रोह्यात बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह जंगलात सापडला

रोहा तालुक्यातील तांबडी येथील 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची घटना घडली.

रोह्यात बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह जंगलात सापडला

रायगड : रोहा तालुक्यातील तांबडी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन (Minor Rape And Murder In Roha) तिची हत्या केल्याची धक्कादायक आणि संतापनजक घटना रविवारी (26 जुलै) सायंकाळी उशिरा उघडकीस आली. याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला असून काही सशंयितांना ताब्यात घेऊन कसुन चौकशी सुरु आहे (Minor Rape And Murder In Roha).

रोहा तालुक्यातील तांबडी येथील 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, रविवारी संध्याकाळपासून ही मुलगी बेपत्ता होती. त्यामुळे कुटुंबियांकडून तिचा शोध सुरु होता. सायंकाळी ताम्हणशेत जवळील जगंलात एका ओव्हळाजवळ या मुलीचा मृतदेह सापडला. याबाबतची माहिती रोहा पोलिसांना मिळताच त्यांची घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा रोहा पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञातावर बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

या घटनेनंतर पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ हे रोह्यात दाखल झाले आणि रात्रीपासुन ठाण माडुंन बसले. याप्रकरणी काही सशंयितांना ताब्यात घेतले असून आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे.

या घटनेचा अधिक तपास रोह्याचे डिवायएसपी किरण सूर्यवंशी हे करत आहेत. दरम्यान, या घटनेबाबत रोह्यामधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, सदरची घटना समजताच रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन हे कृत्य करणार्‍या नराधमाला लवकरात लवकर अटक करुन कठोरात कठोर शिक्षा व्हावी, असे आदेश रायगड जिल्हा डिवायएसपी अनिल पारसकर यांना देण्यात आले.

Minor Rape And Murder In Roha

संबंधित बातम्या :

विवाह्यबाह्य संबंधाच्या संशयातून पत्नीची हत्या, दुबईत भारतीय तरुणाला जन्मठेप

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *