AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

manoj jarange patil | मुंबईत मनोज जरांगे कसे पोहचणार, सोबत किती लोक येणार

manoj jarange patil maratha reservation | मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर मुंबई आंदोलनाचा मार्ग जाहीर केला आहे. या मार्गात मनोज जरांगे पाटील दोन दिवस पुण्यामध्ये थांबणार आहेत. पुण्यात एक कोटी मराठा बांधव जमा होणार असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.

manoj jarange patil | मुंबईत मनोज जरांगे कसे पोहचणार, सोबत किती लोक येणार
| Updated on: Jan 15, 2024 | 11:14 AM
Share

जालना, संजय सरोदे, दि.15 जानेवारी 2024 | मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर मुंबई येण्याचा मार्ग जाहीर केला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील 26 जानेवारीपासून मुंबईत उपोषण करणार आहेत. या आंदोलनादरम्यान अंतरवली ते मुंबई या प्रवासातील मुक्काम कुठे कुठे असणार आहे, या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. मुंबईत किती लोक येणार? हे ही त्यांनी सांगितले. मुंबईत आंदोलनास येण्यासाठी मनोज जरांगे पाटील 20 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता अंतरवलीमधून निघणार आहे. सर्व मराठा शंभर टक्के मुंबई जाणार आहे. त्यांनी आपल्या खाण्या पिण्याच्या वस्तू सोबत घ्यायच्या आहेत. शिवाजी पार्क आणि आझाद मैदान आम्हाला दोन्ही मैदान लागणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

असा असणार मार्ग

  • 20 जानेवारी पहिला मुक्काम- बीड तालुक्यातील शिरूर मातोरी डोंगर पट्ट्यात. (बीड)
  • 21 जानेवारी दुसरा मुक्काम – करंजी घाट, बारा बाभळी (नगर)
  • 22 जानेवारी तिसरा मुक्काम-रांजणगाव (पुणे जिल्हा)
  • 23 जानेवारी चौथा मुक्काम – खराडी बाय पास, (पुणे)
  • 24 जानेवारी पाचवा मुक्काम- (लोणावळा)
  • 25 जानेवारी 6 वा मुक्काम – वाशी, (नवी मुंबई)
  • 26 जानेवारी 7 मुक्काम आझाद मैदान आंदोलन स्थळी

पुण्यात एक कोटी मराठा येणार

पुण्यामध्ये मराठा समाज बांधवाचा अकाडा एक करोडो होणार आहे. आम्ही पुण्यात दोन दिवस थांबणार आहे. आम्हाला पुणे बघायचे आहे. पुण्यावरुन सर्व प्रकारची वाहने मुंबईकडे जाणार आहे. मुंबई जाणारे प्रत्येकजण आपल्या वस्तू सोबत घेणार आहेत. त्यांनी झोपताना आपल्या वाहनाजवळ झोपायचे आहे. मुंबई जाताना कुणीही व्यसन करायचे नाही. तसेच प्रत्येक जणांनी स्वयंसेवक म्हणून काम करायचे आहे. ज्यांच्याकडे पाण्याचे टँकर असेल, जनरेटर असेल त्यांनी ते घेऊन यावे, असे आवाहन केले. आंदोलनाला कोणी गालबोट लावत असेल तर त्याला पोलिसांचा ताब्यात देण्याची त्यांनी सांगितले.

प्रत्येक जिल्ह्यात गावाच्या वेशीपर्यंत

प्रत्येक जिल्ह्यातील मराठा बांधवांनी त्यांच्या गावाच्या हद्दीपर्यंत मराठा कार्यकर्त्यांसोबत चालायचे आहे. अंतरवलीमधून मी एकटा निघणार आहे. मग सोबत एक लाख असो की एक कोटी असो, ते पाहिले जाईल. रोज पायी बारावाजेपर्यंत चालायचे आहे. त्यानंतर मुक्कामी करायचा आहे. 90 ते 100 किलोमीटरवरच्या आत मुक्काम असणार आहे. आता सरकारला आता वेळ द्यायचा नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

मन गहिवरलं, डोळे पाणावले... दोन्ही ठाकरे बंधू एकत्र अन् मनसैनिक भावनिक
मन गहिवरलं, डोळे पाणावले... दोन्ही ठाकरे बंधू एकत्र अन् मनसैनिक भावनिक.
माझ्याकडे खूप VIDEO, ज्यात CM अल्लाह हाफिज... राज ठाकरेंचा गौप्यस्फोट
माझ्याकडे खूप VIDEO, ज्यात CM अल्लाह हाफिज... राज ठाकरेंचा गौप्यस्फोट.
राज ठाकरेंकडून ऐतिहासिक घोषणा अन् मुंबई महापौर पदावरून केला मोठा दावा
राज ठाकरेंकडून ऐतिहासिक घोषणा अन् मुंबई महापौर पदावरून केला मोठा दावा.
भाजप सोबत येत सेल तर.... जालना युतीवरून अर्जुन खोतकर यांचं मोठं विधान
भाजप सोबत येत सेल तर.... जालना युतीवरून अर्जुन खोतकर यांचं मोठं विधान.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेपूर्वी दोघांचा एकत्र प्रवास, बघा VIDEO
ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेपूर्वी दोघांचा एकत्र प्रवास, बघा VIDEO.
मुंबईत महायुतीत रस्सीखेच; भाजप, शिंदेसेना, दादांच्या NCP मध्ये पेच
मुंबईत महायुतीत रस्सीखेच; भाजप, शिंदेसेना, दादांच्या NCP मध्ये पेच.
पुण्यात दोन्ही पवारांच्या राष्ट्रवादीचं ठरलं, पण ठाकरे सेनेचा विरोध
पुण्यात दोन्ही पवारांच्या राष्ट्रवादीचं ठरलं, पण ठाकरे सेनेचा विरोध.
ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा पण मुंबईतली आकडेवारी काय?
ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा पण मुंबईतली आकडेवारी काय?.
बिबटे अन् पोट्टे, राणा दाम्प्त्य म्हणाले, हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला
बिबटे अन् पोट्टे, राणा दाम्प्त्य म्हणाले, हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला.
ऑल सेट... ठाकरे बंधूंचं ठरलं! आज 12 वाजता युतीची घोषणा होणार
ऑल सेट... ठाकरे बंधूंचं ठरलं! आज 12 वाजता युतीची घोषणा होणार.