Maharashtra News LIVE : भोंदू बाबाला ठेचून काढले पाहिजे – आमदार संजय गायकवाड
Maharashtra News LIVE Updates: राष्ट्रवादीत काल नाराजीनाट्य पाहायला मिळाले. सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर असताना काही वरिष्ठ नेत्यांनी चार हात लांब राहणेच पसंत केल्याचे समोर आले आहे. तर भोंदू खरातचा अजून एक प्रताप समोर आला आहे. त्याने एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. पक्षातील घटनेत बदल करून अध्यक्षांप्रमाणेच कार्याध्यक्षाला अधिकार देण्याच्या प्रकरणाने मोठी ठिणगी टाकल्याचे समोर येत आहे. काल सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर असतानाही काही वरिष्ठ नेत्यांनी या दौऱ्यापासून चार हात दूर असल्याचे दिसले. लवकरच या घडामोडी समोर येतील. तर भोंदूबाबा खरात याचा अजून खोलात गेला आहे. त्याच्याविरोधात अजून काही महिला समोर आल्या आहेत. त्याच्या लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांची संख्या अजून वाढली आहे. राज्यात अवकाळी पावसाने गेल्या चार दिवसांपासून थैमान घातले आहे. राज्यात सर्वदूर झालेल्या पावसाने गव्हासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. लवकरात लवकर पंचनामा करण्याची मागणी आता करण्यात येत आहे. तर काल पुण्याला पावसाने झोडपून काढल्याने अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली. काही घरात पाणी शिरले. ऐन उन्हाळ्यात पावसाने गेल्यावर्षीच्या मुसळधार पावसाची आठवण पुणेकरांना करून दिली. तर संसदेचे विशेष अधिवेशन पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
भोंदू बाबाला ठेचून काढले पाहिजे – आमदार संजय गायकवाड
एखादा भोंदू जर महिलांना फसवत असेल तर हा किळसवाणा प्रकार आहे. या माणसाला ठेचून काढले पाहिजे, खटला चालवून काहीही फायदा नाही. याची जीभ छाटली पाहिजे, हात छाटले पाहिजे, जेणेकरून कोणताही बाबा महिलांचे शोषण करणार नाही असे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.
-
एमएनजीएल गॅसचा पुरवठा जाणीवपूर्वक केला जात नसेल तर कडक कारवाई करु – उदय सामंत
उद्योजक आणि हॉटेल व्यावसायिकांना एमएनजीएल गॅस देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मात्र जाणीवपूर्वक आर्टिफिशियल तुटवडा निर्माण करण्याचा होत असेल तर सरकारकडून कडक कारवाई केली जाईल असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.
-
-
आम्ही कोणाचा जीव घेणारे लोक नाही – बच्चू कडू
कट रचणे हा आमचा धंदा नाही, आम्ही रक्तदान करणारे लोक आहोत, रक्त देणारे लोक आहोत, कोणाचा जीव घेणारे लोक नाही. आमदाराच्या भावाच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपांवर बच्चू कडू यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे.
-
वाशिमच्या रिसोड शहरात एस आय आर मॅपिंग करणाऱ्या बीएलओला मारहाण
वाशिमच्या रिसोड शहरात एस आय आर मॅपिंग करणाऱ्या बीएलओला मारहाण
बीएलओला तिघांकडून बेदम मारहाण
मारहाणीत बीएलओ नवनाथ मुंडे गंभीर जखमी
बीएलओवर वाशिम च्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू
मारहाणीनंतर एस आय आर मॅपिंग करत असलेल्या बिएलओंमध्ये भीतीचे वातावरण
प्रशासनाने संरक्षण देण्याची केली मागणी
-
जळगावात एटीएम मशीनवर चोरट्यांचा डल्ला
जळगावात एटीएम मशीनवर चोरट्यांचा डल्ला
जळगावात शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेलं एटीएम मशीन चोरीला
एटीएम मशीन चोरून नेत असताना चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद
पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू
-
परभणीत बदनामी करण्याची धमकी देत 43 वर्षीय महिलेवर अत्याचार
परभणीत बदनामी करण्याची धमकी देत 43 वर्षीय महिलेवर अत्याचार
घटनेनं जिल्ह्यात मोठी खळबळ
पीडित महिलेच्या तक्रारीनंतर नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
आरोपी दीपक मुदगलकर विरोधात गुन्हा दाखल
आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात
आरोपींची पोलिसांकडून चौकशी सुरू
-
50 हजार शेतकरी धान खरेदीच्या प्रतीक्षेत
50 हजार शेतकरी धान खरेदीच्या प्रतीक्षेत
वाढीव धान खरेदी उद्दिष्टाची मागणी
धान खरेदीला मर्यादा, उर्वरित शेतकऱ्यांची कोंडी कायम
10 लाख क्विंटल वाढीव उद्दिष्टावर शेतकऱ्यांची नजर
यावर आता राज्य शासन काय भूमिका घेते? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष
-
पुणे जिल्हा परिषदेत अंकिता पाटलांची सभापतीपदी निवड
पुणे जिल्हा परिषदेत अंकिता पाटलांची सभापतीपदी निवड. महिला आणि बालकल्याण समितीवर अंकिता पाटील यांची निवड. पुणे झेडपी विषय समित्यांच्या सभापतीपदांची घोषणा
-
विधानभवनात बनावट पास विक्री करणारे 6 कर्मचारी निलंबित होणार
विधानभवनात बनावट पास विक्री करणारे 6 कर्मचारी निलंबित होणार. विधान परिषदेत विरोधकांनी मुद्दा मांडल्यानंतर कारवाई. विधिमंडळ सचिवालयातील 4 आणि मंत्रालयातील 2 कर्मचारी. 7 जणांवर मरीन ड्राईव्ह पोलिसांमध्ये गुन्हा दाखल
-
पाकिस्तानमध्ये पेट्रोल दरात 137 पाकिस्तानी रुपयांची वाढ
पाकिस्तानमध्ये पेट्रोल दरात 137 पाकिस्तानी रुपयांची वाढ. पाकिस्तानात पेट्रोलचे दर सध्या प्रतिलिटर 458 रुपयांवर. पाकिस्तानात डिझेल 184ने वाढून 520 रुपये प्रतिलिटरवर. पाकमध्ये वाहतूक, अन्न आणि वीज दरातही वाढ होण्याची शक्यता
-
फरार कल्पना खरात विरोधात लुकआऊट नोटीस जारी
फरार कल्पना खरात विरोधात लुकआऊट नोटीस जारी. खरातची पत्नी कल्पना खरताचा परदेशात जाण्याचा मार्ग बंद. शिर्डी पोलीसांकडून कल्पना खरातविरोधात लुकआऊट नोटीस जारी. शिर्डी पोलिसांकडून फरार कल्पना खरातचा शोध सुरू
-
मालाडच्या मालवणीमध्ये लोक सिलेंडरसाठी रात्रीपासून रांगेत
मालाडच्या मालवणीमध्ये लोक सिलेंडरसाठी रात्रीपासून रांगेत. रांगेत असणाऱ्या लोकांनी सिलेंडर साखळीने बांधून ठेवले. मुंबईत मालाडच्या मालवणीमध्ये सिलेंडरसाठी मोठी रांग
-
अंजनगावातील वादावर तोडगा काढण्यासाठी गावचे सरपंच आणि महाराजांमध्ये चर्चा सुरु
अंजनगावातील वादावर तोडगा काढण्यासाठी गावचे सरपंच आणि महाराजांमध्ये चर्चा सुरु झाली आहे. दोन्ही गटातील लोकांनी बसून चर्चा करुन प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा सुरु आहे. पुतळ्याचा वाद मिटवण्यासाठी दोन्ही गटाचे लोक माजी आमदार राजन पाटलांकडे जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
-
अंजन गावात आंदोलनाला बसलेले लक्ष्मण हाके आक्रमक
माढा तालुक्यातील अंजन गावात आंदोलनाला बसलेले लक्ष्मण हाके आक्रमक झाले आहेत. आंदोलन स्थळावरून उठून लक्ष्मण हाके बॅरिगेटिंगच्या दिशेने धावले…
-
आता पर्यंत अनेक भोंदू बाबांचा आम्ही पर्दाफाश केला आहे – संजय बनसोडे
भोंदू अशोक खरात ही एक प्रवृत्ती आहे. आम्हाला अशा प्रवृत्तीचा नायनाट करायचा आहे. यासाठी ही परिषद आम्ही राज्यभर घेणार आहोत. आता पर्यंत अनेक भोंदू बाबांचा आम्ही पर्दाफाश केला आहे. मात्र अनेकदा पोलिस तक्रारी घेत नाहीत. शासनाने अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणखी कठोर करण्याची आवश्यकता आहे. कायद्यात ज्योतिष देखील कायद्यात घ्यावे. शासनाची आम्हाला मदत अपेक्षित आहे. आता हा लढा जनतेने हातात घ्यावा… असं वक्तव्य संजय बनसोडे यांनी केलं आहे.
-
माजी आमदार बच्चू कडू यांच्यासह अन्य दोघांवर अमरावतीच्या चांदूरबाजार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल…
माजी आमदार बच्चू कडू यांच्यासह अन्य दोघांवर अमरावतीच्या चांदूरबाजार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांचे चुलत भाऊ अभिजीत तायडे यांना ठार मारण्याचा कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अपघाताचा बनाव करून जिवानिशी ठार मारण्याचा कट रचल्याचा आरोप करण्यात आले आहेत. आमदार प्रवीण तायडे यांचे भाऊ अभिजित तायडे चांदूरबाजार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती.
-
लक्ष्मण हाकेंनी आजच्या आज गाव सोडावे अन्यथा उद्या मराठा समाज रस्त्यावर उतरणार; महेश डोंगरे यांचा इशारा
माढा तालुक्यातील अंजनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून सुरू असलेल्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर मराठा आणि धनगर समाजात जाणीवपूर्वक तेढ निर्माण करत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. हाके यांनी आजच्या आज अंजनगाव सोडावे, असा इशारा मराठा समाजाने दिला असून, तसे न झाल्यास उद्या राज्यभरातून लाखो मराठा बांधव अंजनगावच्या दिशेने कूच करतील, असे आवाहन करण्यात आले आहे. या संघर्षामुळे परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, दोन्ही समाजांतील वाद टाळण्यासाठी प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
-
नाशिकमध्ये धुक्याची चादर, द्राक्षं आणि कांदा पीक धोक्यात
राज्यात एकीकडे अवकाळी पावसाचे थैमान सुरु आहे. दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात धुक्याची चादर पसरल्यामुळे प्रामुख्याने द्राक्ष व कांदा पीक धोक्यात आले आहे. धुक्यांमुळे कांदा पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे द्राक्षे पिकांवर डाऊनी मिल्ड्यू, द्राक्षमण्यांचा गोडवा कमी होणे अशी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता महागडी औषधे फवारणी करण्याची वेळ येणार आहे..
-
आळंदी दुहेरी हत्याकांड, पसार आरोपीला काही तासांतच बेड्या; पिंपरी-चिंचवड पोलिसांची धडाकेबाज कारवाई
पुणे जिल्ह्यातील आळंदी जवळील हनुमानवाडी, ठाकरवस्ती येथे घडलेल्या धक्कादायक दुहेरी हत्याकांडातील आरोपीला पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. धनश्री केदारी आणि संगीता शिंदे या आजी-नातीची निर्घृण हत्या करून आरोपी विनायक तुकाराम भवारी हा घटनास्थळावरून कोणताही पुरावा न सोडता पसार झाला होता. मात्र, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आळेफाटा येथील पुणे-नाशिक हायवे बायपासवर त्याला जेरबंद केले. तपासादरम्यान आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून, पोलिसांनी अवघ्या काही तासांत या आव्हानात्मक गुन्ह्याचा छडा लावत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
-
येरमाळा यात्रेसाठी सोलापूर-धुळे महामार्गावर १० ते १५ किलोमीटरच्या रांगा
धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या यात्रेचा आज मुख्य पालखी सोहळ्याचा दिवस आहे. सुमारे १५ लाख भाविक दाखल झाले आहेत. भाविकांच्या या प्रचंड संख्येमुळे आणि महामार्गावर जड वाहनांना प्रवेश दिल्याने सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला १० ते १५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे. तासनतास प्रवासी आणि भाविक वाहतूक कोंडीत अडकून पडले आहेत. प्रशासनाने जड वाहनांचे नियोजन न केल्याने ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप केला जात आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस यंत्रणेवर मोठा ताण येत आहे.
-
सोलापुरात पुतळा अभिवादनावरून पेच: प्रशासन आणि आंदोलक आमनेसामने
सोलापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्याच्या मुद्द्यावरून सध्या प्रशासन आणि एका स्थानिक गटात वाद निर्माण झाला आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, शासकीय नियमांनुसार पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्याची प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर पार पडेल, मात्र संबंधित गटाने स्वतःच्या हस्ते हार घालण्याची परवानगी मिळावी, अशी आग्रही मागणी केली आहे. या मागणीमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन यावर काय सुवर्णमध्य काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
नंदूरबार – वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
नंदुरबार तालुक्यात काल वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी पिके आडवी पडली आहेत. ऐन काढणीच्या टप्प्यातील पिके उध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. पूर्व भागानंतर आता पश्चिम भागातही वादळी वारे आणि गारपिटीचा मोठा फटका बसला आहे.
-
आंबेगाव – भक्ष्याच्या शोधत बिबट्या पडला विहिरीत , बचाव कार्य सुरू
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव येथे रात्री भक्ष्याच्या शोधात फिरत असताना एक बिबट्या थेट विहिरीत पडल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली असून, बिबट्याला सुरक्षितरित्या विहिरीतून बाहेर काढण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
-
सोलापूर – माढा तालुक्यातील अंजन गावात मराठा समाज आक्रमक
सोलापूर – माढा तालुक्यातील अंजन गावात मराठा समाज आक्रमक झाला आहे. लक्ष्मण हाके यांनी रस्त्यावर ठिय्या दिल्यानंतर त्या ठिकाणी छत मारले जात असल्याने मराठा समाज आक्रमक झाले असून बेकायदेशीर सुरू असलेल्या आंदोलनाला छत मारू नका अशी मराठा समाजाची मागणी आहे.
-
मुंबईत रिअल इस्टेट मार्केटमध्ये बूम, घर खरेदीत विलक्षण वा
मुंबईत रिअल इस्टेट मार्केटमध्ये बूम, घर खरेदीत विलक्षण वाढ झाली आहे. नाईट फ्रँक इंडियाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राच्या रजिस्ट्रेशन आणि स्टँप विभागाने केलेल्या नोंदणीनुसार मार्च 2026 मध्ये मुंबई महानगर पालिका क्षेत्रात 15,516 हून अधिक प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन झाल्या आहेत. गेल्या 14 वर्षांतला मार्च महिन्यातील हा सर्वात मोठा आकडा आहे.
-
मालाडच्या – मालवणीमध्ये गॅस सिलिंडरसाठी मोठी रांग, कुलूप लावून लॉक केले सिलेंडर
मालाडच्या मालवणीमध्ये एलपीजी गॅस सिलिंडरसाठी मोठी रांग लागली आहे. अनेक लोकं सकाळपासून रिकामा गॅस सिलिंडर घेऊन एचपी गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभे आहेत. तर काही लोकं, चक्क काल रात्री 10 वाजल्यापासून रांगेत उभे आहेत आणि त्यांनी त्यांचे गॅस सिलिंडर कुलूप लावून लॉक केले आहेत.
-
पुण्यात झालेल्या अवकाळी पावसाने शहरातील 82 ठिकाणी झाडे कोसळली
काल झालेल्या पावसाने गंगाधाम चौकात होर्डिंग कोसळले आहे. शहरातील अनेक रस्त्यावर आज झाडे बाजूला काढण्याचे काम सुरू. पुण्यात झालेल्या अवकाळी पावसाने एक साठ वर्षे महिलेचा मृत्यू झाला आहे तर अनेक गाड्यांचे नुकसान शहरात वेगवेगळ्या भागात झाल्याचे पाहायला मिळत आहे.
-
न्याय देवतेने मला न्याय दिला- सतीश भोसले ऊर्फ खोक्या
मला या लोकांनी पूर्णपणे संपवलं, एका नेत्याला तर टार्गेट करण्यासाठी आदिवासी समाजातील एका पोराला टार्गेट केलं.
कुटुंबावर तीन वेळा हल्ला झाला कुणीही दखल घेतली नाही. आयुष्यभराच्या कमाईतून उभारलेलं माझं घर पाडलं माझ्या कुटुंबाने एक वर्ष कसे काढले असेल. आमच्या जिल्ह्यात सुरू असलेला जातिवाद आणि वेगळ्या प्रकारच्या राजकारणातून चार-पाच लोकं आहेत जे विष कालवायचं काम करतात. -
ठाणे ग्रामीण आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर…
ठाणे जिल्ह्यातील 716 मंजूर पदापैकी तब्बल 228 पदे रिक्त. अपुऱ्या मनुष्यबळामुळे रुग्णसेवा कोलमडली. ग्रामीण भागातील नागरिकांना तत्पर आणि दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याचे दावे ठाणे जिल्हा परिषदेकडून वारंवार केले जातात मात्र हे दावे केवळ कागदावरच असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे…
-
अवकाळीचा घाव; काढणीचा कांदा पाण्यात, शेतकरी उद्ध्वस्त
उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यात सलग चार दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीने थैमान घातलं आहे. काढणीला आलेला कांदा शेतातच पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचं वर्षभराचं अर्थकारण कोलमडलंय मोठा खर्च, काबाडकष्ट आणि आशा हि सारी स्वप्न उराशी असताना पण अवकाळी पावसाने सगळं पाण्यात गेलं.शेतात उभा असलेला कांदा अक्षरशः सडू लागलाय.
-
अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान
उन्हाळी कांद्याला सर्वाधिक फटका. अवकाळीमुळे संपूर्ण कांदा सडून जाण्याची भीती. नाशिकच्या मखमलाबाद मध्ये सर्वाधिक नुकसान. एकरी लाख रुपये खर्च. मात्र ऐन काढणीच्या वेळेतच कांदा खराब झाल्याने शेतकरी हवालदिल..
-
नाशिक पुन्हा हादरले, व्यावसायिकाकडे 12 लाखांच्या खंडणीची माहिती
नाशिकमध्ये आणखी एक सेक्स स्कँडल उघडकीस आले.व्यावसायिकाला मैत्रिणीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. 12 लाखांच्या खंडणीची मागणी केली. 10 हजार स्वीकारताना 4 संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात
-
घरात खूप कॅश यायची, खरातच्या मुलाने SIT चौकशीत धक्कादायक कबुली
भोंदू अशोक खराब प्रकरणात अत्यंत महत्त्वाचा खुलासा समोर आला आहे. सर्व डॅडला माहिती, मात्र घरात खूप कॅश यायची, खरातच्या मुलाने SIT चौकशीत धक्कादायक कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. SIT ने खरातच्या मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली होती. चौकशीदरम्यान मुलाने धक्कादायक कबुली दिली.
-
चिखलीत रेणुका देवीच्या वहन मिरवणुकीला रात्रीपासून सुरुवात
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील रेणुका देवीची यात्रा सुरू आहे. यात्रेचे दुसरे महत्वाचे आकर्षण म्हणजे रेणुका देवीची वहन मिरवणूक .. रेणुका देवीचे वहन मिरवणुक ला आरती नंतर सुरुवात झाली असून हजारो भाविकांनी याठिकाणी गर्दी केलीय.. रात्रीपासून ही वाहन मिरवणूक सुरू असून आज दुपारपर्यंत ही मिरवणूक परत मंदिरात पोहचन्याची शक्यत आहे. . संपूर्ण शहराला प्रदक्षिणा घातल्यावर वहनचा समारोप होत असतो, दरम्याने दर्शनासाठी भाविक गर्दी करतात आणि महिला सुद्धा देवीची ओटी भरभायसाठी गर्दी करतात.
-
कोकणाप्रमाणे धाराशिवमध्ये ही आंबा नुकसानीचे पंचनामे करून मदत दिली जाणार
धाराशिव जिल्ह्याला काही गेल्या काही दिवसात अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा मोठा तडाखा बसला. यामध्ये गहू ज्वारी या पिकासह फळबागांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. सर्वाधिक फटका आंबा द्राक्ष केळी या पिकांना बसला. मोठ्या प्रमाणात आंबा पिकाच नुकसान झाल्यामुळे कोकणाप्रमाणे आंबा पिकाचे पंचनामे करून बरी मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. शेतकऱ्यांकडून होत असलेल्या मागणीची पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना तसाच सूचना केल्या आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत मिळवून देणार असं सरनाईक यांनी सांगितले.
-
सतीश उर्फ खोक्या भोसलेची हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता
सतीश उर्फ खोक्या भोसले याला बीड न्यायालयाने हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातुन निर्दोष मुक्त केले आहे. एक वर्षापूर्वी सतीश उर्फ खोक्या भोसले याच्यावर ढाकणे पिता पुत्राचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.यानंतर त्याला छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात ठेवण्यात आले होते. काल बीड न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केल्यानंतर तो आज कारागृहातून बाहेर आला आहे.
तसेच एका व्यक्तीला बॅटने मारहाण केल्याचा सतीश भोसले याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या प्रकरणात देखील त्याच्यावर गुन्हा दाखल असून ते प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे सध्या तो बॅटने मारहाण केल्याच्या प्रकरणात जामिनावर आहे. तर हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातुन त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे. -
कल्याण रामबागमध्ये पहाटेची थरारक चोरी
भर रस्त्यालगत असलेल्या दुकानाचे शटर उचकटून काही मिनिटांत दुकान साफ करत चोरटा फरार झाला. संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली. भर रस्त्यावरील दुकान फोडल्याने खळबळ व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाढत्या चोरींनी चिंता वाढली. महात्मा फुले पोलीसांकडून तपास सुरू करण्यात आला.
-
जळगाव जिल्ह्यात अवकाळी पाऊस ,गारपीट मुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.रब्बीचे पीक जमीन दोस्त जवारी, मका गहू केळी ला मोठ्या प्रमाणात फटका मोठे नुकसान झाले आहे. मुक्ताईनगर भुसावळ बोदवड रावेर चोपडा अनेक भागांमध्ये अवकाळीचा आणि गारपीटीचा फटका बसला. आधीच नुकसानीची मदत नाही आणि आता पुन्हा एकदा गारपीट आणि अवकाळी चा फटका शेतकरी हवालदिल झाला आहे. तातडीने नुकसानीचे पंचनामे करून भरी मदत ची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे
-
बॉक्सिंग फेडरेशन अध्यक्ष पदावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये जुंपली
बॉक्सिंग फेडरेशन अध्यक्ष पदावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये जुंपली आहे. राहुल शेवाळे यांच्या निवडीच्या घोषणेवर प्रविण दरेकर यांचे आक्षेप दिसून आला. शेवाळेंना बॉक्सिंगमधील काय समजतं ? असा सवाल दरेकरांनी विचारला आहे. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी दरेकर यांची बॉक्सिंग फेडरेशन अध्यक्ष पदी निवड झाली होती. शेवाळे यांच्या निवडीचा प्रकार कायदा गुंडाळून झाला असा आरोप प्रविण दरेकर यांनी केला आहे.
-
जैन मुनी पद्मसागर यांच्याविरोधात पुण्यात तक्रार
महाराणी ताराबाईंबाबतच्या वक्तव्यावरून जैन मुनी पद्मसागर यांच्याविरोधात पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुण्यात अखंड मराठा समाजाने डेक्कन पोलीस ठाण्यात जैन मुनी पद्मसागर यांच्याविरोधात तक्रार अर्ज देण्यात आला आहे. छत्रपती महाराणी ताराबाई यांच्याबाबत अपमानास्पद आणि दिशाभूल करणारे वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ताराबाई जैन धर्मीय होत्या, असे विधान ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत मराठा समाजाकडून गुन्हा दाखल करून तात्काळ अटकेची मागणी करण्यात आली आहे.