Maharashtra News LIVE : सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर पिंपरी चिंचवड शहरात झळकले
Maharashtra News LIVE Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर आहेत. 'गोदा ते नर्मदा’ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. यासह महाराष्ट्र, देश-विदेश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES
-
पिंपरी चिंचवड शहर परिसरात देखील सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर
पिंपरी चिंचवड शहर परिसरात देखील सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर झळकताना दिसत आहेत. या बॅनर्समुळे नागरिकांचे लक्ष वेधले गेले असून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. शहरातील विविध ठिकाणी हे बॅनर लावण्यात आले आहेत., समर्थकांकडून आधीच विजयाचा आनंद साजरा केला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
-
बांधकाम कामगाराचे साहित्य बेकायदेशीर रित्या घेऊन जाणारा ट्रक पकडला, परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जालना जिल्ह्यातल्या परतुर मध्ये महाराष्ट्र इमारत व इतर कामगार मंडळाच्या लाभार्थ्यांचा संसार उपयोगी साहित्य बेकायदेशीर रित्या घेऊन जाणारा एक ट्रक स्थानिक सनियंत्रण समितीच्या दक्षतेने पकडण्यात आला. या ट्रकमध्ये बांधकाम कामगारांना मोफत दिले जाणार संसार उपयोगी साहित्य मोठ्या प्रमाणात भरून देण्यात येत होतं, याप्रकरणी चार संशयित आरोपींच्या विरोधात परतुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून हे साहित्य नेमकं कोणत्या ठिकाणी घेऊन जाण्यात येत होतं याचा अधिक तपास परतुर पोलिसांकडून करण्यात येत आहे, सध्या हा ट्रक परतूर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आलाय.
-
-
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी कृषी उत्पन्न बाजार समितीचे 17 संचालक ठरले अपात्र…..
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी कृषी उत्पन्न बाजार समितीचे 17 संचालक अपात्र ठरले आहेत. नियमबाह्य खर्च केल्याने संचालक अपात्र ठरल्याने अमरावती जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विविध कलमाचे उल्लंघण केले. उपविधीचे उल्लंघन सह अर्थसंकल्प बाबीत त्रुटी आढळल्या आहेत. आता बाजार समितीमध्ये प्रशासकाची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
-
परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, धक्कादायक प्रकार
जालना जिल्ह्यातल्या परतुर मध्ये महाराष्ट्र इमारत व इतर कामगार मंडळाच्या लाभार्थ्यांचा संसार उपयोगी साहित्य बेकायदेशीर रित्या घेऊन जाणारा एक ट्रक स्थानिक सनियंत्रण समितीच्या दक्षतेने पकडण्यात आला. या ट्रकमध्ये बांधकाम कामगारांना मोफत दिले जाणार संसार उपयोगी साहित्य मोठ्या प्रमाणात भरून देण्यात येत होतं, याप्रकरणी चार संशयित आरोपींच्या विरोधात परतुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून हे साहित्य नेमकं कोणत्या ठिकाणी घेऊन जाण्यात येत होतं याचा अधिक तपास परतुर पोलिसांकडून करण्यात येत आहे, सध्या हा ट्रक परतुर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आलाय.
-
मी कोणाच्याही विरोधाने थांबणारा माणूस नाही- संजय निरुपम
मी कोणाच्याही विरोधाने थांबणारा माणूस नाही. रिक्षा चालकांचे परवाने रद्द करू नका, असेही मोठे विधान संजय निरुपम यांनी केले आहे.
-
-
सोलापूर-मुंबई विमान सेवा आठवड्यातून फक्त दोन दिवस
सोलापूरमधील वाढत्या उष्णतेचा परिणाम विमानसेवेवरही दिसून येत असून, स्टार एअरची सोलापूर मुंबई थेट विमानसेवा आता आठवड्यातून केवळ दोन दिवसच चालवली जाणार आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे विमानाचा पेलोड (वाहून नेण्याची क्षमता) अपेक्षित प्रमाणात घेता येत नसल्याचे स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आले आहे. यामुळे १ मेपासून ही सेवा फक्त मंगळवार आणि गुरुवार या दोनच दिवशी उपलब्ध राहणार असून, हा बदल ३१ मेपर्यंत लागू राहणार असल्याची माहिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
-
मेळघाटमधील हरिसालमध्ये ट्रान्सफॉर्मर जळाल्याने पाणीपुरवठा बंद..
हरीसालमध्ये नागरिकांची तहान भागविण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा..सामाजिक कार्यकर्त्याचा पुढाकार. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने बॅनर बाजी करीत नागरिकांनी केला निषेध. वारंवार ट्रान्सफॉर्मर खराब होत असल्याने तक्रारी करूनही टाळाटाळ होत असल्याने नागरिक त्रस्त. महावितरणने ट्रान्सफॉर्मर दुरुस्त न केल्यास हरिसाल परतवाडा मार्गावर चक्काजाम करण्याचा नागरिकांचा इशारा..
-
सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर पिंपरी चिंचवड शहरात
पिंपरी चिंचवड शहर परिसरात देखील सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर झळकताना दिसत आहेत. या बॅनर्समुळे नागरिकांचे लक्ष वेधले गेले असून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. शहरातील विविध ठिकाणी हे बॅनर लावण्यात आले आहेत. समर्थकांकडून आधीच विजयाचा आनंद साजरा केला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
-
गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हलविण्यात आला
गेवराई शहरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या मधोमध शिवरायांचा हा पुतळा होता. अखेर पोलिस आणि नगर पालिका प्रशासनाची शिवप्रेमींशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर हा पुतळा हलवला जातोय. याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.
-
राहाता / अहिल्यानगर – नशेत मुलाकडून वडिलांची निर्घृण हत्या
राहाता शहरात मुलाकडून वडिलांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना महात्मा फुले नगर परिसरात घडली. नशेत मुलाने वडिलांच्या डोक्यात फरशी घालून खून केला यामुळे परिसरात खळबळ माजली असून भितीचे वातावरण आहे. पोलिसांनी आरोपी सचिन खैरे याला ताब्यात घेतलं.
-
बागेश्वर बाबा, गायकवाड यांच्या मुसक्या आवळा – सचिन खरात
बागेश्वर बाबा आणि आमदार गायकवाड यांच्या मुसक्या आवळा आणि त्यांचा कडेलोट करा असं वक्तव्य राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात यांनी केलं आहे.
-
लासलगाव – एसटी सवलतीच्या ओळखपत्रासाठी १९९ ऐवजी ५० रुपये जादा वसुली
लासलगाव (नाशिक) : एसटी सवलतीच्या ओळखपत्रासाठी १९९ ऐवजी ५० रुपये जादा वसुली., महिला एजंटंकडून पावतीशिवाय अतिरिक्त रक्कम मागणी करण्यात आली. यामुळे प्रवाशांचा संताप झाला असून पैसे देण्यास ठाम नकार दिला. चौकशीदरम्यान कॅमेरा चालू असल्याचे पाहताच एजंट महिलांनी प्रश्न टाळून काढला पळ. आगार व्यवस्थापक सविता काळे यांनी हस्तक्षेप करत शासन दरातच ओळखपत्र वाटप करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. जादा पैसे घेतल्यास परत करण्याचे आदेश दिले.
-
जळगाव जिल्ह्यात चार महिन्यांत ६३ जणांना डेंग्यूची लागण
जळगाव जिल्ह्यात चार महिन्यांत ६३ जणांना डेंग्यूची लागण झाली. जिल्ह्याभरातून २ हजार ७३७ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आसी, त्यात 63 जणांच्या रक्ताचे नमुने पॉझिटिव्ह आले. डेंग्यूची लागण झालेल्या काही रुग्णांवर उपचार करण्यात आले तर काही रुग्णांवर सरकारी दवाखान्यांमध्ये उपचार सुरू आहेत.
चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक १४ रुग्ण, एरंडोल येथे ६, पारोळा येथे ५, जळगाव शहरात ८, भुसावळ येथे ८, पाचोरा येथे ४ तर अमळनेर येथे ५ रुग्णांची नोंद
-
पुणे – वारजे परिसरात गोळीबार करणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात
वारजे परिसरात गोळीबार करणारे दोघेजण पोलिसांच्या ताब्यात. गोळीबारासाठी वापरलेली पिस्टल देखील पोलिसांनी जप्त केली. पूर्ववैमनस्त्यातून तून गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. गोळीबार करणाऱ्या सहा जणांपैकी प्रीतम ठोंबरे आणि साहिल राऊत दोघांना पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतलं.
-
बदलापुरात रिक्षाचालकांनी केले इसमावर वार!
बदलापुरात रिक्षाचालकांनी केले इसमावर वार. रिक्षाचा धक्का लागल्याचा जाब विचारल्यानं वाद झाल्यानंतर घडली घटना. पोलिसांकडून फक्त मारहाणीचा जामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
पालकांचा अजब प्रताप, 16 वर्षांच्या मुलीचं टक्कल करून घरात बसवलं
अमरावती – 16 वर्षीय तरूण मुलीचे पूर्ण केस कापून टक्कल करून घरात बसवलं.अमरावतीच्या वरूड पोलीस स्टेशन अंतर्गत घटना घडली आहे. मुलीवर मुलांची वाईट नजर नको म्हणून पालकांनी अजब प्रताप केला आहे. मुलीच्या तक्रारीवरून वरुड पोलिसात आई-वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या मुलीकडे एक मुलगा वाईट नजरेने पाहत होता, त्यामुळे मुलाविरुद्ध पोलिसांत तक्रार दे असे मुलीला तिच्या आई वडिलांनी सांगितलं होतं. त्यानंतर तिचे केस कापून छड केल्याचा तक्रार पीडित मुलीने आई-वडिलांविरुद्ध दिली.
-
कल्याण-डोंबिवलीत मंगळवारी 12 तास पाणी बंद
कल्याण-डोंबिवलीत मंगळवारी 12 तास पाणी बंद राहणार आहे. बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये देखभाल-दुरुस्तीच्या कामांमुळे मंगळवारी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. कल्याण, डोंबिवलीसह ग्रामीण भागालाही पाणीटंचाईचा फटका बसणार आहे. नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणीसाठा करून ठेवण्याचे आवाहन पालिकेने केलं आहे.
ठाण्यात मनसेच्या मध्यवर्ती कार्याच्या ठिकाणी अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना इशारा देणारे बॅनर झळकत आहेत. तुम्हा उपऱ्यांना मराठी येत नाही म्हणून बंदची हाक देऊन सामान्य जनतेला वेठीस धरणार असाल, तर याद राखा ही गाठ मनसेशी आहे हे कदापि सहन केले जाणार नाही…. खळ खट्याक…. अशा आशयाचे आशेचे बॅनर मनसे नेते अविनाश जाधव आणि शहर उपाध्यक्ष सुशांत डोंबे यांच्या वतीने लावण्यात आलेले आहेत. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांकडून फ्लेक्सबाजी करण्यात आली. “महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला भावी मुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार” असा फ्लेक्सवरती उल्लेख आहे. जळगाव जिल्ह्यात चार महिन्यांत ६३ जणांना डेंग्यूची लागण. जिल्ह्याभरातून 2 हजार 737 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली, त्यात 63 जणांच्या रक्ताचे नमुने पॉझिटिव्ह आले. यासह राज्यातील इतर ठळक घडामोडी या ब्लॉगमध्ये वाचू शकता.