AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Zilla Parishad and Panchayat Samiti Election 2021: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी यंत्रणा सज्ज, मतदान ते निकाल, सर्व अपडेट एका क्लिकवर

धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका, तसेच पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान आणि 6 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकांकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

Maharashtra Zilla Parishad and Panchayat Samiti Election 2021: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी यंत्रणा सज्ज, मतदान ते निकाल, सर्व अपडेट एका क्लिकवर
प्रतिकात्मक फोटो
| Edited By: | Updated on: Oct 04, 2021 | 8:06 PM
Share

मुंबईः राज्यात जिल्हा परिषदेत आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची वारे वाहू लागलेत. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या रिक्त जागांवर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून त्या निवडणुकांकडे अनेक राजकीय नेत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका, तसेच पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान आणि 6 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकांकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षांचं भवितव्य ठरणार असून, अनेक राजकीय पक्षांनी या निवडणुकांसाठी जोरदार कंबर कसली आहे.

? कोणत्या जिल्हा परिषदेच्या किती जागांसाठी मतदान?

? धुळे – 15 ? नंदूरबार – 11 ? अकोला – 14 ? वाशिम -14 ? नागपूर -16 ? पालघर पोटनिवडणूक –

? नेमक्या किती पंचायत समिती जागांसाठी मतदान?

? धुळे -30 ? नंदूरबार -14 ? अकोला -28 ? वाशिम -27 ? नागपूर -31

? असा आहे निवडणूक कार्यक्रम

? 15 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर अर्ज दाखल करता येणार होता ? 21 सप्टेंबर अर्जाची छाननी होणार होती ? 29 सप्टेंबर रोजी अर्ज मागे घेता येणार होता ? 5 ऑक्टोबरला मतदान ? 6 ऑक्टोबरला निकाल

? किती जागांसाठी निवडणूक?

? जिल्हा परिषदेच्या 85 जागा ? पंचायत समितीच्या 144 जगाा

? 6 ऑक्टोबर रोजी मतमोजणी

अपील असलेल्या ठिकाणी 29 सप्टेंबर 2021 पर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान; तर 6 ऑक्टोबर 2021 रोजी मतमोजणी होईल. जिल्हा परिषदेच्या एकूण 85 निवडणूक विभाग आणि पंचायत समितीच्या एकूण 144 निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होईल. त्यासाठी कोरोना संदर्भातील आवश्यक ते सर्व प्रतिबंधात्मक उपाय योजून दक्षता घेण्यात यावी, असे निर्देशही देण्यात आले असल्याचे मदान यांनी सांगितले.

? कोणत्या जिल्हा परिषदेतील किती जागांवर मतदान?

नागपुर जिल्हा परिषदेच्या 16 मतदारसंघांसाठी तर पंचायत समितीच्या 31 मतदारसंघांसाठी उद्या पोटनिवडणूक होत असून प्रशासनाने त्यासाठीची तयारी पूर्ण केलीय, तर धुळे जिल्हा परिषदेच्या 14 गट आणि 28 जागांसाठी पोटनिवडणूक पार पडत असून मंगळवारी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. दुसरीकडे पालघर जिल्हा परिषदेच्या 15 तर पंचायत समित्यांच्या 14 जागांसाठी मतदान होणार आहे. वाशिम जिल्हा परिषदेच्या 14 व पंचायत समितीच्या 27 गणांसाठी  पोट निवडणुकी साठी मतदान होत आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या 14 आणि पंचायत समितीच्या 28 जागांसाठी ही पोटनिवडणूक होतेय.

इतर बातम्या :

FRP चे तुकडे पाडण्याची आघाडी सरकारने केलेली शिफारस ऊस उत्पादकांसाठी घातक, अनिल बोंडेंचा आरोप

सोमय्यांची अडवणूक करु नका, त्यांना येऊ द्या; हसन मुश्रीफांचं कार्यकर्त्यांना आवाहन

Maharashtra Zilla Parishad Election 2021 live updates 85 zilla parishad seats and 144 panchayat samiti voting latest news poll percentage in marathi

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.