AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : शरद पवारांचे एक घाव, दोन तुकडे, त्यानंतर आज अजित पवारांचे कार्यकर्ते शरद पवारांच्या भेटीला

Sharad Pawar : "टोकाची भूमिका घेण्याची आपली इच्छा नाही. पण पक्ष चालवताना कार्यकर्त्यांची इच्छा पहावी लागते" असं सूचक विधान शरद पवार यांनी केलं. "आपल्या शेतकरी वर्गाला एक रुपया टॅक्स भरावा लागता कामा नये. शेतकऱ्याला टॅक्स नसावा" असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Sharad Pawar : शरद पवारांचे एक घाव, दोन तुकडे, त्यानंतर आज अजित पवारांचे कार्यकर्ते शरद पवारांच्या भेटीला
sharad pawar ajit pawar
| Updated on: Jun 18, 2025 | 10:06 PM
Share

मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र, काल शरद पवार यांनी स्वत:च या चर्चांना पूर्णविराम दिला. त्यानंतर आज माळेगाव सहकारी कारखाना निवडणुकी संदर्भात शरद पवारांनी सभासदांशी संवाद साधला. त्यानंतर माळेगाव सहकारी कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट का घेतली? त्यामागे काय उद्देश आहे? ते समजू शकलेलं नाही. “टोकाची भूमिका घेण्याची आपली इच्छा नाही. पण पक्ष चालवताना कार्यकर्त्यांची इच्छा पहावी लागते” असं सूचक विधान शरद पवार यांनी केलं. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली बळीराजा सहकार शेतकरी पॅनल माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यांचा सामना अजित पवारांच्या पॅनलशी आहे.

“काही लोक सत्तेचा गैरवापर करतील. पण आपण स्वच्छ निवडणूक लढवायची आहे. आपलं जे मत, अधिकार आहे, तो कोणाला विकायचा नाही” असं शरद पवार सभासदांना म्हणाले. “आपल्या शेतकरी वर्गाला एक रुपया टॅक्स भरावा लागता कामा नये. शेतकऱ्याला टॅक्स नसावा. वन नेशन वन इलेक्शन या कमिटीत देखील मी आहे. सर्व निवडणूक पारदर्शक आणि गुण्यागोविंदाने झाली पाहिजे. माळेगाव निवडणुकीत युगेंद्र पवार आणि कार्यकर्ते देखील प्रचारात मेहनत घेत आहेत. माळेगाव कारखान्याची मी देखील सभासद आहे. माळेगाव कारखाना बिनविरोध व्हावा अशी माझी इच्छा होती. तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकरी लाखो रुपये कमवितो आहे याचा मला अभिमान आहे” असं सुप्रिया सुळे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हणाल्या.

शरद पवारांची भूमिका काय?

“कुणी तरी आता म्हणालं सर्वांना बरोबर घ्या. सर्वांना बरोबर घ्यायला हरकत नाही. पण सर्व म्हणजे कोण? गांधी, नेहरू यांचा विचार आणि फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार मानत असेल तर त्यांनासोबत घेणं मान्य आहे. पण सत्तेसाठी भाजपसोबत जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा काँग्रेसचा विचार नाही. त्यामुळे कुणाशीही संबंध ठेवा. पण भाजपशी संबंध हा काँग्रेसचा विचार असूच शकत नाही. त्यामुळे संधी साधूपणाचं राजकारण प्रोत्साहीत करायचं नाही. त्यादृष्टीने पावलं टाकायचं आहे. आम्ही संधीसाधूंसोबत जाणार नाही” असं शरद पवार यांनी म्हटलं.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.