AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil : मुंबईत कुठे रहायचं? कुठे जायचं नाही? पोलिसांनी पकडू नये यासाठी काय ट्रिक वापरायची? जरांगेंकडून प्लान जाहीर, भगवं वादळ धडकणार

Manoj Jarange Patil : "जेलमध्ये जाणारे जे लोकं आहेत, ते इथे आले की संविधान बदलतं. मग तुम्ही 75 टक्के, 2000 कोटी कितीही घोटाळा करा, तुम्हाला जेल होणार नाही. दोन संविधान चालू आहेत" अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे.

Manoj Jarange Patil : मुंबईत कुठे रहायचं? कुठे जायचं नाही? पोलिसांनी पकडू नये यासाठी काय ट्रिक वापरायची? जरांगेंकडून प्लान जाहीर, भगवं वादळ धडकणार
Manoj jarange patil
| Updated on: Aug 31, 2026 | 12:09 PM
Share

मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवली सराटी येथे सुरु असलेल्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. त्यांनी समर्थकांना मुंबईत जाण्याचं आवाहन केलं आहे. “आजपासून 12 तारखेपर्यंत मुंबईत जा, पोलिसांनी नेलं तरी चालेल” असं मनोज जरांगे पाटील बोलले. मुंबईत कसं जायचं, कुठे रहायचं त्याचा प्लानही त्यांनी सांगितला. “मुंबईत विदर्भ, मराठवाडा, कोकणातले लाखो लोक राहतात. एकेका घरात चार-चार, पाच-पाच लोकं राहिले तर 20-25 लाख संख्या होईल” असं जरांगे पाटील यांनी सांगितलं. “12 सप्टेंबर, 13 सप्टेंबर, 14, 15, 16, 17, 20, 12 ते 20 सप्टेंबरपर्यंत परवानगी काढा. मुंबईत पाहुणे, मित्रमंडळींकडे रहा. आझाद मैदान, वर्षावर जाऊ नका” संशय येईल असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“12 तारखेच्या दोन-चार दिवस अगोदर हळूहळू तुम्हाला पुढे जाता येईल. उगाच घोळ घालू नका. एकदा का 12 तारखेला दोन-चार दिवस राहिले की, हळूहळू मुंबईकडे जा. मित्राकडे रहा. पोलिसांनी नेलं तर खुशाल पोलीस स्टेशनला जा, टेन्शन घेऊ नका” असं मनोज जरांगे पाटील बोलले. “पुढे जाताना गाडीला झेंडा बांधून जाऊ नका. झेंडा बांधून जायचं नाही. हळूहळू घुसा, दोन-चार दिवस आधी. पाच-सहातारखेपासून हळूहळू पुढे जा. सगळ्यांनी माझ्यासोबत येऊ नका. पोलिसांना त्रास द्यायचा नाही. एकनाथ शिंदे, फडणवीसांकडे बघायचय आपल्याला. पोलिसांना त्रास द्यायचा नाहीय.आलं का ध्यानात, उगाच टाइमपास करु नका. दोन-चार दिवस आधी मुंबईकडे निघा” असं आवाहन जरांगे पाटील यांनी समर्थकांना केलं.

कमीत कमी एक दोन लाख घरं आहेत

“मुंबईत आपले मराठे आहेत. दोन-तीन लाख घरात पाच-पाच पोरं राहिली तरी 20-25 लाख आधीच जमतील. नीट पत्ता घ्या. आझाद मैदानावर जाऊ नका, वर्षावर जाऊ नका. नाही तर त्यांना संशय येईल. डाव टाकायला शिका” असं मनोज जरांगे पाटील बोलले. “कमीत कमी एक दोन लाख घरं आहेत. कोकण, मराठवाडा, विदर्भ, पुण्यातले खूप लोक आहेत. दोन-तीन लाख माथाडी कामगार आपले आहेत. इथली दोन-चार दिवस गर्दी कमी झाली काही फरक पडत नाही. मुंबईत दोन-चार दिवस आधी जाऊन रहा. त्यांना फक्त त्रास देऊ नका” असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं.

Follow Us
काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; मंदिर व्यवस्थापनाने....
Kashi Vishwanath Temple : काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; वकिलांचा गंभीर आरोप, मंदिर व्यवस्थापनाने काय दिलं उत्तर?
मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
Mumbai FDA : मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...