पाऊस तोंडावर, पण कापूस पडून, खरेदी न केल्यास 30 एप्रिलपासून आंदोलनाचा इशारा

कापूस खरेदीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. सर्व प्रतीच्या कापसाच्या खरेदीसाठी शेतकरी संघटनेनं आंदोलनाचा इशारा दिला आहे.

पाऊस तोंडावर, पण कापूस पडून, खरेदी न केल्यास 30 एप्रिलपासून आंदोलनाचा इशारा

पुणे : कापूस खरेदीसाठी शेतकरी संघटना (Farmers Association On Cotton Purchase) आक्रमक झाली आहे. सर्व प्रतीच्या कापसाच्या खरेदीसाठी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या 29 एप्रिलपर्यंत अंमलबजावणी करावी, अन्यथा 30 एप्रिलपासून आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (Farmers Association On Cotton Purchase) यांना निवेदनही पाठवलं आहे.

या निवेदनाच्या माध्यमातून घनवट यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मुख्यमंत्र्यापुढे मांडली. सरकारने केवळ एफएक्यू ग्रेडचा कापूस खरेदी करु नये. दोन ग्रेडमध्ये कापूस खरेदी करण्यात यावा, अशी मागणी घनवट यांनी केली. तसेच, गर्दी न करता जितक्या जास्त गाड्या स्विकारता येतील तितक्या स्विकाराव्यात, असंही त्यांनी या निवेदनात म्हटलं.

गरज भासल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा वापर करावा. सरकारने जिन ताब्यात घेऊन सर्व कापसाचे जिनिंग करुन गाठी बनवाव्यात, कपाशीला होणाऱ्या किडीनं घरात राहणे आणि झोपणे अशक्य झालं आहे. मात्र, खरेदी अभावी शेतकरी हवालदिल झाल्याचा घनवट यांचा आरोप आहे (Farmers Association On Cotton Purchase).

त्याचबरोबर शेतकऱ्यांनी खाजगी व्यापार्‍यास कापूस विकल्यास भावांतर योजनेअंतर्गत किमतीच्या फरकाची रक्कम देण्यात यावी. शेतकर्‍यांकडे शिल्लक कापूस एफएक्यू प्रतीत न बसणारा आहे. त्यामुळे हा नॉन एफएक्यू कापूस कुठे विकायचा? जिनिंगच्या करारात वाद झाल्यानं व्यापारी, जिन मालक कापूस खरेदीस तयार नाहीत. त्यामुळे कापसाला खरेदीदारच नसल्याचा आरोप घनवट यांनी केला.

सरकारने फक्त एफएक्यू प्रतीचाच कापूस खरेदी करावा आणि रोज एका केंद्रावर 20 गाड्याच स्विकारण्याचे आदेश दिल्याने शेतकरी अडचणीत आल्याचा आरोपही घनवट यांनी केला आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने कापूस खरेदीचा त्वरित निर्णय घ्यावा. नाहीतर लॉकडाऊनचे ( Lockdown in Maharashtra) नियम पाळून आंदोलन करण्याचा इशारा घनवट यांनी दिला आहे (Farmers Association On Cotton Purchase).

संबंधित बातम्या :

Plasma Therapy : कोरोनामुक्त झालेल्या तब्लिगीकडून प्लाझ्मा डोनेट, मुंबईकर तब्लिगीला पहिला मान

राज्यात पुढील चार दिवसात विजांच्या कडकडाटासह गारांसह पावसाचा अंदाज

मुंबईच्या महापौर झाल्या कोविड योद्धा, किशोरी पेडणेकर पुन्हा नर्सच्या भूमिकेत

पंढरपुरात बाळंतीणीला कोरोना, जुळ्या अर्भकांपैकी एक दगावलं

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *