Maharashrta Corona | तब्बल 41 हजार पेक्षा जास्त नव्या रुग्णांची राज्यात भर, 13 मृ्त्यू, बरे किती झाले?

41 हजार 434 नव्या रुग्णांपैकी 20 हजारपेक्षाही जास्त नवे रुग्ण एकट्या मुंबईत आढळून आले आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे. दरम्यान ओमिक्रॉनचे 133 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

Maharashrta Corona | तब्बल 41 हजार पेक्षा जास्त नव्या रुग्णांची राज्यात भर, 13 मृ्त्यू, बरे किती झाले?
corona test

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णावाढीचा कहर सुरु आहे. राज्यात नव्या 41 हजारपेक्षा जास्त नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यूदर 2.05 इतका आहे. दरम्यान, 41 हजार 434 नव्या रुग्णांपैकी 20 हजारपेक्षाही जास्त नवे रुग्ण एकट्या मुंबईत आढळून आले आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे. दरम्यान ओमिक्रॉनचे 133 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान, वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज राज्यात नवी नियमावली जारी कऱण्यात आली आहे. या नियमावलीनुसार आता राज्यात अधिक कडक निर्बंध जारी करण्यात आले आहेत. राज्यात नाईक कर्फ्यू लागू करण्यात आला असून रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत कडक जमावबंदीचे निर्देश जारी करण्यात आले आहे. या वेळेत फक्त अत्यावश्यक सेवेतील नागरीकांनाच प्रवासाची आणि घराबाहेर पडण्याची मुभा देण्यात आली आले. 

काय आहे नवे निर्बंध?

  1. महाराष्ट्रात सकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत संचारबंदी
  2. 5 पेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येता येणार नाही
  3. महाराष्ट्रात रात्री 11 ते प. 5 वा. पर्यंत नाईट कर्फ्यू
  4. शाळा आणि कॉलेज 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार
  5. 10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांना मुभा राहिल
  6. लग्न समारंभासाठी 50, अंत्यसंस्कारासाठी 20 जणांना परवानगी
  7. सामाजिक, धार्मिक कार्यक्रमासाठी 50 जणांना परवानगी
  8. सध्यातरी लोकल प्रवासावर कोणतेही निर्बंध नाहीत
  9. हॉटेल, रेस्टॉरंट फक्त 10 वाजेपर्यंत सुरु राहणार
  10. व्यायामशाळा, स्पा सेंटर, उद्यानं, स्विमिंग पूल, पर्यटन स्थळं पूर्णपणे बंद राहणार

आजची रुग्णवाढीचे ठळक मुद्दे

आज 41 हजारपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले असले, तरी 9671 रुग्ण बरेही झाले आहे.  राज्याचा रिकव्हरी रेट हा 95.37 टक्के इतका नोंदवणयात आला आहे. सध्या राज्यात 845089 इतके रुग्ण होम क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

Published On - 8:01 pm, Sat, 8 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI