मंडप नाही, सावली नाही, फक्त रणरणतं ऊन; जरांगे पाटील उपोषणावर ठाम, शिष्टमंडळ आलं तसं गेलं

मनोज जरांगे पाटील हे येत्या 30 मे पासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. दरम्यान या पार्श्वभूमीवर आज सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. मात्र या भेटीमध्ये कोणताही तोडगा न निघाल्यानं मनोज जरांगे पाटील हे उपोषणावर ठाम आहेत.

मंडप नाही, सावली नाही, फक्त रणरणतं ऊन; जरांगे पाटील उपोषणावर ठाम, शिष्टमंडळ आलं तसं गेलं
manoj jarange patil
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 29, 2026 | 8:01 PM

मराठा आरक्षणासंदर्भातील आपल्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. ते 30 मे पासून आमरण उपोषण सुरू करणार आहेत. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आल्याचं पहायला मिळत आहे. आज सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांचा समावेश होता. मात्र या शिष्टमंडळाला मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यात अपयश आलं आहे. मनोज जरांगे पाटील आणि शिष्टमंडळाच्या चर्चेमध्ये मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्यांवर कोणताही तोडगा निघू न शकल्याने मनोज जरांगे पाटील हे आपल्या उपोषणाच्या निर्णयावर ठाम आहेत.

उद्यापासून मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला सुरुवात करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी एक पत्रकार परिषद देखील घेतली होती, याच पत्रकार परिषदेमधून त्यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. आपण रणरणत्या उन्हात उपोषण करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.  मराठा समाजाच्या लेकरांवर अन्याय होत आहे, मी कोणाला दोष देत नाही, परंतु गोरगरीबांच्या लेकरांवर अन्याय होत आहे, त्यामुळे भूमिका घ्यावीच लागेल असं जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं.

दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर घडामोडींना वेग आल्याचं पहायला मिळालं. राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मात्र या भेटीत कोणताही तोडगा निघू शकलेला नाही, त्यामुळे आता उद्यापासून मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? 

दरम्यान सरकारी शिष्टमंडळाच्या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी आता सरकारला वेळ देण्यास तयार नाही. सातारा गॅझेटचा जीआर द्यावा अशी आमची मागणी आहे.  मला लेखी द्या, असा पर्याय मी त्यांच्यासमोर ठेवला होता.  मात्र आता आंदोलन थांबणार नाही, उद्या सकाळी दहा वाजेपासून आंदोलनाला सुरुवात होईल असं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us