AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा जीआर महागात पडणार, उद्या बंजारा, धनगर पुढे आले तर काय करणार ? ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा सवाल

मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट संदर्भातला शासन निर्णय जो काढला आहे तो सरकारलाच महागात पडणार आहे. हा निर्णय फक्त ओबीसीचं नाही तर सर्वच मागासवर्गीयांचं आरक्षण संपवणारा आणि आरक्षणाचा बट्ट्याबोळ उडवणारा निर्णय असल्याची टीका ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केली आहे.

हा जीआर महागात पडणार, उद्या बंजारा, धनगर पुढे आले तर काय करणार ? ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा सवाल
Prakash Shendge
| Updated on: Sep 05, 2025 | 12:26 AM
Share

मराठा आरक्षणासाठी हैदराबाद आणि सातारा गॅझेटबाबतचा जीआर सरकारने मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला घाबरुन दिला असला तर हा निर्णय सरकारला पुढे चांगलाच महागात पडणार आहे. केवळ ओबीसीचं नाही तर सर्वच मागासवर्गीयांचा आरक्षण संपवणारा हा निर्णय आरक्षणाचा बट्ट्याबोळ उडवणारा असल्याची जोरदार टीका ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केली आहे.

महाराष्ट्र बंद केला, जाळपोळ केली,बस जाळली म्हणून आरक्षण द्या असं होत नाही. मनोज जरांगे यांच्या धमक्यांना आता सरकारने किती भीक घालायची हा त्यांचा प्रश्न आहे. आमचं फक्त आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये एवढीच आमची भूमिका असल्याचेही ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी म्हटले आहे.

गॅझेटिअरमध्ये प्रत्येक समाजाचीच नोंद असल्यामुळे पुढच्या काळामध्ये बंजारा समाज, धनगर समाज याबरोबरच इतर सर्व समाज सुद्धा आरक्षणाची मागणी करेल आणि त्यानंतर सरकारला ते द्यावेच लागेल असा सावधनतेचा इशाराही शेंडगे यांनी दिला आहे. सग्या सोयऱ्या संदर्भातला शासन निर्णय बदलता येत नाही म्हणून तीच भाषा सरकारने या शासन निर्णयात मांडल्याचेही विधान प्रकाश शेंडगे यांनी यावेळी केले आहे. मराठ्यांसाठी शासन निर्णय घेत असेल तर धनगरांसाठी का निघू नये बंजारा समाजासाठी का निघू नये? असा सवाल देखील प्रकाश शेंडगे यांनी उपस्थित केला आहे.

तायवाडे यांनी आंदोलन मागे का घेतले?

कोणत्या १२ मागण्या मान्य केल्या, त्याचा शासन निर्णय निघाला का ? शासन निर्णय न घेताच बबन तायवाडे यांनी उपोषण कसं सोडलं? असा प्रश्न प्रकाश शेंडगे यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नागपूर येथील बबन तायवडे यांच्या उपोषणावर बोलताना केला आहे. गेल्यावेळी अशाच मागण्या मान्य झाल्या होत्या, मात्र त्याचे किती शासन निर्णय निघाले.? एकही नाही निघाले ना…? जरांगे यांच्याप्रमाणेच तायवाडे यांनी सुद्धा शासन निर्णय काढत नाही तोपर्यंत मंत्र्यांना फिरू देणार नाही असं म्हणायला पाहिजे होतं. बबन तायवाडे यांनी काय भूमिका घेतली , छगन भुजबळ यांनी काय भूमिका घेतली याला महत्त्व नाही समाजाने काय भूमिका घेतली याला महत्त्व आहे असेही पुढे प्रकाश शेंडगे यांनी म्हटले आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी