औरंगाबाद: गुलाब चक्रीवादळामुळे मराठवाड्यात सोमवारी रात्री कहर माजवला. गेल्या 48 तासात मुसळधार पावसामुळे मराठवाडा विभागात 10 जणांनी जीव गमावला आहे. बीड जिल्ह्यात 3, उस्मानाबाद आणि परभणीत 2, जालना,नांदेड आणि लातूरमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर, मराठवाड्यासाठी पुढील 24 तास महत्वाचे आहेत. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याला हवामान विभागानं रेड अलर्ट दिला आहे. तर, मराठवाड्यातील उर्वरित जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.