... तर 26 सप्टेंबरला रोह्यातील तांबडीतून 60 वा मराठा क्रांती मोर्चा

रोह्यातील बलात्कार आणि हत्या प्रकरणात मराठा क्रांती मोर्चाने राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे (Maratha Kranti Morcha on Roha rape case).

... तर 26 सप्टेंबरला रोह्यातील तांबडीतून 60 वा मराठा क्रांती मोर्चा

रायगड : रोह्यातील बलात्कार आणि हत्या प्रकरणात मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजन घाग यांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे (Maratha Kranti Morcha on Roha rape case). “या प्रकरणात राजकीय दबाव वाढत आहे. तपास योग्य दिशेने होत असताना मराठा तपास अधिकाऱ्याकडून अचानक तपास काढून घेण्यात आला. आता 24 सप्टेंबरपर्यंत या प्रकरणी आरोपपत्र दाखल न झाल्यास 26 सप्टेंबरला महाराष्ट्रातील 60 वा मराठा क्रांती मोर्चा रोह्यातून निघेल,” असं मत राजन घाग यांनी व्यक्त केलं.

रोह्यातील तांबडी गावात मराठा समुदायातील एका मुलीवर बलात्कार करुन हत्या झाली. मात्र, अद्यापही या गुन्ह्यातील सर्व दोषींवर कारवाई न झाल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजन घाग यांनी केला आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

राजन घाग म्हणाले, “मराठा म्हणून आम्हाला उभं राहायची गरज नव्हती. मात्र, न्याय मिळत नव्हता. सुरुवातीला योग्य दिशेने तपास करणाऱ्या सुर्यवंशी नावाच्या अधिकाऱ्याकडून तपास काढून दुसरीकडे दिला गेला. कोपर्डीच्या नराधमांना फाशी होत नाही. दुसरीकडे तांबडीत तशीच घटना घडते. या घटनेचं राजकारण होऊ नये असं आम्हाला वाटतं.”

“कुठल्याही प्रकरणाची चार्जशीट दाखल व्हायला 60 दिवस लागतात. जे 24 सप्टेंबरला पूर्ण होतात. आम्ही 24 सप्टेंबरपर्यंत चार्जशीट दाखल होण्याची वाट बघू. नाहीतर 26 सप्टेंबरला तांबडीतून 60 व्या मराठा मोर्चाला सुरुवात करु,” असंही राजन घाग यांनी सांगितलं.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

“तांबडीतील प्रकरणात राजकीय दबाव वाढत आहे. मराठा तपास अधिकारी असल्याने त्यांच्याकडून तपास काढण्यात आला. नागरिकांच्या उद्रेकाआधीचा सरकारला इशारा आहे. त्यांनी दोषींवर कारवाई करावी. अन्यथा 26 सप्टेंबरला तांबडीतून 60 वा मराठा मोर्चा निघेल,” असा इशारा घाग यांनी सरकारला दिला.

संबंधित बातम्या :

रोह्यात बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह जंगलात सापडला

रोह्यात बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीची हत्या, अवघ्या 12 तासात आरोपीला अटक

Maratha Kranti Morcha | कोपर्डी, रोहा निकालाबाबत लेखी आश्वासन द्या – राजन घाग

Maratha Kranti Morcha on Roha rape case

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *