AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांना आजवरचा सर्वात मोठा धक्का, सर्वच उमेदवारांचा पराभव; अजितदादांच्या पॅनलची विजयी आघाडी

बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलला विजयी आघाडी मिळाली आहे. तर शरद पवारांना मोठा धक्का बसला असून पॅनलमधील सर्वच उमेदवारांचा पराभव झाला आहे.

शरद पवारांना आजवरचा सर्वात मोठा धक्का, सर्वच उमेदवारांचा पराभव; अजितदादांच्या पॅनलची विजयी आघाडी
Ajit pawar vs Sharad Pawar
| Updated on: Jun 25, 2025 | 5:18 PM
Share

बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलला विजयी आघाडी मिळाली आहे. अजित पवारांच्या पॅनलचे 21 पैकी 12 उमेदवार विजयी झाले आहेत, तर शरद पवारांना मोठा धक्का बसला असून पॅनलमधील सर्वच उमेदवारांचा पराभव झाला आहे.

माळेगाव सहकारी साखर कारखाण्याच्या निवडणुकीत शरद पवार गटाने बळीराजा सहकार पॅनल उभा केला होता. या पॅनलचे नेतृत्व युगेंद्र पवार करत होते, मात्र या पॅनलमधील सर्वच पराभव झाला आहे. शरद पवारांच्या होमटाऊनमध्ये शरद पवारांना बसलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का आहे.

अजित पवारांच्या पॅनकडे विजयी आघाडी

बारामती सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत, अजित पवारांनी निळकंठेश्वर पॅनल उभा केला होता. या पॅनलच्या 21 पैकी 12 उमेदवारांनी आतापर्यंत विजय मिळवला आहे. तर 7 उमेदवार आघाडीवर आहेत, त्यामुळे या निवडणुकीत अजित पवारांनी विजयी आघाडी घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे मतमोजणीच्या पहिल्याच टप्प्यात ‘ब वर्ग’ गटातून विजयी झाले आहेत.

किती पॅनल रिंगणात?

माळेगाव साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचारात अजित पवार यांनी कारखान्याला 500 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले होते, ज्याचा परिणाम मतदानावर पाहायला मिळत आहे. आतापर्यंतची परिस्थिती लक्षात घेता अजित पवार यांच्या पॅनलला मोठे यश मिळणार असल्याचे दिसत आहे. या निवडणुकीत अजित पवारांचे निळकंठेश्वर पॅनल, शरद पवारांच्या नेतृत्वाखालील बळीराजा सहकार बचाव पॅनल, भाजप नेते चंद्रराव तावरे-रंजन तावरे यांचे सहकार बचाव शेतकरी पॅनल आणि कष्टकरी शेतकरी समिती, अपक्षांचे एक पॅनल अशी चार पॅनल रिंगणात होती. आता सर्वांच्या नजरा अंतिम निकालाकडे लागल्या आहेत.

जीवश्य कंठश्य मित्र...; फडणवीसांनी लिहिला भावनिक लेख!
जीवश्य कंठश्य मित्र...; फडणवीसांनी लिहिला भावनिक लेख!.
आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला! रोहित पवारांचं भावनिक ट्विट
आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला! रोहित पवारांचं भावनिक ट्विट.
अजित पवारांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार?
अजित पवारांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार?.
यंदाच्या वर्षात सोन अडीच लाखांच्या घरात जाणार? काय आहेत सध्याचे दर?
यंदाच्या वर्षात सोन अडीच लाखांच्या घरात जाणार? काय आहेत सध्याचे दर?.
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.