कोरोनाला घाबरु नका, त्याच्याशी दोन हात करा, तुम्ही नक्की बरे व्हाल, 102 वर्षीय कोरोनामुक्त आजीचा सल्ला

तुम्ही नक्की त्यातून बरे व्हाल, असा संदेश सुशीला पाठक या 102 वर्षांच्या आजींनी दिला आहे. (Maharashtra women cross 102 age beat Corona)

कोरोनाला घाबरु नका, त्याच्याशी दोन हात करा, तुम्ही नक्की बरे व्हाल, 102 वर्षीय कोरोनामुक्त आजीचा सल्ला
Follow us
| Updated on: Apr 30, 2021 | 1:29 PM

मुंबई : राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असताना दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यात अडकलेला असताना गेल्या काही दिवसांपासून वयाची शंभरी पार केलल्या अनेकांनी कोरोनाला हरवलं आहे. कोरोनाला घाबरु नका, कोरोनाशी दोन हात करा. तुम्ही कोरोनावर नक्की मात कराल आणि बरे व्हाल, असा मोलाचा सल्ला कोरोनाला हरवलेल्या 102 वर्षांच्या आजींनी दिला आहे. (Maharashtra women cross 102 age beat Corona)

कोरोनामुक्त झाल्यानंतर आजींचा सल्ला काय?

राज्यात सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. यामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 20 वर्षांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना याचा त्रास होत आहे. यामुळे अनेकांच्या मनात कोरोनाची भीती बसली आहे. पण ही भीती तुम्हाला कोरोनावर मात करु देणार आहे. त्यामुळे जर तुम्ही कोरोनाला घाबरलात. तर तुमच्यावर कोणत्याही उपचारांचा परिणाम होणार नाही. त्यामुळे तुम्ही कोरोनाला घाबरु नका. त्याच्याशी दोन हात करा. तुम्ही नक्की त्यातून बरे व्हाल, असा संदेश सुशीला पाठक या 102 वर्षांच्या आजींनी दिला आहे.

इच्छाशक्ती आणि सकारत्मक दृष्टीकोनामुळे कोरोनावर मात 

सुशीला पाठक या मुंबईतील अंधेरी येथे राहतात. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. वयाची शंभरी ओलांडल्याने त्या कोरोना उपचाराला प्रतिसाद देतील का? असा अनेकांना प्रश्न पडला होता.आजींचे नेमके पुढे काय होणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्या ठाण्यातील होरायझन प्राईम या रुग्णालयात उपचार घेत होते.

आजींचे दोन्ही नातू डॉक्टर सुजित बोपर्डेकर आणि डॉक्टर अभिजीत बोपर्डेकर यांना आजीची इच्छाशक्ती माहिती होती. त्या आजी कोरोनावर सहज मात करतील, हे दोघांच्याही लक्षात आले होते. त्यानंतर त्यांनी आजींवर उपचार करण्यास सुरुवात केली. जवळपास 15 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर त्या आजींनी कोरोनावर मात केली.

कुटुंबियांकडून डॉक्टरांचे आभार 

विशेष म्हणजे डॉक्टरांनी त्या आजींना सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी केल्या. तसेच आपल्याला कोरोना झाला म्हणजे काही तरी भयंकर झालंय असा निगेटिव्ह विचार त्यांनी कधीच केला नाही. अगदी सकारात्मकतेने त्या कोरोनाशी लढा देत होत्या आणि पंधरा दिवसांनी त्या कोरोनावर मात घरी सुखरुप परतल्या. यानंतर त्यांच्या कुटुंबांनी डॉक्टरांचे आभार मानले.

आजींची इच्छाशक्ती आणि सकारात्मक दृष्टीकोन यामुळे त्यांच्यावर सर्व उपचार लागू पडले. आजींनी एक प्रकारे आम्हाला देखील सकारात्मकतेचा धडा दिला आहे, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले. तसेच त्यांना डिस्चार्ज देताना त्यांनी केक कापून अभिनंदन केले.(Maharashtra women cross 102 age beat Corona)

संबंधित बातम्या : 

Positive news | महाराष्ट्रासाठी सकारात्मक बातमी, वयाची शंभरी ओलांडलेल्या तिघांनी कोरोनाला हरवलं

BREAKING : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी पुन्हा संवाद साधणार; कोरोनासंदर्भात महत्त्वाची घोषणा करणार?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.