AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जामनेरमध्ये एक लाख मराठा, बघतोच, इंगाच दाखवतो…मनोज जरांगेंच्या टार्गेटवर मंत्री गिरीश महाजन

देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाचा द्वेष करत आहे. त्यामुळे सगे सोयरेचा निर्णय होत नाही. देवेंद्र फडणवीस आमचा शत्रू नाही, पण मराठा द्वेषामुळे आणि त्यांच्या वागण्याची विचित्र पद्धतीमुळे आम्ही त्यांच्यावर नाराज आहोत. माझ्यावर खोटा खटला दाखल केला.

जामनेरमध्ये एक लाख मराठा, बघतोच, इंगाच दाखवतो...मनोज जरांगेंच्या टार्गेटवर मंत्री गिरीश महाजन
गिरीश महाजन मनोज जरांगे
| Updated on: Sep 03, 2024 | 12:47 PM
Share

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका करत आहे. मराठा आरक्षणात अडसर देवेंद्र फडणवीस असल्याचे ते सांगत आहेत. आता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे सर्वात विश्वासू मंत्री गिरीश महाजन यांना टार्गेट केले आहे. जामनेरमध्ये एक लाख वीस हजार मराठा आहेत. आता बघतोच गिरीश महाजनकडे… इंगाच दाखवतो… या शब्दांत मनोज जरांगेने गिरीश महाजनला आव्हान दिले आहे.

मनोज जरांगे पाटील पुणे जिल्हा दौऱ्यावर आहेत. मंगळवारी बोलताना ते म्हणाले की, निवडणूक लढविण्याबाबत पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांबाबत चर्चा झाली आहे. पण निर्णय कोणताही झाला नाही. पुन्हा एकदा बैठक घेऊ आणि मग ठरवू की निवडणूक लढवायची की २८८ पाडायचे आहेत. आम्ही आमची रणनीती उघड करणार नाही. अन्यथा देवेंद्र फडणवीस डाव करतील, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

फडणवीस यांची लोक भेटतात…

देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे लोक मला येऊन गुपचूप भेटतात. ती लोक देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात तक्रार करतात. निवडणूक लढवण्याची वेळ आली तर मी सगळे उघड करेन. दहशतीने निवडणूक जिंकता येत नाही तर मायेने जिंकता येणार आहे, हे देवेंद्र फडणवीस यांनी समजून घ्यावे. देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय सरकारमधील पानही हलत नाही.‌ मुख्यमंत्री कोणीही असो पण निर्णय फडणवीस घेत आहेत.

देवेंद्र फडणवीस यांना मराठ्यांचा द्वेष

देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाचा द्वेष करत आहे. त्यामुळे सगे सोयरेचा निर्णय होत नाही. देवेंद्र फडणवीस आमचा शत्रू नाही, पण मराठा द्वेषामुळे आणि त्यांच्या वागण्याची विचित्र पद्धतीमुळे आम्ही त्यांच्यावर नाराज आहोत. माझ्यावर खोटा खटला दाखल केला. मराठवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोहचावा यासाठी आम्ही नाटक आणले होते. त्यात तोटा आला. आम्ही आमच्या परीने पैसे दिले. जबाबदारी वाटून घेतली. पण माझ्यावर देवेंद्र फडणवीस यांनी खोटा खटला दाखल केला, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.

राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.