
लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी आळंदी मध्ये पुन्हा एकदा फेसाळली आहे. पिंपरी चिंचवड आणि इंद्रायणी नदीच्या परिसरातील अनेक कंपन्या केमिकल युक्त पाणी इंद्रायणी नदीमध्ये सोडत असल्याचं वारंवार स्पष्ट होऊनही या कंपन्यांवर कसलीही कारवाई होत नाही त्यामुळे सातत्याने इंद्रायणी नदीमध्ये फेस निर्माण होण्याच्या घटना घडत आहेत. या प्रदूषण युक्त पाण्यामुळे आळंदीकर नागरिक आणि भाविकांच्या आरोग्याशी मात्र खेळ होत आहे.
घाटकोपरच्या आर सिटी मॉलजवळ मेट्रो 4च्या बीमला मोठे तडे. BMCकडून मेट्रो प्रशासनाला तातडीनं अॅक्शन घेण्यासंदर्भात पत्र. मुलुंड मेट्रो स्लॅब दुर्घटना ताजी असतानाच याच मेट्रोमार्गावर बीमला तडे. एका नागरिकाकडून व्हॉट्सअॅपवर तक्रार प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्यात आली.. आर-सिटी मॉलजवळ मेट्रो लाईन 4 च्या सुपरस्टक्चर बीममध्ये ‘मॅक्रो क्रॅक्स’ दिसून आल्याची माहिती.
बुलढाण्याच्या चिखला गावात पुन्हा शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारला… शिवभक्तांकडून रात्री पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना… पुतळ्याच्या स्थापनेवेळी शेकडो शिवभक्त उपस्थित होते… गावात पोलिसांचा बंदोबस्त…
महादेव मुंडेंच्या हत्येप्रकरणी तपास सुरु असून काही जण ताब्यात… मात्र या टोळीतील गुंडांकडून दमदाटी सुरू, ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप… तर ज्ञानेश्वरी मुंडेंच्या कुटुंबाला सरंक्षण देण्याची खासदार सुप्रिया सुळेंची मागणी….
रोहित पवारांकडून केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी… नायडूंच्या राजीनाम्यासाठी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार… दादांच्या अपघाताच्या चौकशीप्रकरणी रोहित पवार आक्रमक…
ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा पडलाय का? माध्यमांच्या प्रश्नावर संजय राऊतांचं नो कमेंट… ठाकरेंच्या युतीत आलबेल नाही का? या प्रश्नावर राऊतांनी बोलणं टाळलं…
गेल्या ७ वर्षांतील उच्चांकी पातळीवर वायू प्रदूषण पोहोचले असून फेब्रुवारी महिन्यात प्रदूषणाचे सर्व विक्रम मोडीत निघाले आहेत. AQI १९७ वर पोहोचलंय जे अतीवाईट श्रेणीत पोहेचलंय, काल एक्युआय ३४४ त्या घरात होता.. वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईकरांचा श्वास कोंडत असून आरोग्य तज्ज्ञांनी मास्क वापरण्याचा आणि सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिलाय…
राहुल गांधी यांना लोकसभेच्या बाहेर काढण्याचा डाव आहे, असा गंभीर आरोप नुकताच संजय राऊत यांनी केला आहे.
विरोधी पक्षनेता पद दिले तर अनेक मुद्दे मांडले जातील, असेही संजय राऊत यांनी म्हटले. यावेळी ते नरेंद्र मोदी यांचे नाव घेतानाही दिसले.
मोदी पंतप्रधान झाल्यापासून विरोधी पक्षनेता देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
शरद पवारांना अस्वस्थता जाणवू लागल्यामुळे शरद पवार यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये ऍडमिट करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सूक्ष्म नियोजनावर भर दिला आहे. तब्बल ६ हजार स्वयंसेवकांना प्रशिक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ‘भोसला सैनिकी महाविद्यालया’शी अधिकृत करार करण्यात आला असून, वेगवेगळ्या टप्प्यांत विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. कुंभ पर्वासारख्या महासोहळ्यात स्वच्छता, वाहतूक नियंत्रण, आपत्ती व्यवस्थापन यासह एकूण पाच महत्त्वाच्या क्षेत्रांत हे विद्यार्थी आपले योगदान देणार आहेत. कुंभमेळ्यातील गर्दीचे व्यवस्थापन आणि नागरी सुविधा सुरळीत ठेवण्यासाठी या प्रशिक्षित मनुष्यबळाची मोठी मदत होणार आहे.
नागपुरात भरधाव कारने दिलेल्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू झाला आहे. भाग्यश्री कोठीवान (61 वर्षे) असे या मृत महिलेचे नाव आहे. तर हर्ष पालेवार वय 20 वर्षे असे कारचालकाचे नाव आहे. राणा प्रताप नगर पोलीस ठाण्याचे हद्दीतील राधे मंगलम चौक परिसरात शनिवारी रात्री हा अपघात झाला. ही कार इतकी वेगात होती की धडक बसतात महिला काही फूट दूर जाऊन पडली. तर कार विजेच्या डीपीला जाऊन धडकली. याप्रकरणी पोलिसांनी कारचालक हर्ष याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे
नागपूर : बारावीच्या पेपर फुटी प्रकरणात नागपूर विभागीय शिक्षण मंडळ ॲक्शन मोडवर आले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रप्रमुखांसह 21 जणांची दुसऱ्या परीक्षा केंद्रावर बदली करण्यात आली आहे. सिव्हिल्स येथील सेंट उर्सुला हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर बारावीचे केमिस्ट्री आणि फिजिक्सचे पेपर फुटल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर दक्षतेचा भाग म्हणून या परीक्षा केंद्राचे प्रमुख विवेक आतकुरकर यांच्यासह 21 वर्गखोली पर्यवेक्षकांना दुसऱ्या परीक्षा केंद्रावर हलविण्यात आले आहे. सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून हा निर्णय घेतल्याचे विभागीय शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे
नाशिकमधील प्रसिद्ध फिजिक्सवाला कोचिंग क्लासेसमध्ये परप्रांतीय शिक्षकांकडून होणाऱ्या कथित अरेरावीविरोधात आंदोलन करणाऱ्या मनसे विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. या क्लासमधील शिक्षक मराठी विद्यार्थ्यांशी उद्धटपणे वागतात आणि त्यांना सक्तीने हिंदीत बोलण्यास भाग पाडतात, अशी तक्रार करत मनसे सैनिकांनी व्यवस्थापनाला जाब विचारला होता. या आंदोलनादरम्यान एका व्यक्तीला मारहाण झाल्याचा प्रकार घडला होता. ज्यानंतर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन मनसे पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने आता या प्रकरणी अटकेत असलेल्या पदाधिकाऱ्यांची जामिनावर मुक्तता केली आहे.
नागपुरात आज भारत मुक्ती मोर्चाचा मोर्चा निघणार आहे. संघ मुख्यालयापर्यंत मोर्चा काढण्याची परवानगी पोलिसांकडे मागण्यात आली होती. मात्र संघ मुख्यालयपर्यंतची परवानगी पोलिसांनी नाकारली. त्यामुळे सध्या इंदोरा मैदान ते संविधान चौक असा मोर्चा काढण्यात येणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव संघ मुख्यालयपर्यंत मोर्चा काढण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. ओडिशा राज्यातील बाली यात्रा मैदानात आयोजित अधिवेशन रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारत मुक्ती मोर्चा आक्रमक झाला असून नागपुरात मोर्चा काढणार आहे. भारत मुक्ती मोर्चाचे वामन मेश्राम यांनी आंदोलनाची घोषणा केली आहे.
नागपूर मेट्रोच्या प्रवासी संख्या मोठी वाढ करण्यासाठी महामेट्रोने आता कंबर कसली आहे. महा मेट्रो आता 300 फिटर बसेस सुरू करणार आहे. जून अखेरपर्यंत डीपीआर तयार होणार असून राज्य सरकारकडे निधीची मागणी केली जाणार आहे. घरापासून मेट्रो स्टेशनपर्यंत आणि स्टेशनपासून कामाच्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी 300 फीडर बसेस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या प्रकल्पाचा अहवाल तयार करण्यासाठी पुणे येथील एका कंपनीची निवड करण्यात आली असून पुढील आठवड्यात त्यांना कामाचे आदेश दिले जातील. या ३०० बससाठी सुमारे 220 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी राज्य सरकारकडे निधीची मागणी केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर आता निवडणूक खर्चाचा तपशील सादर करण्यावरून १२ उमेदवारांच्या अडचणी वाढल्या आहेत. निवडणुकीत नशीब आजमावणाऱ्या एकूण ९९३ उमेदवारांपैकी ९८१ जणांनी आपला अधिकृत खर्चाचा अहवाल प्रशासनाकडे वेळेत सादर केला आहे. मात्र, अद्यापही १२ उमेदवारांनी खर्चाचा हिशोब दिलेला नाही. या प्रकाराची गंभीर दखल घेत प्रशासनाने या बाराही उमेदवारांना १५ दिवसांची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दिलेल्या मुदतीत खर्चाचा तपशील सादर करण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले असून, त्यानंतरही टाळाटाळ केल्यास संबंधित उमेदवारांवर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कडक कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. साधारण चार आठवडे हे विधानसभा अधिवेशन गाजणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत रणनीती ठरवली जाईल, ज्यानंतर महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडेल. विशेष म्हणजे, ६ मार्च रोजी दुपारी २ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा पहिला अर्थसंकल्प सादर करतील, तर विधान परिषदेत वित्त राज्यमंत्री आशीष जयस्वाल तो मांडतील. त्यामुळे या अधिवेशनाकडे आणि त्यातील घोषणांकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्याच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. आगामी चार आठवडे राज्याची विधानसभा आणि विधान परिषद या अधिवेशनामुळे गाजणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज सायंकाळी ५ वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. यामध्ये आगामी दिवसांतील रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडेल. ज्यामध्ये विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले जाईल. यंदा शुक्रवार ६ मार्च रोजी दुपारी २ वाजता राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मुख्यमंत्री म्हणून राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे, तर विधान परिषदेत वित्त राज्यमंत्री आशीष जयस्वाल अर्थसंकल्प मांडतील. यापूर्वी फडणवीसांनी २०२३-२४ चा अर्थसंकल्प वित्तमंत्री म्हणून मांडला होता. त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे लागून राहिले आहे. यासह देश-विदेश, महाराष्ट्र, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील बातम्या वाचण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.