AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनेक मंत्र्यांचे पत्ते कट होणार, मुख्यमंत्री वापरणार धक्का तंत्र? कॅबिनेटमध्ये लवकरच फेरबदल?

हे धक्का तंत्र फक्त भाजपच्या मंत्र्यांपुरतं मर्यादित असेल की एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसाठीही असेल याचीही चर्चा रंगली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे.

अनेक मंत्र्यांचे पत्ते कट होणार, मुख्यमंत्री वापरणार धक्का तंत्र? कॅबिनेटमध्ये लवकरच फेरबदल?
devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 15, 2025 | 2:34 PM
Share

राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता धक्का तंत्राचा वापर करण्याची शक्यता आहे. या धक्का तंत्राचा अनेक बड्या मंत्र्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. लवकरच राज्याच्या कॅबिनेटमध्ये मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत. या संकेतानुसार अनेक बड्या मंत्र्यांना आपली खुर्ची गमवावी लागणार आहे. तर अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे. हे धक्का तंत्र फक्त भाजपच्या मंत्र्यांपुरतं मर्यादित असेल की एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसाठीही असेल याचीही चर्चा रंगली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्या अनुषंगाने आता राज्याच्या कॅबिनेटमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे. लवकरच महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत. काही इतर पक्षातील दिग्गजांना पक्षात घेऊन मग त्यांना मंत्रिमंडळात घेऊन मंत्रिपद दिलं जाईल, असं बोललं जात आहे. अनेक मंत्र्‍यांचे पत्ते कट केले जातील. खांदे पालट होईल, अनेक नव्या चेहऱ्यांना कॅबिनेटमध्ये संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच यामुळे अनेक मंत्र्‍यांना धक्का बसणार असल्याचे बोललं जात आहे.

महायुतीत तणाव

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. महायुती सरकारमध्ये लवकरच मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असून अनेक विद्यमान मंत्र्यांचे पत्ते कट केले जातील, असे बोललं जा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या ‘धक्का तंत्रा’ची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. यापूर्वी केवळ भाजपच्याच मंत्र्यांना याचा फटका बसेल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही मंत्र्यांनाही याची झळ बसू शकते, असे बोललं जात आहे. यामुळे महायुतीतील तिन्ही घटक पक्षांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नवीन चेहऱ्यांना संधी देणार का?

या मंत्रिमंडळ फेरबदलात अनेक नव्या चेहऱ्यांना कॅबिनेटमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. पक्षसंघटनेत चांगले काम केलेल्या किंवा आपापल्या भागांमध्ये मजबूत पकड असलेल्या नेत्यांना मंत्रिपदे दिली जाऊ शकतात, असे संकेत मिळत आहेत. त्यासोबतच, “काही इतर पक्षातील दिग्गजांना पक्षात घेऊन मग त्यांना मंत्रिमंडळात घेऊन मंत्रिपद दिलं जाईल, असेही बोललं जात आहे. यामुळे विरोधकांमध्येही अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे.

शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.