AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाविकास आघाडीला खिंडार! राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरे सेनेसह मनसेच्या असंख्य पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

Shiv Sena : मुंबई आणि उपनगराती महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. मुंबई, ठाणे, शहापूर, वसई-विरार, नालासोपारा आणि पालघर परिसरातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

महाविकास आघाडीला खिंडार! राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरे सेनेसह मनसेच्या असंख्य पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
Shivsena Shinde IncomingImage Credit source: X
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 23, 2026 | 10:35 PM
Share

गेल्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात पक्षांतर होताना पहायला मिळत आहे. अशातच आता मुंबई आणि उपनगराती महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. मुंबई, ठाणे, शहापूर, वसई-विरार, नालासोपारा आणि पालघर परिसरातील विविध राजकीय पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच विविध सामाजिक संघटनांमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मुंबईतील या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचे दत्ता पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तसेच मानखुर्द येथील मनसेचे नेते प्रमोद पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस हरिश्चंद्र विश्वासराव, ग्राहक संरक्षण विभागाचे उपाध्यक्ष संजय महाले, सामाजिक कार्यकर्त्या समायरा भारती आणि गौरी कटपरा यांच्यासह कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.

काँग्रेसच्या मायनॉरिटी विभागाचे माजी अध्यक्ष मोहम्मद अख्तर मलिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. पालघर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या महिला अध्यक्ष मेघा म्हात्रे, जिल्हा चिटणीस हरेश कोटकर, चंद्रकांत कदम, नालासोपारा विधानसभा अध्यक्ष देवेंद्र शिरोडकर तसेच युवक कार्याध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

त्याचबरोबर पालघरमधील श्रमजीवी संघटनेचे महाराष्ट्र राज्य संघटक रुपेश डोळे, लक्ष्मण फडवले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. तर विरार-नालासोपारा परिसरात विधानसभा उपसंघटक श्रद्धा जाधव यांच्या नेतृत्वाखाली विभागप्रमुख दिलीप जाधव, विभागप्रमुख विजय भोसले, उपविभाग प्रमुख गणपत गव्हाळे आणि कार्यकर्ते शिवसेनेत सामील झाले.

शहापूरमधील अनेकांचा शिवसेनेत प्रवेश

ठाण्याच्या शहापूर तालुक्यातील तब्बल 92 लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या 75 हून अधिक कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. या सामूहिक पक्षप्रवेशामुळे शहापूरसह ठाणे ग्रामीण परिसरात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढल्याचा दावा करण्यात आला. यावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडून नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या भागातील समस्या सोडवण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असून, ‘तुमच्या हक्काच्या लढाईत मी कायम खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहीन’ अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.

या पक्षप्रवेश सोहळ्याला शिवसेना सचिव राम रेपाळे, ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख मारुती धिरडे, पालघर जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

Follow Us
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?
आधी फूट, नंतर अपात्रता असा क्रम...; कौलांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद
Shivsena : आधी फूट, नंतर अपात्रता असा क्रम...; शिंदे गटाचे वकील नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 19 तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता
महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 19 तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता
रत्नागिरीत भातशेती वाचवण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांचा दुष्काळाशी संघर्ष
रत्नागिरीत भातशेती वाचवण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांचा दुष्काळाशी संघर्ष
1 लाख 65 हजार 800 चालक शिकले मराठी, अन्... काय म्हणाले प्रताप सरनाईक?
Video : 1 लाख 65 हजार 800 चालक शिकले मराठी, अन्... काय म्हणाले प्रताप सरनाईक?
काँग्रेस खासदार रेणुका चौधरींचा महिला सुरक्षेबाबत सरकारला थेट असा सवाल
दिल्लीतील आंदोलन, काँग्रेस खासदार रेणुका चौधरींचा महिला सुरक्षेबाबत सरकारला थेट असा सवाल!
पोलिसांकडून आम्हाला धमकी, राहुल गांधींच्या आरोपांनी खळबळ
पोलिसांकडून आम्हाला धमकी, राहुल गांधींच्या आरोपांनी खळबळ, विरोधकांच्या मोर्चामुळे राजधानीत वातावरण तापलं!
वर्षा गायकवाड आणि धांगेकरांसह अनेकांना मारहाण? पोलिसांवर नेत्यांचा...
वर्षा गायकवाड आणि धांगेकरांसह अनेकांना मारहाण? पोलिसांवर नेत्यांचा गंभीर आरोप