Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंची प्रकृती अचानक बिघडली; सांभाजीनगरमध्ये उपचार सुरू
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अचानक बिघडली असल्याने त्यांना संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालवल्याने त्यांना संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सतत सुरू असलेल्या उपोषणामुळे त्यांची तब्येत खालवल्याचं सांगण्यात आलं आहे.
आज सकाळी काही कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले. यावेळी जरांगे पाटील यांना त्यांच्यासमोरच भोवळ आली. या कार्यकर्त्यांनी त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल केले. सततचं उपोषण आणि दौरे यामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. गेली काही दिवस मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासह अन्य मागण्यासाठी अनेकदा बेमुदत उपोषण केले होते. या उपोषणाचा त्यांच्या शरीरावर परिणाम झाल्याने त्यांची तब्येत अचानक बिघडली आहे.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर

