AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रावर मोठं संकट! वादळी वारे… गारपीट अन् मुसळधार; हवामान विभागाचा धडकी भरवणारा इशारा, अलर्ट जारी

IMD Rain Alert in Maharashtra : हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

महाराष्ट्रावर मोठं संकट! वादळी वारे... गारपीट अन् मुसळधार; हवामान विभागाचा धडकी भरवणारा इशारा, अलर्ट जारी
IMD Rain AlertImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 30, 2026 | 6:38 PM
Share

राज्यावर अवकाळी पावसाचे संकट ओढावले आहे. राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यासह राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच आता हवामान विभागाच्या अंदाजाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राज्याच्या कोणत्या भागात कसे हवामान असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

राज्यातील अनेक भागात अलर्ट जारी

राज्यातील हवामानाबाबत बोलताना नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी म्हटले की, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात गारपीट आणि वादळी वाऱ्या सह पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मार्च महिन्यात महाराष्ट्राच्या अनेक भागात तापमान 40 पर्यंत पोहोचलं आहे, मात्र आता एक प्रणाली विकसित झाली असून त्यामुळे महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

विदर्भातील अनेक जिल्ह्यांना येलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. या भागात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. तीन ते चार दिवस विदर्भासह महाराष्ट्राच्या इतर भागातही अशाच प्रकारची परिस्थिती राहणार आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान 42 अंशांपर्यंत पोहोचले होते, मात्र आता पावसामुळे त्यात घट होणार आहे , त्यामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळणार आहे.

मराठवाड्यातही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

उद्या मराठवाडाच्या काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील आणि पश्चिम विदर्भातील जास्तीत जास्त जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात वादळी वारे वाहणार असून काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. ऑरेंज अलर्ट ज्या भागामध्ये आहे त्या भागात गारपीट मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते त्यामुळे सावधगिरी बाळगण्याचा इशाराही देण्यात आला आबहे.

31 मार्चपासून तीन ते चार दिवस पर्यंत हवामानात मोठा बदल दिसून येणार आहे. त्यामुळे विदर्भासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच तारखेपर्यंत अनेक भागात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि सामान्य नागरिकांनी हवामान विभाग वारंवार देत असलेल्या इशाऱ्याकडे लक्ष देण्याते आवाहन करण्यात आले आहे.

पुण्यात मुसळधार पाऊस

उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यांमध्ये अचानक हवामान बदलल्याने वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीला सुरुवात झाली आहे. विजांच्या कडकडाटासह आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी चिंता वाढली आहे. विशेषतः जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध शिवनेरी हापूस आंबा पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच भाजीपाला, कांदा, बटाटा आणि इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून, झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी जोर धरत आहे.

पुण्याच्या भोर तालुक्यात वादळी वाऱ्यासह आणि गारांसह पावसाने हजेरी लावली. भोर तालुक्यातील वडगाव डाळ गावात जोरदार गारांचा पाऊस झाल्याने यात्रेनिमित्त ग्रामदैवताच्या मंदिरासमोर टाकलेला मंडप, गारांच्या वजनाने कोसळला. या अवकाळी पावसामुळे वडगाव डाळ गावातील 7 घरांचे नुकसान झाले आहे. अनेक घरांच्या छतावरील पत्रे, कौल उडाली आहेत. तसेच काही घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. शासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी