Maharashtra Weather Alert : विदर्भातल्या ‘या’ जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, नागपूर हवामान विभागाचा अंदाज

विदर्भातील अकोला, चंद्रपूर जिल्ह्यातील उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. Vidarbha Weather Alert Update

  • गजानन उमाटे, टीव्ही 9 मराठी, नागपूर
  • Published On - 14:17 PM, 3 Mar 2021
Maharashtra Weather Alert : विदर्भातल्या 'या' जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, नागपूर हवामान विभागाचा अंदाज
प्रातिनिधीक फोटो

नागपूर: महाराष्ट्रात उन्हाळ्याच्या झळा बसू लागल्या आहेत. विदर्भातील अकोला, चंद्रपूर जिल्ह्यातील उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात यंदा सरासरीपेक्षा तापमान जास्त राहणार असल्याची शक्यता नागपूर हवामान विभागानं वर्तवली आहे. नागपूर हवामान विभागाचे डायरेक्टर मोहनलाल शाहू यांनी याबाबत माहिती दिली आहे. राज्यात मंगळवारी अकोला जिल्ह्यात सर्वात जास्त तापमानाची नोंद करण्यात आली होती. महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्णता जाणवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे यंदा मार्च ते मे या काळात दिवसा आणि रात्रीही उष्णता वाढणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (Maharashtra Vidarbha Weather Alert Update heatwave in Akola and Chandrapur)

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तापमानवाढ

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच यंदा विदर्भातील तापमानात वाढ झालीय. विदर्भातील चंद्रपूर, वर्धा, नागपूर यासहं अनेक जिल्ह्यात सरासरी तापमानापेक्षा जास्त तापमान आहे. उद्यापासून चंद्रपूर आणि अकोला जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. यंदाच्या उन्हाळ्यात विदर्भात तापमान 45 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त जाण्याची शक्यता आहे., अशी माहिती नागपूर हवामान विभागाचे संचालक मोहनलाल शाहू यांनी दिली.

सरासरी पेक्षा तापमान जास्त राहणार

नागपूर हवामान विभागानं उद्यापासून विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. विदर्भात सरासरीपेक्षा 4 ते 5 अंश सेल्सिअस जास्त तापमान राहणार आहे, असं अंदाज वर्तवण्यात आला आहे.

अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद

अरबी समुद्रात उष्ण वारे वाहत आहे. त्यामुळे आर्द्रतेत वाढ होत आहेत. यामुळे येत्या काही दिवसात महाराष्ट्रातील तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात नागपूर, अकोला, वर्धा, गोंदिया आणि यवतमाळ यासारख्या अनेक शहरात 38 ते 39० सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यात 39० सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. तर अकोल्यात आज 39.5० सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हे विदर्भातील इतर जिल्ह्यापेक्षा सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ चंद्रपुरात 39.4० सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

उष्णता वाढीची कारणं काय? 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या आठवड्यात विदर्भातील अनेक जिल्ह्यातील दिवसा तापमान हे सर्वसामान्य तापमानाच्या तुलनेत 4-6 डिग्री सेल्सिअसने अधिक असेल. तर काही ठिकाणी हे तापमान 40० सेल्सिअसपेक्षा जास्त असू शकतो. अरबी समुद्रात वाहणाऱ्या कोरडे वाऱ्यांमुळे हवेतील आद्रेतेत वाढ झाली आहे. यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेचे प्रमाण वाढणार आहे. तसेच मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातही तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मार्चचा दुसरा आठवडा हा पहिल्या आठवड्यापेक्षा उष्ण असणार आहे.


संबंधित बातम्या:

Weather Update : राज्यात उन्हाचा तडाखा, हवामान खात्याचा अंदाज; वाचा आठवडाभराचा वेदर रिपोर्ट

weather update : पावसाच्या तडाख्यानंतर राज्यात कसं आहे हवामान, वाचा आठवडाभराचा वेदर रिपोर्ट

(Maharashtra Vidarbha Weather Alert Update heatwave in Akola and Chandrapur)