AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हेमंत करकरे यांची हत्या झाली त्याच दिवशी निकाल लागला होता… जितेंद्र आव्हाड यांचं मोठं विधान

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष असल्याचा महत्वाचा निकाल कोर्टाने दिलेला आहे. या संदर्भात विविध स्तरातून प्रतिक्रीया उमटलेल्या आहेत. आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणात आपली भूमिका मांडली आहे.

हेमंत करकरे यांची हत्या झाली त्याच दिवशी निकाल लागला होता... जितेंद्र आव्हाड यांचं मोठं विधान
jitendra awhad
| Updated on: Jul 31, 2025 | 3:32 PM
Share

कोर्टाने मालेगाव प्रकरणात जो काही निकाल दिला असेल त्याच्या विरोधात किंवा बाजूने बोलण्याचा मला अधिकार नाही. या बॉम्बस्फोटांसाठी ६५ किलो आरडीएक्स कोठून आलं हा प्रश्न अनुत्तरीत आहे. आंतकवादाला जात धर्म, रंग, पंथ नसतो. आतंकवादी हा आतंकवादी असतो. हे उशिरा सुचलेले शहाणपण त्यांना आज सुचत असेल तर ठीक आहे देर आए दुरुस्त आए..हिंदू किंवा मुसलमान यांचा अतिरेकी कारवायांशी संबंध नाही. आतंकवादाला धर्माचं नाव चिकटवणे योग्य नाही हे आधीपासून आम्ही सांगत आहोत असे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

बिल्कीस बानो प्रकरणातील आरोपींना जेलमधून बाहेर काढण्यात आले, त्यांचा सत्कार करण्यात आला पेढे वाटण्यात आले ही कायद्याचे पायमल्ली होती.कोर्टाने निकाल दिलेला आहे यावर अधिक काही बोलणं योग्य राहणार नाही. परंतू यात काँग्रेसचा काही संबंध नाही.लोकल बॉम्ब ब्लास्टमधले देखील आरोपी निर्दोष सुटले मग हे काय कुठल्या राजकीय पक्षांनी केलं काय ? ज्या दिवशी हेमंत करकरे यांची हत्या झाली त्याच दिवशी या मालेगाव खटल्याचा निकाल लागला होता असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. बॉम्बब्लास्ट झाल्यापासून माझा प्रश्न आहे आरडीएक्स हे तीन-चार आतंकवादी संघटनांकडेच आहे. पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांकडे मुबलक आरडीएक्स असते असेही ते म्हणाले.

महादेव मुंडे विरोधात एक महिला पुढे येईल

महादेव मुंडे प्रकरणाचा तपास नीट झालेला नाही हे पुराव्यानिशी सिद्ध होते. या खुना मागचा आका कोण होता आणि कुठल्या आकाने खून केला हे बीडकरांपासून काही लपून राहिलेले नाही. मला जी माहिती बीडमधून मिळते आहे, त्यानुसार एक महिला तयार होईल आणि ती सांगेल की महादेव मुंडेला तिनेच मारले याची संपूर्ण तयारी झालेली आहे. बघू आता ती महिला किती हिंमत दाखवते. त्या महिलेला पुढे केलं जाईल आणि आकाला वाचवण्यासाठी हे केलं जाईल असाही दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

रेव्ह पार्टी कशाला म्हणतात ?

रेव्ह पार्टी कशाला म्हणतात हे ग्रामीण भागात किंवा त्याच्याशी संबंधित नसलेल्यांना माहिती नसेल. रेव्ह पार्टी म्हणजे 100 ते 200 समुदाय एकत्र येणार तिथे मुबलक प्रमाणात दारू असणे, मोठमोठ्याने म्युझिक लावणे, मोठ्या प्रमाणात नाच असे रेव्ह पाटीचे स्वरुप असते. घरात चार-पाच जण काही करत असतील त्याला रेव्ह पार्टी म्हणतात असे माझ्या तरी ऐकण्यात आलेले नाही असे जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितले.

प्रकाश आंबेडकर यांचे अभिनंदन

जेव्हा हे प्रकरण झालं तेव्हा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरच्यांशी बोलून विधानभवनात हे प्रकरण मांडण्याचा जोरदार प्रयत्न आपण केला होता. त्याला सरकारकडून देण्यात आलेल्या उत्तरांनाही आपण प्रत्युत्तर दिले होते. लागोपाठ तीनही अधिवेशनामध्ये 20 20 मिनिटं अर्धा- अर्धा तास भाषण करून ज्या आईने आपला मुलगा गमावला त्या आईच्या वेदना मी विधानभवनात एक विरोधी पक्षाचा आमदार म्हणून मांडण्याचा प्रयत्न केला होता. आम्ही रस्त्यावरची लढाई लढत होतो प्रकाश आंबेडकर हे कोर्टामध्ये लढाई लढत होते ,त्यांची लढाई वेगळी आमची लढाई वेगळे होते त्यांच्या लढाईला यश आलं त्यांचा अभिनंदनच केलं पाहिजे असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

सरकारला ‘पोलीस राज्यावर’ प्रचंड प्रेम

प्रकाश आंबेडकर यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे सुप्रीम कोर्टाने सांगितलं गुन्हे दाखल करा.सुप्रीम कोर्टाने सांगितलं नसतं तर या सरकारने जुमानले नसतं या सरकारला ‘पोलीस राज्यावर’ प्रचंड प्रेम आहे. त्यांच्या ट्विटला त्यांच्या शिवराळ भाषेला उत्तर देण्याची माझी संस्कृती नाही. जेव्हा सुजात आंबेडकरवर फर्ग्युसन कॉलेजमध्ये घोषणाबाजी झाली, मुंबईहून फर्ग्युसन कॉलेजमध्ये जाणारा पहिला माणूस जितेंद्र आव्हाड होता. मला कोणी आंबेडकर समजवायला जाऊ नये, मला कोणाची ऍलर्जी आहे हे सांगण्याचा शहाणपणा कोणीच करू नये असेही ते म्हणाले.

Follow Us
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?