AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भगवं वादळ पुन्हा मुंबईत धडकणार? मराठा समन्वयकांकडून आझाद मैदानाची पाहाणी, जरांगेंच्या इशाऱ्यानंतर हालचालींना वेग

मनोज जरांगे पाटील यांच्याकडून पुन्हा एकदा मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे, मनोज जरांगे पाटील यांच्या या इशाऱ्यानंतर आता हालचालींना वेग आला असून, मराठा समन्वयकांकडून आझाद मैदानाची पाहाणी करण्यात आली आहे.

भगवं वादळ पुन्हा मुंबईत धडकणार? मराठा समन्वयकांकडून आझाद मैदानाची पाहाणी, जरांगेंच्या इशाऱ्यानंतर हालचालींना वेग
Manoj Jarange PatilImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 23, 2026 | 11:57 AM
Share

मुंबईत  मराठा समन्वयकांकडून आझाद मैदानाची पाहाणी करण्यात आली आहे.  मनोज जरांगे पाटील यांच्या  आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानाची पाहणी करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईत येण्याचा इशारा दिला आहे, त्या पार्श्वभूमीवर आता मराठा समन्वयकांकडून आझाद मैदानाची पाहणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी गणेशोत्सवाच्या काळातच मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये येऊन मोठं आंदोलन केलं होतं. त्यावेळी आझाद मैदानासोबतच मुंबईच्या रस्त्यांवर देखील मराठा समाजाची ताकद पहायला मिळाली होती. यावेळी 29 ऑगस्टपासून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू होत आहे.

परंतु ते अंतरवालीमध्ये होईल किंवा मुंबईमध्ये होईल असे दोन पर्याय सध्या आहेत. या पार्श्वभूमीवर मराठा समन्वयक हे मुंबईमधील आझाद मैदानावर पोहोचले आहेत, मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या आंदोलन इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळाकडून आझाद मैदानाची पहाणी करण्यात आली आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन झालं तर स्टेज कुठे असेल, बसण्याची व्यवस्था कशी असेल? याचा आढावा या शिष्टमंडळाकडून घेण्यात आला आहे. यानंतर आता चर्चा करून मनोज जरांगे पाटील हे आपलं उपोषणाचं स्थळ ठरवणार आहेत.

मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीमध्येच उपोषण करणार असल्याची माहिती समोर येत आहे, मात्र तरी देखील पर्याय म्हणून आंदोलनासाठी मुंबईचा देखील विचार सुरू आहे, यापूर्वीच त्यांनी मुंबईमध्ये येण्याचा इशारा दिला होता, मनोज जरांगे पाटील यांच्या इशाऱ्यानंतर आता हालचालींना वेग आला असून, मराठा समन्वयकांकडून आझाद मैदानाची पहाणी करण्यात आली आहे. गेल्यावेळी देखील मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन केलं होतं, मराठा बांधवांकडून मुंबईत चक्काजाम आंदोलन करण्यात आलं, त्यानंतर हायकोर्टाच्या आदेशानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं होतं. त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या मान्य देखील झाल्या होत्या, त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील नेमकं आंदोलन कुठे करणार? अंतरवाली सराटी की, मुंबई याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...