Rain | राज्यात अनेक ठिकाणी वळीव बरसला, पुणे, नगर, नांदेड, जालन्यात जोरदार पाऊस

सातारा, सांगली, नांदेड, अहमदनगर, रत्नागिरी, पुणेसह अनेक भागांमध्ये वळवाचा पाऊस झाला.

Rain | राज्यात अनेक ठिकाणी वळीव बरसला, पुणे, नगर, नांदेड, जालन्यात जोरदार पाऊस

मुंबई : राज्याच्या अनेक भागात वळीव पावसाने (Maharashtra Pre-Monsoon Rain) हजेरी लावली आहे. सातारा, सांगली, नांदेड, अहमदनगर, रत्नागिरी, पुणेसह अनेक भागांमध्ये वळवाचा पाऊस झाला. कुठे सोसाटयाच्या वाऱ्यासह तर कुठे विजेच्या कडकडाटाने पाऊस झाला. त्यामुळे मे महिन्यात उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडाफार का होईना दिलासा (Maharashtra Pre-Monsoon Rain) मिळाला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी वळीव पाऊस

नांदेडमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. त्यामुळे वीज कोसळून एका महिलेचा मृत्यूही झाला. जालन्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह वळवाचा पाऊस झाला. नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. शिर्डीत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला. वाशिममध्येही सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस झाला. तर सोलापूरच्या बार्शीत वळील पावसाने हजेरी लावली.

पुण्यात हलक्या पावसाच्या सरी

पुणे शहरात कोथरुड, पाषाण, विद्यापीठ, शिवणे, वारजे परिसरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. ढगांच्या गडगडाटासह काही भागात मुसळधार पाऊस पडला.

पिंपरी-चिंचवडला वळील पावसाचा फटका

पिंपरी-चिंचवड परिसराला वळीव पावसाचा फटका बसला. सकाळपासून वातावरणात उकाडा जाणवत होता, मात्र अचानक धो-धो पाऊस सुरु झाला. या पावसाने कोरोना विषाणूची धास्ती अधिक वाढली आहे. या विषाणूचा थंड हवेत आणखी (Maharashtra Pre-Monsoon Rain) प्रादुर्भाव वाढतो.

अहमदनगरात वादळी वाऱ्यासह पाऊस

अहमदनगर शहराला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. गेल्या दोन-चार दिवसांपासून अहमदनगरातील नागरिक वाढलेल्या उकाड्यामुळे हैराण झाले होते. मात्र आज झालेल्या पावसामुळे त्यांना जरा दिलासा मिळाला आहे. नगर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही वळीव पावसाने हजेरी लावली. अचानक सुरु झालेल्या पावसामुळे नागरकरांची चांगलीच तारांबळ उडाली. तर उकाड्याने हैराण झालेल्या नगरकरांना काहीसा दिलासाही मिळाला. या पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले.

चिपळूणमध्ये वळील पावसाची हजेरी

वळीव पावसाने चिपळूणमध्ये हजेरी लावली आहे. चिपळूनमध्ये जोरदार पाऊस बरसला. गेल्या दोन दिवसांपासून चिपळूनमध्ये ढगाळ वातावरण होतं. काल तळकोकणात पावसानं हजेरी लावली होती. मात्र, आज पावसाने रत्नागिरीतही हजेरी लावली. आज सायंकाळी चिपळूणमध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली. उकाड्यानं हैराण झालेल्या रत्नागिरीकरांना या पावसामुळे थोडासा गारवा (Maharashtra Pre-Monsoon Rain) मिळाला.

संबंधित बातम्या :

पुण्यात जोरदार वाऱ्यासह तुफान पाऊस, मोबाईल टॉवर कोसळला

पाऊस तोंडावर, पण कापूस पडून, खरेदी न केल्यास 30 एप्रिलपासून आंदोलनाचा इशारा

राज्यात पुढील चार दिवसात विजांच्या कडकडाटासह गारा आणि पावसाचा अंदाजइ

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *