AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जरांगेंचा गनिमी कावा, मराठ्यांनो गुपचूप मुंबईकडे निघा..

मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच मुंबईचा प्लान सांगितला आहे. जरांगे यांनी मोठी घोषणा केली. येत्या एक ते दोन दिवसात नक्की काय करायचे हे सांगताना जरांगे पाटील यांनी सांगितले. मोठी घोषणा त्यांनी केली.

जरांगेंचा गनिमी कावा, मराठ्यांनो गुपचूप मुंबईकडे निघा..
Manoj Jarange Patil
| Updated on: Aug 31, 2026 | 1:16 PM
Share

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला मोठे आवाहन केले. आजपासून मुंबईत दाखल होण्यास सुरूवात करा, असे त्यांनी म्हटले. पुढचे 12 दिवस हळूहळू मुंबईत जा. पोलिसांना कळू देऊ नका. मराठे मुंबईत आलेत हे कोणालाही कळू देऊ नका. सगळे सोबत जाणे शक्य नाही. मी पण हळूहळू मुंबईत येतो. मी आलो की, मग तुम्ही बाहेर पडा. मित्र, नातेवाईकांकडे जा. जर तुम्हाला पोलिसाने पकडून नेले तर घाबरून जाऊ नका. उलट तुमची तिथे जास्त सोय होईल. तुम्हाला कोण नेते ते पण मी बघतो. आझाद मैदानात जाऊ नका. गणपती बघायला, मुंबईतील पाहुण्यांना भेटायला जाऊ शकतात. पण आजपासून मुंबईत जायला सुरूवात करा. सरकारकडून कोणीही संपर्क केला नाही. आमच्या इतके देव देव कोणीही करत नाहीत, ते दीड दिवसाचा गणपती बसवतात. त्यांच्याकोणी जवळचे असतील त्यांना निरोप आला असेल मला तर आला नाही.

मी कालपासून इथून उठलो पण नाही. 24 तास हे सोडून द्या पोरांनो आपले मुंबईचे सुरू करा. आझाद मैदानाकडे जाऊ नका, असेही स्पष्ट शब्दात जरांगे यांनी म्हटले. मी मुंबईत आल्यावर या असेही त्यांनी म्हटले. भाजपामध्ये आलेले लोक जेलमध्ये जाऊ शकत नाहीत, ते संविधानिक आहे. कितीही मोठे खोटाळे केले तरीही. ते दोन संविधान चालवतात.

आपले सोपे करा. आपले हळूहळू 12 तारखेच्या अगोदर मुंबईला जा. मित्राकडे जा. पोलिसांनी धरले तर नीट पोलिस स्टेशनला जा. जे जात आहेत, पुढे त्यांनी झेंडा बांधून जाऊ नका. ते ओळखतात, हळूहळू जा.. माझ्यासोबत थांबू नका. आपल्याला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे बघायचे आहे.

आपल्याला पोलिसांकडे नाही बघायचे, पोलिसांना त्रास देऊ नका. उपोषण मी सोडणार नाही, मी मुंबईतच जाणार. अजिबात आझाद मैदानात आणि वर्षा बंगल्यावर जायचे नाही, त्यांना संशय येणार नाही. नातेवाईकांकडे जा, तिथे जाऊन गप राहा. खूप लोक आपले तिकडे आहेत. एक ते दोन लाख घर आपली तिकडे आहेत. पोलिस काय लय नाहीत, उगाच इथे

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट