AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहिलीच चर्चा निष्फळ… मनोज जरांगे आणि शिंदे समितीत या 4 मुद्द्यांवर झाली चर्चा; वाचा सविस्तर

राज्यातील कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समितीची स्थापना करण्यात आली आहे. आज निवृत्ती न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळी जरांगे पाटील आणि शिंदे यांच्यात 4 महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.

पहिलीच चर्चा निष्फळ... मनोज जरांगे आणि शिंदे समितीत या 4 मुद्द्यांवर झाली चर्चा; वाचा सविस्तर
Jarange patil and Shinde Samiti Discussion
| Updated on: Aug 30, 2025 | 4:29 PM
Share

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. राज्यातील कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीने गेल्या 13 महिन्यांमध्ये राज्यातील अनेक कुणबी नोंदी शोधल्या आहेत. आज निवृत्ती न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळी जरांगे पाटील आणि शिंदे यांच्यात 4 महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. हे मुद्दे कोणते आहेत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सातारा आणि हैद्राबादच्या गॅझिटेरिअरला एक मिनिटाचा वेळ देणार नाही – जरांगे पाटील

आज माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे आणि जरांगे पाटलांमध्ये सातारा आणि हैद्राबादच्या संस्थानात सापडलेल्या कुणबी नोंदींबाबत चर्चा झाली. शिंदे समितीने जरांगे पाटलांकडे काही वेळेची मागणी केली. मात्र सातारा आणि हैद्राबादच्या गॅझिटेरिअरला एक मिनिटाचा वेळ देणार नाही असं जरांगे पाटलांनी म्हटलं आहे. ‘कारण शिंदे समितीने 13 महिने अभ्यास केला आहे. मराठवाड्यातील मराठा कुणबी आहे, असं जाहीर करा आणि उद्यापासूनच प्रमाणपत्र द्या. या दोन गॅझेट नुसार मराठवाड्यातील मराठा हा कुणबीच आहे. यात वादच नाही आणि तोडच नाही असंही ते म्हणाले.

औंध आणि मुंबई गव्हर्नमेंट गॅझेटच्या अभ्यासासाठी दोन महिने वेळ देणार

शिंदे समितीने औंध आणि मुंबई गव्हर्नमेंट गॅझेटच्या अभ्यासासाठी वेळ मागितला आहे. यावर बोलताना जरांगे पाटलांनी अभ्यासासाठी दोन महिन्यांचा वेळ देतो असं सांगितलं. जरांगे म्हणाले की, ‘आम्ही औंध आणि बॉम्बे गव्हर्नेमेंटला वेळ द्यायला तयार आहे. सहा महिन्याऐवजी दोन महिन्याचा कालावधी देऊ. मात्र सातारा आणि हैद्राबादच्या गॅझेटमध्ये नियमात तरतूद करून लगेच अंमलबजावणी करा. त्याला वेळ देणार नाही.’

सरसकट केसेस मागे घ्या

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यावर बोलताना, ‘जरांगे पाटील म्हणाले की, आंदोलकांवर दाखल झालेल्या केसेसही सरसकट मागे घ्या. आमच्यावर हल्ला झाला. आम्ही हल्ला केला नाही. पोलिस अधिकाऱ्यांवर हाफ मर्डरचा गुन्हा दाखल करा. त्यांना बडतर्फ करा. यात अनेक पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे.’

आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये आणि नोकरी द्या

मराठा आरक्षणासाठी लढा देताना अनेक मराठा बांधवांचा मृत्यू झाला आहे. यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, ‘ज्या लोकांनी आरक्षणासाठी बलिदान दिलं आहे, त्याची लेकरं बाळं उघडे पडले आहे, त्याच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे. त्या सर्वांना लगेच नोकरी आणि 10 लाखांचा निधी द्या. त्या कुटुंबातील माणूस माघारी येऊ शकत नाही, मात्र या निधीमुळे मुलांना शिकवण्यासाठी मदत होईल. या मागणीबाबत कोणतीही तडजोड होणार नाही.’

Follow Us
पुजाऱ्याच्या वेशात पप्पू यादव, हातात दानपेटी! राममंदिर प्रकरणावरून...
Delhi | पुजाऱ्याच्या वेशात पप्पू यादव, हातात दानपेटी! राममंदिर दानपेटी प्रकरणावरून दिल्लीत राजकीय रणकंदन
खडकवासला फुल्ल! 11 दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Pune | खडकवासला फुल्ल! 11 दरवाजे उघडले; प्रशासनाचा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
FDA ला हायकोर्टाचा दणका! 98% स्वच्छतेचा दावा ठरला खोटा
FDA ला हायकोर्टाचा दणका! मंत्रालयाच्या कँटीनमध्ये माश्या, धूळ; 98% स्वच्छतेचा दावा ठरला खोटा
भिवंडीत भीषण दुर्घटना! 4 मजली इमारत कोसळली; 9 जणांचा मृत्यू, अनेकजण...
Bhiwandi Building collapsed | भिवंडीत भीषण दुर्घटना! 4 मजली इमारत कोसळली; 9 जणांचा मृत्यू, अनेकजण अजुनही ढिगाऱ्याखाली
लाज वाटत नाही का? ही कोणती संस्कृती?; ठोंबरेंचा भाजप नगरसेविकेला सवाल
Rupali Thombare Patil | लाज वाटत नाही का? ही कोणती संस्कृती?; चिमुकल्यांकडून पाय धुऊन घेतल्याप्रकरणी ठोंबरेंचा भाजप नगरसेविकेला सवाल
विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! दीपकेंचा आरोप
Abhijeet Dipke | विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! अभिजीत दीपकेंचा गंभीर आरोप
अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन!
Uddhav Thackeray | अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन! आंदोलनाच्या यशानंतर मोठी चर्चा
तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस, कँटीन बंद करण्याचे आदेश
अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद...
Sansad Bhavan Park | अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद भवनाबाहेर आंदोलन
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल; विखे पाटलांनी दिली मोठी अपडेट, म्हणाले...