लेरी पाण्याच्या बाटल्या वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोचालकाचा वाहन रस्त्यावर उभा होता. त्याच वेळी दुसऱ्या टेम्पोचालकाला मार्ग अडथळा निर्माण झाल्याने वाद सुरू झाला. सुरुवातीला शाब्दिक चकमक झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांना मारहाण करण्यात आली.
-
बीडमध्ये भाजीपाल्यासह वांग्याचे भाव घसरले, अनेक दिवसांपासून चांगला भाव मिळत नसल्याने शेतातील वांगी होऊ लागले खराब
बीडमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून भाजीपाल्यासह वांग्याचे भाव घसरले आहेत. वांग्याला केवळ चार ते पाच रुपये किलो दर मिळत असल्याने शेतकरी अनेक दिवसांपासून भाववाढ होईल या प्रतीक्षेत होते. मात्र आता वांगे शेतातच खराब होऊ लागले आहेत. परिणामी शेतकऱ्यांना हे वांगे फेकून देण्याची वेळ आली आहे.
-
जालना जिल्ह्यात महिला बालविकास विभागाकडून गेल्या वर्षभरात १३६ बालविवाह रोखले
जालना जिल्ह्यात गेल्या वर्षभरात प्रशासनाने सतर्कता दाखवत तब्बल १३६ बालविवाह रोखण्यात यश मिळवलेये.मात्र, इतक्या कडक पाळतीनंतरही जिल्ह्यात चार बालविवाह पार पडल्याची माहिती समोर आली असून, यातील दोन प्रकरणांत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा बाल विकास अधिकारी राजेंद्र कड यांनी दिलीय. शिवाय बालविवाह करू नये आणि बालविवाह रोखण्यासाठी सर्व जनतेने सहकार्य करावे असे आवाहन राजेंद्र कड यांनी केलय.
-
अंबड – मुलानेच केला बापाचा खून, रुई गावात खळबळ
अंबड तालुक्यातल्या रुई गावात 45 वर्षीय व्यक्तीचा धारदार शस्त्राने वार करून खून, दिलीप राजगुरू असं मयत व्यक्तीचं नाव आहे. 2 संशयितांना तीर्थपुरी पोलिसांनी ताब्यात घेतलं, तपासाअंती पोटच्या मुलानेच बापाचा खून केल्याचे उघड झाले. मात्र मुलाने बापाला का मरालं याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
-
डीआरआय मुंबईकडून सोनं तस्करीचा पर्दाफाश, 38 कोटींचं सोनं जप्त
डीआरआय मुंबईकडून सोनं तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला असून जवळपास 38 कोटींचं सोनं जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. एकूण 24 महिलांन अटक करण्यात आली आहे. मुंबई विमातळामार्गे सोन तस्करीचा होता प्रयत्न.
-
जळगाव – चोपडा येथे गॅस एजन्सी समोर सिलेंडर साठी नागरिकांची मोठी गर्दी
जळगावात चोपडा येथे गॅस एजन्सी समोर घरगुती गॅस सिलेंडर साठी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. चोपडा शहरात जगदीश गॅस एजन्सी समोर पहाटेपासून वृद्धांसह महिला तसेच नागरिक गॅस सिलेंडर तसेच बुकिंग साठी रांगेत उभे आहेत.
गॅस हंडी घरपोच मिळणार असं जिल्हा प्रशासन म्हणतंय तरी देखील गॅस एजन्सी समोरील गर्दी कमी होत नसल्याचे समोर आले आहे.
काहींची गॅस बुकिंग करण्यासाठी तर काहींची गॅस सिलेंडर घेऊन जाण्यासाठी गर्दी
-
वसई औद्योगिक वसाहतीत टेम्पोचालकांमध्ये तुंबळ हाणामारी; व्हिडिओ व्हायरल
वसई पूर्व औद्योगिक वसाहतीतील वोरा इंडस्ट्रियल इस्टेट क्रमांक 4 येथे गुरुवारी दुपारी दोन टेम्पोचालकांमध्ये झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर जोरदार हाणामारीत झाले. या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वर चांगलाच व्हायरल झाला आहे.
-
धर्मांतरण आणि महिलांवरील अत्याचार प्रकरणी भाजप युवा मोर्चा कडून मल्टिनॅशनल कंपनी बाहेर आंदोलन
नाशिक – धर्मांतरण आणि महिलांवरील अत्याचार प्रकरणी भाजप युवा मोर्चाच्या वतीने संबंधित मल्टिनॅशनल कंपनी बाहेर आंदोलन. भाजपा युवा मोर्चा कडून कंपनी बाहेर घोषणाबाजी सुरू असून गेट बाहेर भाजप कार्यकर्त्यांकडून जय श्री राम च्या घोषणा देण्यात येत आहेत. याच कंपनीत धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप असून9 महिलांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात आत्तापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आली आहे.
-
मीरा रोडमध्ये मनसे पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; जलवाहिनीच्या कामाचा व्हिडीओ काढल्याने वाद
मीरा रोड येथील रामदेव पार्क परिसरात मनसे पदाधिकारी स्वप्निल तपासे यांच्यावर दगडाने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रामदेव पार्क भागात महापालिकेच्या जलवाहिनीचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने, मनसे पदाधिकारी रेश्मा तपासे तिथे व्हिडिओ चित्रित करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांच्या मागे एक व्यक्ती अर्धनग्न अवस्थेत धूम्रपान करत उभा राहिला. या वर्तणुकीबद्दल स्वप्निल तपासे यांनी जाब विचारला असता, संबंधित व्यक्तीने “तुझं कच्चं मटण मला खायचं आहे” अशी धक्कादायक धमकी देत तपासे यांच्या डोक्यावर दगडाने प्रहार केला. या हल्ल्यात स्वप्निल तपासे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाण करणारे परप्रांतीय शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याचे बोलले जात असून या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
-
मुंबईच्या डोंगरीत शिधावाटप विभागाचा मोठा छापा, ४० लाखांचा मुद्देमाल जप्त
मुंबईच्या वाडीबंदर ब्रीज परिसरात शिधावाटप विभागाने धाडसी कारवाई करत अवैध गॅस सिलिंडर साठ्याचा पर्दाफाश केला आहे. माधुरी शिंदे आणि प्रदीप यादव यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने टाकलेल्या या छाप्यात एकूण ४०.६१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये ८ वाहने आणि ४५१ गॅस सिलिंडरचा समावेश असून, प्रशासनाने हा सर्व साठा हस्तगत केला आहे. डोंगरी परिसरात झालेल्या या धडक कारवाईमुळे अवैध गॅस माफियांचे धाबे दणाणले असून, प्रशासनाने अशा अवैध साठेबाजीवर आपला प्रहार अधिक तीव्र केला आहे.
-
जळगावच्या वाघळीत महापुरुषाचे बॅनर फाडल्याने तणाव, महामार्गावर दोन तास रास्ता रोको
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावात महापुरुषाचे बॅनर अज्ञात व्यक्तींनी फाडल्याच्या घटनेमुळे मोठा तणाव निर्माण झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी जळगाव-चाळीसगाव महामार्गावर सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. ज्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा २ ते ३ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अज्ञात समाजकंटकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले आहे. सद्यस्थितीत महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली असली तरी, वाघळी गावात अद्यापही तणावपूर्ण शांतता आहे.
-
मी त्या बैठकीला गेलोच नव्हतो; खासदार संजय देशमुख यांनी फेटाळला दावा
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांनी एकनाथ शिंदेंनी ठाण्यात आयोजित केलेल्या एका विशिष्ट बैठकीला हजेरी लावल्याचे वृत्त समोर आले होते. आता यावरुन सुरू असलेल्या चर्चांना संजय देशमुख यांनी पूर्णविराम दिला. मी कोणत्याही प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन बैठकीला उपस्थित नव्हतो, असे त्यांनी स्पष्टपणे नाकारले आहे. या बैठकीचे आपल्याला कोणतेही निमंत्रण नव्हते आणि कुणीही बोलावले नव्हते, त्यामुळे तेथे जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी आक्रमक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. राजकीय वर्तुळात रंगणाऱ्या चर्चांना या स्पष्टीकरणामुळे आता नवे वळण मिळाले आहे.
-
ठाण्यात आजपासून नालेसफाई; यंदा रोबोटिक यंत्रणेद्वारे होणार नाल्यांची स्वच्छता
ठाणे शहरात पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाई मोहिमेला आजपासून अधिकृत सुरुवात होत आहे. महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत मुंब्रा येथील अमृत नगर नाल्यापासून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागामार्फत ९ प्रभाग समित्यांमधील तब्बल ३८४.९१ किलोमीटर लांबीच्या नाल्यांची स्वच्छता केली जाणार असून, यासाठी ११.५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यंदा प्रथमच विविध ठिकाणी आधुनिक रोबोटिक यंत्रणेचा वापर करून नालेसफाई केली जाणार असल्याने शहराला पुराच्या संकटातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
-
नाशिकमध्ये आयटी कंपनीतील महिला छळ प्रकरणी फरार महिला HR ला पुण्यातून अटक
नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, मानसिक छळ आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले होते. याप्रकरणी सह-आरोपी महिला HR अश्विनी चेनानी हिला नाशिक पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. पीडित महिलांनी कंपनीत होणाऱ्या अन्यायाबाबत वारंवार तक्रारी करूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी तिला या प्रकरणात सह-आरोपी केले होते. मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून ती फरार होती, अखेर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे तिचा शोध घेत तिला बेड्या ठोकल्या आहेत.
-
महिला वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी वेशांतर करून कंपनीत झाल्या दाखल
नामांकित कंपनीत महिला व तरुणींवर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांची गोपनीय कारवाई. महिला वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी वेशांतर करून कंपनीत झाल्या दाखल. तब्बल 7 महिला पोलिसांची स्पेशल टीम होती तैनात. मीटिंगदरम्यान आरोपींचे अश्लील वर्तन प्रत्यक्ष पकडले. शिताफीने कारवाई करत आरोपींना बेड्या. 40+ CCTV फुटेजची तपासणी, ठोस पुरावे जमा
-
कल्याण जवळील मोहने येथील धक्कादायक घटना
आसनगाव जोंधळे कॉलेज मध्ये मोबाईलमधील नंबरवरून संशय अन् सर्वांसमोर अपमान; शिक्षकाच्या मुजोरीमुळे १७ वर्षीय मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न. आई’ या नावाने मुलाचा नंबर सेव असल्याचा संशय घेत मयूर खारीक नावाच्या शिक्षकाने चक्क कॉलेज परिसरात इतर विद्यार्थ्यांसमोर मोबाईल हिसकावून केला विद्यार्थिनीच्या आईला व्हिडिओ कॉल.इथेच न थांबता व्हिडिओ कॉलवर आई आणि मुलीला अत्यंत उद्धट आणि अपमानास्पद वागणूक दिल्याने विद्यार्थिनी राहत्या घरी फिनाईल प्राशन करत केला आत्महत्येचा प्रयत्न
-
फरार असलेल्या खाजगी कंपनीच्या एचआरला नाशिक पोलिसांकडून अटक
श्विनी चेनानी असे अटक केलेल्या HR चे नाव. नाशिकच्या नामांकित आयटी कंपनीत महिलांचं लैंगिक शोषण करून मानसिक त्रास देत धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. महिलांनी वारंवार कंपनीच्या एचआरकडे तक्रार करूनही दुर्लक्ष दिल्याने पोलिसांनी केले सह आरोपी. गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असलेल्या कंपनी महिला एचआरला पोलिसांनी केले पुणे येथून अटक
-
जळगावच्या कासोदा येथे ग्राम देवीच्या यात्रोत्सवानिमित्ताने भव्य कुस्तींच्या स्पर्धेचे आयोजन
पारोळा येथील शिवसेनेचे आमदार अमोल चिमणराव पाटील यांच्या हस्ते कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ. कुस्ती स्पर्धेसाठी राज्यभरातून वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील 300 हून अधिक कुस्तीपटू सहभागी. स्पर्धेत शाळकरी विद्यार्थ्यांसह मोठ्या पैलवानांच्या कुस्त्यांनी वेधले लक्ष. कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी एरंडोल तालुक्यासह परिसरातील गावांमधील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती
-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात राबवणार ऑपरेशन टायगर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या साताऱ्यातील दरे गावात आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर राबवणार असल्याची माहिती मिळत आहे. एक महत्वाची बैठकही पार पडली आहे.
-
भोंदू अशोक खरात प्रकरणी ED आणि IT विभाग ॲक्शन मोडवर
भोंदू अशोक खरात प्रकरणी ED आणि IT विभाग ॲक्शन मोडवर आली आहे. ठाणे येथील कार्यालयात आयकर विभाग व ईडी यांची संयुक्त बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोन्ही संस्थांमार्फत भोंदू अशोक खरात याच्या कागदपत्रांची छाननी सुरू झाली. लवकरच खरातची मालमत्तांवर धाडसत्र राबवले जाण्याची शक्यता आहे. ईडीने दोन दिवसांपूर्वीच भोंदू अशोक खरात संबंधित असलेल्या जमीन खरेदी विक्रीचे मूळ दस्तावेज व बँक अकाउंट चा तपशील ताब्यात घेतला होता.
-
शिरूरच्या परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात 41 वा बिबट्या जेरबंद
शिरूर आंबेगाव जुन्नर तालुक्याच्या सरहद्दी वरील पिंपरखेड येथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला असून तीन वर्ष वयाच्या नर जातीच्या या बिबट्या ची रवानगी माणिकडोह बिबट निवारण केंद्रात करण्यात आलीय, गेली चार महिन्यात वनविभागाने या परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात 41 बिबट जेरबंद झालेत
-
मुलीच्या व्हिडिओने बीड हादरले
बीडच्या केज पोलीस ठाणे हद्दीतील एका गावातील एका अल्पवयीन मुलीचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना हा व्हिडिओ तिच्या नातेवाईकांनी रेकॉर्ड केला आहे. ज्यामध्ये ती सांगत आहे की आपल्या सोबत बळजबरी करून अत्याचाराचा प्रयत्न झाला आहे ते मला सहन न झाल्याने मी औषध प्राशन केले. सदरील तरुणी केज पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात राहणारी असून अल्पवयीन आहे. औषध प्राशन केल्याने तिच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान समोर आलेल्या या प्रकरणात अद्याप पर्यंत कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही.
-
पेट्रोल ओतून मामनेच दिले हॉटेल पेटवून, हॉटेल पेटवणारा मामा सीसीटीव्हीत कैद
बीडच्या केज शहरातील शासकीय विश्रामगृहाच्या समोर असलेले हॉटेल पेट्रोल ओतून पेटवून दिले. यानंतर हॉटेल चालक तरूणाने बाजुच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता त्याच्याच मामाने पेट्रोल टाकून हॉटेल पेटवून दिल्याचे निदर्शनास आले. बहिण भावाचा घरी किरकोळ वाद झाला होता यानंतर मामाने रात्री भाच्याचे हॉटेल बंद झाल्यानंतर पेटवून दिले यामध्ये लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. याप्रकरणी केज पोलीसात मामा गोविंद कोंबडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
जळगाव महापालिकेची बीव्हीजी कंपनीला नोटीस
जळगाव महापालिकेने कचरा संकलनाचा ठेका घेतलेल्या बीव्हीजी कंपनीला नोटीस बजावली. बीव्हीजी कंपनीने करारातील अटींनुसार हातगाड्या व पुरेशी वाहने उपलब्ध करून न दिल्याने मनपाचे सहायक आयुक्त उदय पाटील यांनी ही नोटीस बजावली आहे.बीव्हीजी कंपनीला ५० हातगाड्या आणि मोठी पिकअप वाहने उपलब्ध करून देण्यासाठी ७ दिवसांची मुदत दिली आहे
-
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिण्याच्या पाण्यात आढळल्या आळ्या
पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे केल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाणी पुरवठ्यात अळ्या आढळून आल्या आहेत. पिण्याच्या पाण्यात अळ्या आढळून आल्याने पिंपरी चिंचवडकरांचा आरोग्य धोक्यात आलं आहे. पिंपरी चिंचवड शहरातील तुकाराम नगर परिसरामध्ये महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यात अक्षरशः अळ्या आढळून आल्या आहेत. पिण्याच्या पाण्यात अळ्या तरंगत असतानाची दृश्य एका संजग नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमेरा मध्ये कैद केली आहेत.
Published On - Apr 10,2026 8:16 AM
