
हिंदुहृदयसम्राट आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. आजपासून बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरवाता झाली आहे. यानिमित्तच्या एका कार्यक्रमात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे आज एका कार्यक्रमात एकत्र आले आहेत. यावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला, तसेच त्यांनी विरोधकांवरही हल्ला केला. उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
भाषणाची सुरुवात करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘मला नाही वाटत की असं भाग्य दुसऱ्या कोण्याही नेत्याला लाभलं असेल. आजपासून शिवसेनाप्रमुखांच जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. कदाचित कुणाचा गैरसमज झाला असेल 1926 नव्हे 1927 हे त्यांचं जन्मवर्ष. पुढच्या वर्षा 100 वर्षे पूर्ण होतील. या सगळ्या काळामध्ये अनेक चढउतार आपण सर्वांनी पाहिले अनुभवले. मघाशी राज पण आला. आमचं दोघांचं बालपण एकत्र मिळवलं. एक गोष्ट खरी आहे, आम्ही वादळामध्ये खेळत मोठी झालेली मुलं आहोत. त्याच्यामुळे वादळाशी कसं लढायचं हे आम्हाला कुणी शिवण्याची गरज नाही. वादळाशी जसं लढायचं असतं, तसं वादळाची जबाबदारी खांद्यावर पेलणं किती कठीण असतं हे ज्याच्या खांद्यावर जबाबदारी असते त्यालाच माहित असतं.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘आज आपल्याशी बोलताना हा सर्व काळ डोळ्यासमोरून जात आहे, नेमकी कोणती गोष्ट सांगायची हे कळत नाही. मी नेहमी सर्वांना सांगतो की शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट हे सर्व जगासाठी माझी ओळख वडील म्हणून त्यांच्याशी पहिल्यांदा झाली. माँ आणि साहेब. साहेबांना चार चौघात आम्ही साहेब म्हणायचो. आमचं वडील आणि मुलाचं नात वेगळं होतं. सगळ्या वाटचालीत माँ यांच योगदान खूप मोठं आहे. माझी माँ शांतपणाने घर सांभाळत होती. आम्हाला बाहेर काय चाललय याची जाणीव होऊ न देता त्या भूमिका पार पाडत होत्या.’
विरोधकांवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘बाळासाहेबांना आणि आजोबांना परिस्थितीनुसार सातवीत शाळा सोडावी लागली होती. पण त्यांनी एवढं जे काही कर्तुत्व उभं करून ठेवलेलं आहे, हे ठाकरे नाव पुसायला अनेकजण इकडे उतरत आहेत, पण अजून ते नाव पुसलं जात नाही. असं काय ते वेगळं रसायन होतं, त्यांचे आम्ही वारसार. याला घराणेशाही म्हणायचं तर तसं म्हणा, मला घराणेशाहीचा आणि घराणेच्या परंपरेचा अभिमान आहे, माझं भाग्य आहे ते. जे विरोधक आहेत त्यांना त्यांच्या वडिलांच नाव घ्यायला लाज वाटते त्याला मी काय करू शकत नाही.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘जेव्हा आपण महाराष्ट्राचा विचार करतो, शिवाजी महाराज आणि त्यांच्या आधी जर पाहिलं तर गद्दारी हा विषय आजचा नाहीये, तो पूर्वीपासून चालत आलेला आहे. तो आपल्याला शापच लाभलेला आहे. जेव्हा विजय अशक्य असतो तेव्हा आपला शत्रू गद्दारांची मदत घेत असतो. गद्दारी जर आजपर्यंत भगव्याशी झाली नसती तर या महाराष्ट्राने जगाचा इतिहास बदलून दाखवला असता.’