मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय, 5 हजार नाही तर 50 लोक… दुपारपर्यंत परवानगी मिळाली नाही तर..

Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील मुंबईवर येण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. आझाद मैदानावर त्यांना परवानगी नाकारण्यात आली. यादरम्यानच त्यांनी दुसरे पत्र पोलिसांना दिले.

मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय, 5 हजार नाही तर 50 लोक... दुपारपर्यंत परवानगी मिळाली नाही तर..
Manoj Jarange Patil
| Updated on: Sep 15, 2026 | 9:52 AM

Manoj Jarange Patil Mumbai Morcha : 19 सप्टेंबरपासून मनोज जरांगे पाटील मुंबईत उपोषणाला बसणार आहेत. आझाद मैदानावर उपोषण करण्याची परवानगी त्यांनी मागितली. मात्र, त्यांना परवानगी नाकारण्यात आली. परवानगी नसतानाही मनोज जरांगे पाटील मुंबईला येण्यावर ठाम आहेत. सुरूवातीला त्यांनी पाच हजार लोकांना आंदोलनासाठी परवानगी आझाद मैदानावर मागितली होती. मात्र, त्यांना परवानगी नाकारण्यात आली. काही वेळातच मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना होतील. त्यांचे रस्त्यात तीन मुक्काम आहेत. साधारण अकरा वाजता मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना होतील. जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील सोबत शेकडो पोलिस उपस्थित राहणार आहेत. जरांगे पाटील यांनी मुंबईला जाण्याचा आपला मार्ग अगोदरच सांगितला आहे.

मनोज जरांगे पाटील आता मोजक्या समर्थकांना घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. आता नवा अर्ज परवानगीसाठी करण्यात आला. या अर्जानुसार, 50 लोकांना आंदोलन करण्यासाठी परवानगी द्यावी, असे म्हणण्यात आले. आम्ही सगळे नियम आणि अटी मान्य करून आंदोलन करू. आम्ही दिलेल्या वेळेतच आंदोलनाला सुरूवात करू, असेही अर्जात सांगण्यात आले.

आज दुपारपर्यंत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. जर यावेळीही आंदोलनासाठी परवानगी नाकारली तर जरांगे कोर्टात अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळतंय. मात्र, सर्वकाही पोलिस जरांगे यांना आंदोलनासाठी परवानगी देणार की नाही, यावर अवलंबून आहे. दुसरीकडे सरकारकडून सांगितले जात आहे की, आम्ही जरांगेंच्या सर्व मागण्या अगोदरच मान्य केल्या.

काही मागण्या कोर्टात आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी अगोदरच जाहीर केले की, जर पुन्हा परवानगी पोलिसांनी नाकारली तर मी एकटाच आंदोलनाला जाणार आहे. बाकी लोक येतील, त्यांच्या हिशोबाने. मुंबई पोलिसांकडून कायदेशीर आणि सुरक्षेची कारणे देऊन उपोषणाला परवानगी दिली जात नाही. मात्र,असे असले तरीही जरांगे आपल्या उपोषणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. नव्या अर्जात जरांगे यांनी आता 50 लोकांच्या परवानगी मागितली आहे. जरांगे सरकारवर गंभीर आरोप करताना दिसत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us