लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणासाठी जास्तीत जास्त लोकांना काँग्रेसचे सदस्य करून घ्या : एच. के. पाटील

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन दादर येथे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या हस्ते आज काँग्रेस सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. मुंबईसोबत राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयी आज सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात झाली.

लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणासाठी जास्तीत जास्त लोकांना काँग्रेसचे सदस्य करून घ्या : एच. के. पाटील


मुंबई : काँग्रेस पक्षाची स्थापना मुंबईत शहरात झाली. मुंबई आणि महाराष्ट्राने काँग्रेस पक्ष, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांना ताकद दिली. आजपासून सुरू झालेल्या काँग्रेस सदस्य नोंदणीतही जास्तीत जास्त सदस्य नोंदवून मुंबई आणि महाराष्ट्राने संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणाच्या मोहिमेत मोठ्या संख्येने नागरिकांना सहभागी करून घ्यावे, असे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी म्हटलेय.

प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांच्या हस्ते सदस्य नोंदणीचा शुभारंभ

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन दादर येथे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या हस्ते आज काँग्रेस सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. मुंबईसोबत राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयी आज सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात झाली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते गडचिरोली येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यात, कोल्हापुरात गृहराज्यमंत्री सतेज बंटी पाटील यांच्या हस्ते तर अमरावती येथे प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांच्या हस्ते सदस्य नोंदणीचा शुभारंभ झाला.

पवित्र महानगरात काँग्रेस पक्षाची स्थापना

यावेळी बोलताना पाटील पुढे म्हणाले की, मुंबईच्या ऐतिहासिक आणि पवित्र महानगरात काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली. मुंबई काँग्रेस विचारांचं शहर आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसार देशभर 1 नोव्हेंबरपासून काँग्रेस सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात झाली. मुंबई काँग्रेस 10 लाख सदस्यांची नोंदणी करणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी करावी. आपले नेते राहुल गांधी 28 डिसेंबर रोजी शिवाजी पार्क येथे आयोजित मेळाव्याला संबोधित करणार आहेत, त्यावेळी काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणीचा आढावा त्यांच्यासमोर मांडा.

देशाचे संविधान आणि काँग्रेस पक्षाची विचारधारा एकच

यावेळी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि माजी मंत्री नसीम खान म्हणाले की, देशाचे संविधान आणि काँग्रेस पक्षाची विचारधारा एकच आहे. केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून संविधान आणि पर्यायाने देशाला कमजोर करण्याचे काम सुरू आहे. देश वाचवायचा असेल तर काँग्रेस शिवाय पर्याय नाही, त्यामुळे जास्तीत लोकांना काँग्रेससोबत जोडले पाहिजे.

तरच देशात लोकशाही आणि संविधान अबाधित राहील

यावेळी बोलताना चंद्रकांत हंडोरे म्हणाले की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विचारांचे सरकार आले तरच देशात लोकशाही आणि संविधान अबाधित राहील, त्यामुळे जास्तीत जास्त सदस्यांची नोंदणी करून काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करा. गडचिरोली येथील कार्यक्रमात बोलताना नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस विचारांना मानणारा मोठा वर्ग राज्यात असून, काँग्रेसला नेहमी त्यांनी साथ दिली आहे. काँग्रेस पक्षाचे संघटन आणखी मजबूत करण्यासाठी सदस्य नोंदणी करणे गरजेचे असून, गावागावात जाऊन काँग्रेचे सदस्य नोंदणी करा व पक्षाची ताकद वाढवा. भाजप आणि नरेंद्र मोदी यांना फक्त राहुल गांधी हेच पर्याय आहेत. भाजपचा पराभव फक्त काँग्रेसच करू शकते. त्यामुळे राहुलजी गांधी यांना काँग्रेस अध्यक्ष करण्यासाठी मोठ्या संख्येने सदस्यनोंदणी करून काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करा, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

संबंधित बातम्या

नवाब मलिकांचा थेट आरोप, आता अमृता फडणवीस म्हणतात, तेव्हा पंटरचा रेकॉर्ड नव्हता !

तुम्ही मर्द आहात ना? मग डायरेक्ट देवेंद्रजींना टार्गेट करा, मला मध्ये आणू नका; अमृता फडणवीसांचा घणाघात

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI