AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्रभर दोन मुलींना घरात उलटं टांगलं… त्यानंतर जे घडलं त्याने सांगली हादरली, नराधम बाप…

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात एका क्रूर पित्याने आपल्या दोन अल्पवयीन मुलींना चोरीच्या संशयातून रात्रभर खुंटीला उलटं टांगले. या अमानुष शिक्षेमुळे एका दहा वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुसरी १३ वर्षांची मुलगी गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे. दादू यमगर नावाच्या या पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या घटनेमुळे संपूर्ण तालुका सुन्न झाला आहे.

रात्रभर दोन मुलींना घरात उलटं टांगलं… त्यानंतर जे घडलं त्याने सांगली हादरली, नराधम बाप…
सांगलीत पित्याची मुलींना जीवघेणी शिक्षाImage Credit source: TV9
| Updated on: Mar 27, 2026 | 7:39 AM
Share

आई-वडील हे मुलांसाठी देवास्वरूप असतात, असं म्हटलं जातं. त्यांची काळजी घेणं, वाईट गोष्टींपासून त्यांना वाचवणं, संरक्षण करणं, हे आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी आई-वडील करतात. पण हेच पालक मुलांसाठी काळ ठरले तर? सांगलीत असंच काहीस घडलं आहे. दोन मुलींसाठी त्यांचे वडील हेच काळ ठरले, अगदी शुल्लक कारणावरून त्या पित्याने दोन्ही लहान मुलींसोबत जे केलं त्याने अख्खं गाव हादरलं आहे. त्याचा कारनामा वाचून मन अगदी सुन्न होईल.

चोरी केल्याच्या संशयातून एका इसमाने त्याच्या दोन्ही लहान मुलींना उलटं टांगून ठेवलं, या भयानक प्रकारामुळे एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दुसरीची तब्येत गंभीर असल्याचे समजते.आटपाडी तालुक्यामध्ये हा संतापजनक प्रकार घडला आहे. किरकोळ कारणावरून जन्मदात्यानेच आपल्या लेकीचा जीव घेतल्याने संपूर्ण तालुक्यात प्रचंड संताप आणि खळबळ उडाली आहे.

नेमकं घडलं तरी काय ?

मिळालेल्या माहितीनुसार, आटपाडी तालुक्याच्या बनपुरी मध्ये हा अतिशय भयानक आणि संतापजनक प्रकार घडला आहे. दादू यमगर असं क्रूर पित्याचं नावं आहे. यमगर यांच्या घराशेजारी राहणाऱ्या एका कुटुंबाने, त्यांच्या दोन्ही मुलींवर संशय घेत त्यांच्यावर आल लावला होता. मात्र या घटनेमुळे संतापलेल्या दादू यमगर याने, त्याच्या अवघ्या 10 आणि 13 वर्षांच्या मुलींना जीवघेणी शिक्षा केली. त्याने दोन्ही मुलींना घरात रात्रभर खुंटीला उलट टांगून ठेवलं. या भयानक शिक्षेनंतर एका मुलीचा तडफडून मृत्यू झाला,तर दुसऱ्या मुलीचीही प्रकृती अत्यंत गंभीर असून तिच्यावर आटपाडीतील रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत.

दरम्यान आटपाडी पोलिसांकडून याबाबत कोणत्याही प्रकारचा तक्रार झाली नसल्याचं पोलीस निरीक्षक विनायक बहिर यांनी सांगितले आहे. या प्रकरणी निर्दयी दादू यमगर या बापाला आटपाडी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. मात्र या भयानक घटनेने आटपाडी तालुका सुन्न झाला आहे. मुलींना मिळालेल्या जीवघेण्या शिक्षेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

नवरा-बायकोच्या किरकोळ भांडणातून मोठा वाद; धारदार शस्त्राने हल्ला, तिघे गंभीर जखमी

पुण्यातील  मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवरा-बायकोच्या किरकोळ भांडणातून मोठा वाद निर्माण होऊन त्याचे हिंसक रूपांतर झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली . या प्रकरणात शिवीगाळ करत धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याने तिघेजण गंभीर जखमी झाले.

नवरा-बायकोमधील किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. त्यानंतर आरोपींनी एकत्र येत तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला केला .या घटनेत तक्रारदार रोहितसिंग भोंड, त्यांचे वडील सुरजीतसिंग भोंड तसेच भाऊ रोनकसिंग भोंड हे गंभीर जखमी झाले. जखमींवर सध्या पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

Follow Us
खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासूद यांचा खळबळजनक खुलासा
खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासूद यांचा खळबळजनक खुलासा.
चंद्रकांत खैरे यांचा अघोरी पूजेबाबत धक्कादायक दावा, राजकीय वर्तुळात...
चंद्रकांत खैरे यांचा अघोरी पूजेबाबत धक्कादायक दावा, राजकीय वर्तुळात....
आपल्या वयाच्या आधीच दातांचं वय वाढतं? कसं? तुमचं डेंटल एज
आपल्या वयाच्या आधीच दातांचं वय वाढतं? कसं? तुमचं डेंटल एज.
दातांचे वय वाढण्यापूर्वी व्हा सावध; आजच तुमचं डेंटल एज तपासा
दातांचे वय वाढण्यापूर्वी व्हा सावध; आजच तुमचं डेंटल एज तपासा.
इराण-इस्त्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय
इराण-इस्त्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय.
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल विक्रीबाबत मोठा निर्णय
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल विक्रीबाबत मोठा निर्णय.
भोंदू बाबा अशोक खरातला पहिला सर्वात मोठा दणका... अखेर...
भोंदू बाबा अशोक खरातला पहिला सर्वात मोठा दणका... अखेर....
चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून जाणार की राहणार?
चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून जाणार की राहणार?.
भोंदूबाबा खरात याच्या वडिलांच्या दशक्रिया पत्रिकेत रुपाली चाकणकरचे नाव
भोंदूबाबा खरात याच्या वडिलांच्या दशक्रिया पत्रिकेत रुपाली चाकणकरचे नाव.
राज्यसभेच्या सीटवरून प्रियंका चतुर्वेदी नाराज?, संजय राऊत काय म्हणाले?
राज्यसभेच्या सीटवरून प्रियंका चतुर्वेदी नाराज?, संजय राऊत काय म्हणाले?.