Marathi News Live Update : खासदार शशी थरूर काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार

| Updated on: Nov 30, 2022 | 11:20 AM

Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Marathi News Live Update : खासदार शशी थरूर काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार
Big breakingImage Credit source: tv9

आज दिनांक 19 सप्टेंबर 2022 जाणून घेणार आहोत राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडी. एकीकडे राज्यात वेदांतावरून वातावरण तापले आहे. तर दुसरीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे हे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. तसेच आज राज्याच्या विविध जिल्ह्यातील 547 ग्रामपंचायतींचा निकाल लागणार आहे. या निवडणुकीचं महत्त्वाचं वैशिष्ट म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर पहिल्यांदाच सरपंचपदाची निवड थेट जनतेमधून होणार असल्याने,  या ग्रामपंचायत निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या निकालांकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. पुणे, नाशिक, नांदेड, धुळे, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, या जिल्ह्यांसह  एकूण 16 जिल्ह्यांमधील ग्रामपचायत निवडणुकीची आज मतमोजणी होणार आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 28 Sep 2022 10:43 PM (IST)

    टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या T20 सामन्यात दणदणीत विजय

    टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या T20 सामन्यात दणदणीत विजय मिळवला. तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफील्ड स्टेडियमवर आज पहिला सामना झाला. टीम इंडियाने या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेवर 8 विकेट राखून सहज विजय मिळवला. तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे.

  • 19 Sep 2022 09:15 PM (IST)

    खासदार शशी थरूर काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार

    खासदार शशी थरूर काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत.  हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडून शशी थरूर यांना निवडणूक लढविण्यास ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळली आहे.  या निमित्ताने तब्बल 22 वर्षांनंतर काँग्रेसला निवडलेला अध्यक्ष मिळणार आहे.

  • 19 Sep 2022 05:12 PM (IST)

    ग्रामपंचायत निकालावर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

    राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँगेस आणि काँग्रेस पक्षाने सर्वाधिक ग्रामपंचायती मिळवल्या असल्याचा दावा आता राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. ग्रामपंचायतच्या निवडणुक ही चिन्हावर लढवली जात नाही. त्यामुळे असा कुणी दावा करत असेल तर ते चुकीचे आहे असा टोला जयंत पाटील यांना भाजपा आणि शिंदे गटाला लगावला आहे.

  • 19 Sep 2022 04:50 PM (IST)

    ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपाचं नंबर वन

    ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपाचं नंबर वन आली आहे. महाराष्ट्रातील जनतेने भाजपालाच कौल दिल्याचे ट्विट भाजप नेते केशव उपाध्याय यांनी केले आहे.  भाजपा २७४, शिवसेना(शिंदे) ४१, उध्दव ठाकरे गट १२, काँग्रेस ३७ तर  राष्ट्रवादीने ६२ ठिकाणी विजय मिळवला आहे. 

  • 19 Sep 2022 04:13 PM (IST)

    पाकिस्तानात महापुराच मोठ संकट; WHO ने व्यक्त केली चिंता

    पाकिस्तान देशात सध्या महापुराच मोठ संकट आहे.  WHO ने याबबात चिंता व्यक्त केली आहे.  महापुराच्या संकटानंतर संपूर्ण पाकिस्तानात रोगराईचं संकट ओढावू शकते.  संसर्गजन्य रोग अतिशय वेगाने संक्रमित होण्याची चिंता WHO ने व्यक्त केली आहे.  पाकिस्तान देशाने योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन WHO ने केले आहे.

  • 19 Sep 2022 02:05 PM (IST)

    भोर तालुक्यातील दोन्ही ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा 

    भोरमध्ये राष्ट्रवादीचा काँग्रेस आमदार संग्राम थोपटेना धक्का

    भोर तालुक्यातील दोन्ही ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा

    तालुक्यातील भोलावडे आणि किवत या दोन ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

  • 19 Sep 2022 01:01 PM (IST)

    नाशिक जिल्हा ग्रामपंचायत निकाल अपडेट

    एकूण ग्रामपंचायत- 82

    शिवसेना - 02

    शिंदे गट - 00

    भाजप - 03

    राष्ट्रवादी - 17

    काँग्रेस - 01

    माकप - 03

    इतर  -01

  • 19 Sep 2022 12:06 PM (IST)

    राज ठाकरे लाईव्ह

  • 19 Sep 2022 11:56 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यातील पाचही ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर

    अमरावती जिल्ह्यातील पाचही ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर

    पाच ग्रामपंचायतमध्ये तीन काँग्रेस एक प्रहार व एका ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा

    उंबरखेड ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी काँग्रेसचे नितीन कळंबे विजयी

    घोटा ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी काँग्रेसच्या रुपाली राऊत विजयी

    कवाडगव्हाणमध्ये सरपंचपदी काँग्रेसच्या मोहीनी चौधरी विजयी

    चांदूरवाडी ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी भाजपच्या वर्षा माताडे विजयी

    हरिसाल ग्रामपंचायतीमध्ये प्रहारचे विजय रामेश्वर दारशिंबे विजयी

    अमरावती जिल्ह्यात शिवसेना, राष्ट्रवादी व शिंदे गटाला एकही जागा नाही

  • 19 Sep 2022 11:25 AM (IST)

    नंदूरबार जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक निकाल

    नंदूरबार जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक निकाल

    एकुण ग्रामपंचायती - 149

    शिवसेना -  0

    शिंदे गट -  6

    भाजप-  24

    राष्ट्रवादी- 0

    काँग्रेस- 5

    स्थानिक विकास आघाडी -  3

  • 19 Sep 2022 11:23 AM (IST)

    नाशिक जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक निकाल

    नाशिक जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक निकाल

    एकुण ग्रामपंचायत- 16

    शिवसेना - 2

    शिंदे गट - ००

    भाजप- 1

    राष्ट्रवादी- 3

    काँग्रेस- 1

    इतर-००

  • 19 Sep 2022 11:04 AM (IST)

    जळगाव ग्रामपंचायत निवडणूक निकाल अपडेट

    जळगाव ग्रामपंचायत निवडणूक निकाल अपडेट

    जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसनं खातं उघडलं,

    सत्रासेन ग्रामपंचायतीच्या 11 पैकी 10 जागा आणि सरपंच पदावर बाजी

    शिवसेनेनंही खातं उघडलं, बोरमळी-देव्हारी ग्रुपग्रामपंचायतीत शिवसेनेचा सरपंच

  • 19 Sep 2022 10:42 AM (IST)

    ग्रामपंचायत निवडणूक निकाल; आतापार्यंतच्या निकालात भाजप सर्वात मोठा पक्ष

    आतापार्यंतच्या निकालात भाजप सर्वात मोठा पक्ष

    शिवसेनेकडे सर्वात कमी ग्रामपंचायती

    भाजप 27 शिंदे गट 5 शिवसेना 4 काँग्रेस 8 राष्ट्रवादी 19 इतर 10

  • 19 Sep 2022 10:40 AM (IST)

    अकोले ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

    अकोले ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला सरुवात

    41  सरपंचपदासाठी 175 उमेदवार रिंगणात

    4 ग्रामपंचायत बिनविरोध

    सावरकुटे, शेलद, जामगाव , खुंटेवाडी या ग्रामपंचयात बिनविरोध

  • 19 Sep 2022 09:44 AM (IST)

    संजय राऊतांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

    संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी आज संपणार

    संजय राऊतांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

    संजय राऊतांना मुंबई सत्र न्यायालयासमोर हजर केले जाणार

    संजय राऊतांच्या जामिनाला ईडीचा विरोध

  • 19 Sep 2022 08:59 AM (IST)

    खा. हेमंत गोडसेंचा शिंदे गटात प्रवेश

    शिंदे गटाचा पुन्हा ठाकरे गटाला धक्का

    खा. हेमंत गोडसे, भाऊलाल तांबडे यांचा शिंदे गटात प्रवेश

    शिंदे गटाकडून नाशकात देखील नियुक्त्या सुरू

    नियुक्त्या सुरू केल्याने ठाकरे गटाची चिंता वाढली

  • 19 Sep 2022 08:34 AM (IST)

    लम्पीचे देशभरात थैमान, 82 हजार जनावरांचा मृत्यू

    लम्पीचे देशभरात थैमान, 82 हजार जनावरांचा मृत्यू

    राज्यात 187 जनावरांचा लम्पीमुळे मृत्यू

    उपाययोजनेसाठी प्रत्येक जिल्ह्याला एक कोटी

  • 19 Sep 2022 07:36 AM (IST)

    ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

    ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांच्या पार्थिवावर आज लंडनमधल्या वेस्ट मिनस्टर हॉलमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या अंत्यसंस्कारासाठी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह अमेरिकेचे अध्यक्ष जो. बायडन आणि जगातल्या महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार आहेत या अंत्यसंस्कारासाठी 2000 मान्यवर उपस्थित राहणार असून, 6000 पेक्षा जास्त सैनिक तैनात करण्यात आले आहेत.

Published On - Sep 19,2022 7:32 AM

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.