AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात मुलींच्या वसतिगृहात भीषण आग, गुदमरून एकाचा मृत्यू

पुण्यातील कुमठेकर रस्त्यानजीक असलेल्या एका चार मजली इमारतील भीषण आग लागली. या आगीत जीव गुदमरून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर इमारतीत अडकलेल्या ४८ मुलींची सुटका करण्यात आली.

पुण्यात मुलींच्या वसतिगृहात भीषण आग, गुदमरून एकाचा मृत्यू
| Updated on: Jun 08, 2024 | 9:06 AM
Share

पुण्यातील कुमठेकर रस्त्यानजीक असलेल्या एका चार मजली इमारतील भीषण आग लागली. या आगीत जीव गुदमरून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर इमारतीत अडकलेल्या ४८ मुलींची सुटका करण्यात आली. सागर कुलकर्णी असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कुमठेकर रस्त्यावर असलेल्या एका इमारतीत खाजगी शैक्षणिक संस्था आहे. या इमारतीत खालच्या मजल्यावर अभ्यासिका तर दुसऱ्या मजल्यावर स्टडी रूम आणि इतर दोन मजल्यावर या इन्स्टिट्यूट मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गुरूवारी मध्यरात्री त्री एक वाजण्याच्या सुमारास या इमारतीला भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेतली आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करून काही वेळातच आग विजवली. आग लागली त्यावेळी या इमारतीत ४८ मुली राहत होत्या. तळमजल्यावर आग लागल्याने घाबरून तिथे राहत असलेल्या मुलींनी टेरेसवर धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी या सर्व मुलींना शेजारील इमारतीवरून शिडीच्या सहाय्याने बाहेर काढले. मात्र त्या ठिकाणी काम करत असलेल्या सागर या तरूणाचा या आगीमुळे गुदमरून मृत्यू झाला. आग कशामुळे लागली ते अद्याप समजू शकलेले नाही.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा