AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सनरुफवाल्या कारमध्ये महिलेसोबत असं घडलं की… तुम्ही म्हणाल असा कसा मृत्यू होऊ शकतो?

ताम्हिणी घाटाजवळ धक्कादायक घटना घडली आहे... सनरूफ असलेल्या आलिशान कारमध्ये असं काही घडलं, ज्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. तुम्ही म्हणालं असा कसा मृत्यू होऊ शकतो?

सनरुफवाल्या कारमध्ये महिलेसोबत असं घडलं की... तुम्ही म्हणाल असा कसा मृत्यू होऊ शकतो?
फाईल फोटो
| Updated on: Oct 31, 2025 | 3:51 PM
Share

Raigarh Accident News : असं म्हणतात काळ आणि वेळ एकत्र आली की माणसाचं निधन होतं.. पण ती काळ आणि वेळ कोणाच्या आयुष्यात कधी येईल काहीही सांगता येत नाही. आता देखील असंच काही झालं आहे. सनरुफ असलेल्या कारमधून प्रवास करत असताना असं काही घडलं ज्यामुळे स्नेहल गुजराती नावाच्या महिलेचं निधन झालं. आपला मृत्यू असा होईल याची कधी स्नेहल हिने कल्पना देखील केली नसेल… सगळं ठीक होतं, हवामान उत्तम होतं, मार्गही परिपूर्ण होता. पण म्हणतात ना, जेव्हा मृत्यू येणार असतो तेव्हा तो शांतपणे येतो. मृत्यूशिवाय कोणालाही ते माहीत नाही.

स्नेहल हिच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं. ती गाडीत बसली होती, पण तिला या दुर्दैवाची कल्पनाही करता आली नव्हती. स्नेहल हिच्या निधनाने सर्वत्र खळबळ माजली आहे. तर तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.. तर जाणून घेऊ तेव्हा नक्की काय झालं…

डोक्यावर दगड पडल्याने स्नेहल हिचा मृत्यू

43 वर्षीय स्नेहल कारने आनंदाने प्रवास करत होती. पण ती ज्या सीटवर बसली होती त्यावर एक मोठा दगड पडला. धक्कादायक गोष्ट म्हणजे, दगडाने गाडीचं सनरूफ फोडलं आणि आनंदी असलेल्या स्नेहलचं जागीच निधन झालं. स्नेहलच्या मृत्यूने तिच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

कुठे घडली  धक्कादायक घटना…

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात घडलेल्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. एका मोठ्या दगडानं गाडीचं सनरूफ फोडलं आणि तो दगड महिलेच्या डोक्यावर पडला. यामुळे महिलेचं निधन झाल्याची घटना समोर आली. ही हृदयद्रावक घटना माणगाव-ताम्हिणी घाटावरील कोंडीथर गावाजवळ घडली आहे.

महिला कारमधून पुणे येथून माणगावच्या दिशेने प्रवास करत होता.. तेव्हा एका आलिशान कारच्या सनरूफमधून डोंगरावरून एक मोठा दगड कारवर पडला आणि गाडीचं सनरूफ तोडून महिलेच्या डोक्यावर कोसळला… यामध्ये महिलेचं निधन झालं आहे. ही घटना सनरूफ वापरणाऱ्या चालकांसाठी एक मौल्यवान धडा आहे.

Follow Us
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर CM
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर मुख्यंमत्र्यासोबतच्या विमान प्रवासाबाबत दिली मोठी अपडेट
इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा निर्णय; पदाधिकाऱ्यांन
Omraje Nimbalkar | इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा डाव; पदाधिकाऱ्यांना...
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून...
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून... उद्धव ठाकरेंनी सांगितली इनसाईड स्टोरी