AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बँक हमीपत्रांवर आता स्वतंत्र प्रवर्गानुसार मुद्रांक शुल्क, महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात महत्त्वाचे बदल

मुंबई, दि. 7 : राज्यातील वाणिज्यिक व्यवहार, शासकीय करार आणि पायाभूत प्रकल्पांमधील बँक हमीपत्रांच्या मुद्रांक शुल्काबाबतचे जुने जाचक नियम बदलण्यात आले आहेत. बँक हमीपत्रावर आता स्वतंत्र प्रवर्गानुसार मुद्रांक शुल्क आकारण्यात येणार असून, महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम (1958) मध्ये सुधारणा करणारे महत्त्वपूर्ण विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आले. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधेयक मांडले. पूर्वी काय […]

बँक हमीपत्रांवर आता स्वतंत्र प्रवर्गानुसार मुद्रांक शुल्क, महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात महत्त्वाचे बदल
Mudrank Rule ChangeImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 07, 2026 | 10:26 PM
Share

मुंबई, दि. 7 : राज्यातील वाणिज्यिक व्यवहार, शासकीय करार आणि पायाभूत प्रकल्पांमधील बँक हमीपत्रांच्या मुद्रांक शुल्काबाबतचे जुने जाचक नियम बदलण्यात आले आहेत. बँक हमीपत्रावर आता स्वतंत्र प्रवर्गानुसार मुद्रांक शुल्क आकारण्यात येणार असून, महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम (1958) मध्ये सुधारणा करणारे महत्त्वपूर्ण विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आले. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधेयक मांडले.

पूर्वी काय नियम होता ?

यापूर्वी बँक हमी आणि वित्तीय हमीच्या संलेखांसाठी कायद्याच्या अनुसूची-एक मध्ये कोणताही स्वतंत्र प्रवर्ग निश्चित करण्यात आला नव्हता. त्यामुळे अशा हमीपत्रांवर अनुच्छेद 54 नुसार ‘प्रतिभूती बंधपत्रांप्रमाणे’ पूर्ण मुद्रांक शुल्क आकारले जात असे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जेव्हा या हमीपत्रांचे नूतनीकरण केले जाई किंवा मुदतवाढ दिली जाई, तेव्हा मूळ रक्कम समान असली तरीही पुन्हा एकदा पहिल्या संलेखाएवढेच पूर्ण मुद्रांक शुल्क वसूल केले जात होते. यामुळे उद्योग क्षेत्रावर दुहेरी आर्थिक बोजा पडत होता.

आता काय बदल झाला?

नवीन कायद्यानुसार आता बँक आणि वित्तीय हमीपत्रांच्या संलेखांसाठी एक ‘स्वतंत्र अनुच्छेद’ समाविष्ट करण्यात आला आहे. यामुळे वेगवेगळ्या प्रवर्गांनुसार मुद्रांक शुल्काचे सुयोग्य आणि स्वतंत्र दर निश्चित केले जातील. याता फायदा राज्यातील हजारो लोकांना होणार आहे.

महत्त्वाचा बदल

बँक हमीपत्राच्या नूतनीकरणाच्या किंवा मुदतवाढीच्या वेळी जर हमीची रक्कम बदलली नसेल, तर आता पुन्हा पूर्ण मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही. अशा नूतनीकरणासाठी आता अत्यंत कमी मुद्रांक शुल्क आकारण्याची कायदेशीर तरतूद करण्यात आली आहे. या थेट आणि महत्त्वपूर्ण बदलामुळे उद्योग व व्यवसाय क्षेत्राला मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून, नूतनीकरण प्रक्रियेतील पारदर्शकता वाढणार आहे. त्याच वेळी, या सुलभतेमुळे बँक हमीपत्रांचा वापर वाढून शासनाच्या महसुलातही सकारात्मक वाढ होणार आहे.

Follow Us
नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर
Mumbai Heat Wave : मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर, हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी
केंद्रीय पथक आज शेतीच्या बांधावर; दुष्काळी स्थितीचा अहवाल थेट.....
Maharashtra Drought : केंद्रीय पथक आज शेतीच्या बांधावर; दुष्काळी स्थितीचा अहवाल थेट दिल्लीत पाठवणार
महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांतून 25 लाख? महापालिकेच्या....
Mumbai Ritu Tawade : महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांतून 25 लाख? मुंबई महापालिकेच्या प्रस्तावावरून वाद 
सोने-चांदीच्या आयातीवर तब्बल एवढे टक्के कर लागू होणार
Gold-Silver : सोने-चांदीच्या आयातीवर तब्बल एवढे टक्के कर लागू होणार; सरकारच्या निर्णयाचा नेमका अर्थ काय?
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाना यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
Nana Patekar Passes Away : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
Nana Patekar Passes Away | कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या..
Shivsena Supreme Court Hearing : उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या वकिलांनी पक्षाच्या घटनेवरच उपस्थित केला सवाल, म्हणाले...
पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत...
Pune Vidhan Parishad Election : पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत चर्चा व्हायला हवी होती... प्रफुल पटेल यांचा रोख नेमका कोणाकडे?
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ....
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ सोडण्याचा इशारा, नेमकं काय घडलं?