Malegaon blast case verdict : प्रज्ञा ठाकूर यांची निर्दोष सुटका, साध्वीच्या बाईकबद्दल NIA कोर्टाने काय म्हटलं?
संपूर्ण देशाच लक्ष लागून राहिलेल्या मालेगाव बॉम्ब स्फोट खटल्याचा निकाल लागला आहे. तब्बल 17 वर्षानंतर NIA कोर्टाने हा निकाल दिला. मालेगावच्या भिक्कू चौकात 29 सप्टेंबर 2008 ला बॉम्बस्फोट झाला होता. साध्वी प्रज्ञा ठाकूर यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. कोर्टाने त्यांच्याबद्दल निकालात काय म्हटलय? जाणून घ्या.

संपूर्ण देशाच लक्ष लागून राहिलेल्या मालेगाव बॉम्ब स्फोट खटल्याचा निकाल लागला आहे. तब्बल 17 वर्षानंतर NIA कोर्टाने हा निकाल दिला. मालेगावच्या भिक्कू चौकात 29 सप्टेंबर 2008 ला बॉम्बस्फोट झाला होता. या बॉमस्फोट प्रकरणात 6 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता, 100 पेक्षा जास्त लोक यात जखमी झाले होते. आज न्यायाधीश एके लाहोटी यांच्या कोर्टाने निकाल दिला. यात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर मुख्य आरोपी होत्या. निकाल वाचन करताना न्यायालयाने एक महत्त्वाच निरीक्षण नोंदवलं. बॉम्बस्फोटासाठी ज्या बाईकचा वापर झाला, ती बाईक साध्वीची होती हे सिद्ध होत नाही असं कोर्टाने म्हटलय. त्यामुळे साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला.
बाईकवर ब्लास्ट झाला हे सिद्ध झालं नाही, असं कोर्टाने म्हटलंय. आधी नाशिक पोलीस नंतर एटीएस आणि नंतर एनआयए अशा यंत्रणांनी तपास केलेला आहे. बॉम्ब स्फोटानंतर तिथे दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. बोटांचे ठसे सापडले न्हवते. साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या नावाने असलेल्या बाईकचा चेसिस नंबर नीट अढळला न्हवता. नंबरप्लेट व्यतिरिक्त चेसिस नंबर आवश्यक असतो. आरोपींमध्ये बैठका झाल्याचा पुरावाही तपास यंत्रणांना आढळला नाही. याप्रकरणाचा कट शिजला असे सिद्ध करण्यासाठी आवश्यक पुरावे रेकॉर्डवर नाहीत. साध्वीच्या नावाने बाईकचा चेसिस नंबर नीट नव्हता. ती बाईक साध्वीचच होती हे सिद्ध करणारे ठोस पुरावे सरकारी पक्षाला सादर करता आले नाहीत. मोबाईलमधूनही फार काही पुरावे आढळेल न्हवते.
हे सिद्ध करता आलं नाही
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या दोन वर्ष आधी साध्वी प्रज्ञा सन्यासी बनल्या. भौतिक संपत्तीपासून त्या लांब होत्या असं कोर्टाने म्हटलय. मालेगावमध्ये स्फोट झाला हे फिर्यादी पक्षाने सिद्ध केलं. पण घटनास्थळी सापडलेल्या मोटरसायकलवरच तो बॉम्ब ठेवलेला होता हे सिद्ध करता आलं नाही असं कोर्टाने म्हटलय.
साध्वीला जामीन कधी मिळाला?
या प्रकरणात एकूण 323 साक्षीदारांची जबानी घेण्यात आली. यात 32 जणांनी नंतर आपली साक्ष बदलली. 25 एप्रिल 2017 रोजी कर्नल पुरोहित यांचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना जामीन मंजूर केला. 27 डिसेंबर 2017 रोजी कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा यांच्याविरुद्धचा मकोका खटला रद्द झाला.
