AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॉलीपॉप ते चोर… शिवसेना भाजपात बँनरवॉर रंगलं, महायुतीमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर

Mahayuti : महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमधील राजकीय संघर्ष आता थेट सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

लॉलीपॉप ते चोर... शिवसेना भाजपात बँनरवॉर रंगलं, महायुतीमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर
Bhandara MahayutiImage Credit source: Google
| Updated on: Sep 07, 2026 | 11:00 PM
Share

भंडारा जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमधील राजकीय संघर्ष आता थेट सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर पोस्टर, मीम्स आणि खोचक शेरेबाजी करत आरोप-प्रत्यारोप सुरू असून, या ‘सोशल मीडिया वॉर’मुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

भंडाऱ्यात पोस्टरबाजी

भाजप आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या समर्थनार्थ तयार करण्यात आलेल्या एका पोस्टरमधून विरोधकांना थेट इशारा देण्यात आला आहे. शिवसेनेच्या बसलेल्या वाघासमोर उभा पार्सलही बुटकाच दिसेल… वाघ आमचा जागा आहे, खेळणं कोणाच्या बापाचं नाही! असा आक्रमक मजकूर या पोस्टरवर आहे. या पोस्टरमुळे शिवसेना समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत आहे.

दुसरीकडे, विकासकामे आणि दिलेल्या आश्वासनांवरून आमदारांना लक्ष्य करणारे पोस्टर आणि फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आधी लोकांना दिला लॉलीपॉप, म्हणून आज मी पण घेतला लॉलीपॉप अशा उपरोधिक मजकुराचा वापर करत विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी सोशल मीडिया हेच आरोप-प्रत्यारोपांचे व्यासपीठ बनले आहे.

शिवसेनेकडून पलटवार

दरम्यान, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल गायधने यांनी सोशल मीडियावर सुरू असलेला हा वाद थांबवण्याचे आवाहन केले आहे. दोन्ही पक्षांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून भंडारा शहराच्या विकासावर लक्ष केंद्रित करावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. मात्र, याचवेळी त्यांनी विरोधकांना सणसणीत शब्दांत इशाराही दिला.

‘आमच्याकडून गेलेला चोर जो आता तुमच्याकडे आला आहे, त्याला तुम्हीच सांभाळा. तो भविष्यात तुमचे काय नुकसान करेल, हे तुम्हाला नंतर समजेल,’ असा टोला गायधने यांनी लगावला. तसेच, ‘त्याला आवरा, अन्यथा यापुढे कोणीही शिवसेनेविरोधात बोलल्यास शिवसेना त्याला जशास तसे चोख उत्तर देईल,’ असा थेट इशाराही त्यांनी दिला. महायुतीतील दोन्ही घटक पक्षांमध्ये सुरू असलेल्या या शाब्दिक आणि सोशल मीडिया संघर्षामुळे आगामी काळात भंडारा जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर त्याचा काय परिणाम होणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात