AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुठे गाड्या पाण्यात, तर कुठे पुरजन्य परिस्थिती; पावसाचं रौद्ररूप दाखवणारे सहा व्हीडिओ…

Maharashtra Rain Update : रायगडमध्ये घरांमध्ये पाणी, मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक विस्कळित; चिपळूणमध्ये हाहा: कार, महाराष्ट्रातील पावसाचा आढावा घेणारे व्हीडिओ...

कुठे गाड्या पाण्यात, तर कुठे पुरजन्य परिस्थिती; पावसाचं रौद्ररूप दाखवणारे सहा व्हीडिओ...
| Updated on: Jul 19, 2023 | 3:51 PM
Share

मुंबई : कालपासून पावसाचा जोर वाढला आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाऊस पडतो आहे. अशात राज्यातील विविध भागातून काळजाचा ठोका चुकवणारी दृश्य समोर येत आहेत. मुंबईतील काही भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. रेल्वे सेवा विस्कळित झाली आहे. तर कोल्हापूरमध्ये पर्यटक अडकून पडले आहेत. राज्यातील विविध भागातील पावसाचा आपण व्हीडिओच्या माध्यमातून आढावा घेऊयात…

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील घोडबंदर वर्सोवा ब्रिज खालील वाहतूक विस्कळीत झाली आहे. वर्सोवा ब्रिज खाली ठाण्याकडून येणाऱ्या आणि जाणाऱ्या मार्गिकेवर मोठमोठे खड्डे आणि त्यात पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. अहमदाबादहून मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळित झाली आहे. वर्सोवा ब्रिज ते काश्मीरापर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे.

कोकणात मागच्या दोन दिवसांपासून तुफान पाऊस बरसतोय. रत्नागिरीतही जोदार पाऊस कोसळतोय. चिपळूणमध्ये पूरजन्य परिस्थिती पाहायला मिळत आहे. चिपळूणमध्ये NDRF ची टीम दाखल झाली आहे. बहादूर शेख नाका इथे अडकलेल्या एका व्यक्तीला त्यांनी बाहेर काढलं आहे.

कोल्हापूरमध्येही धुवाधार पावसामुळे राऊतवाडी धबधब्याने रौद्ररूप धारण केलं आहे. राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधब्याचा प्रवाह वाढला आहे. पर्यटकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे. राऊतवाडी धबधबा खूप उंचावरून मोठ्या प्रमाणात कोसळत आहे.

जळगाव जिल्ह्यात रात्रीपासून ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. सातपुडा पर्वत रांगेत होत असलेल्या पावसामुळे नदी नाले ओसाडून वाहत आहेत. गावातील नदी नाल्यांना पूर आल्याने पूर पाहण्यासाठी देखील नागरिकही गर्दी करत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या येलो अलर्ट रात्रीपासून मुसळधार पाऊस चालू आहे. मुक्ताईनगर रावेर भुसावळ पाऊस सुरू आहे.

पनवेलच्या गाढी नदी पाणी पात्रात वाढ झाली आहे. पनवेल शहरात देखील रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. उसरली, शिवकर देखील गावात पाणी शिरलं आहे. कबीर स्थान देखील पाण्याच्या विळख्यात आलं आहे.

रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा नदीला पूर आला आहे. नदीच्या शेजारी असलेल्या आपटा गावात पाणी शिरलं आहे. दोन दिवसांपासून गावात पुराचं पाणी शिरलं आहे. त्यामुळे गावातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.