AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लालबाग राजाच्या परिसरात भीषण अपघात, दोन चिमुकल्याना चिरडून वाहनचालक फरार, पोलिसांकडून…

मुंबईमध्ये सर्वत्र बाप्पाच्या मिरवणुकीची जोरदार तयारी सुरू असतानाच एक धक्कादायक अशी घटना घडलीये. लालबाग राजाच्या परिसरात भीषण अपघात झालाय. दोन चिमुरड्यांना चिरडुन वाहनचालक हा फरार झाला आहे. लालबाग राजाच्या मिरवणुकीला काही वेळ शिल्लक असतानाच ही घटना घडलीये.

लालबाग राजाच्या परिसरात भीषण अपघात, दोन चिमुकल्याना चिरडून वाहनचालक फरार, पोलिसांकडून...
Lalbaugcha Raja Entrance
| Updated on: Sep 06, 2025 | 11:44 AM
Share

आज गणेशोत्सवाच्या दहा दिवसाच्या जल्लोषात भाविक आहेत. सकाळपासूनच एक लगभग रस्त्यावर बघायला मिळत आहे. आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत आणि एक वेगळाच उत्साह बघायला मिळतोय. मात्र, बाप्पाला निरोप देत असतानाच आता एक धक्कादायक घटना घडली आहे. लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीपूर्वीच ही घटना लालबाग राजाच्या मुख्यप्रवेशव्दाराच्या समोर घडली. लालबाग राजाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरील मार्गावर अज्ञात वाहनाने दोन चिमुकल्यांना चिरडल्याने खळबळ उडाली.

भरधाव येणाऱ्या गाडीने दोन चिमुकल्यांना चिरडले तर 2 वर्षांची चंद्रा वजणदार हिचा या अपघातानंतर जागीच मृत्यू तर 11 वर्षीय शैलू वजणदार हा अपघातात गंभीर जखमी झाला. अपघातानंतर लगेचच दोघांनीही जवळ असलेल्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. लालबाग राजाच्या मिरवणुकीची तयारी सुरू असल्याने मोठी गर्दी रस्त्यावर होती आणि अपघाताबद्दल माहिती कळताच लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.

परळच्या केईएम रुग्णालयात दोघांनाही दाखल करण्यात आले. मात्र, दोन वर्षाच्या चंद्राला वाचवण्यात यश मिळाले नाही. 11 वर्षीय शैलू याच्यावर सध्या केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धक्कादायक बाब अशी की, अपघातानंतर गाडी घेऊन तो व्यक्ती घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी काळाचौकी पोलिस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध विविध कलमाअंतर्गत गुन्हा हा दाखल करण्यात आलाय. सध्या चालकाचा आणि त्याच्या गाडीचा शोध हा पोलिसांकडून घेतला जात आहे.

मिळालेली अधिक माहिती अशी की, हा घटना पहाटे अंदाजे चारच्या दरम्यान घडली. ही दोन्ही मुले रस्त्याच्या कडेला झोपली होती. भरधाव येणाऱ्या वाहनचालकाने थेट या मुलांच्या अंगावर गाडी घातली. त्यानंतर तिथे मदत न करता त्या वाहनचालकाने घटनास्थळीवरून पळ काढला. लालबाग राजाच्या मिरवणुकीची तयारी सुरू असल्याने लोकांची मोठी गर्दी तिथे होती. अनेकांनी पुढे येत या दोन चिमुकल्यांना केईएम रुग्णालयात दाखल केले. सध्या मुलावर उपचार सुरू आहेत. पोलिस या अपघाताप्रकरणी अधिकचा तपास करताना दिसत आहेत.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.