Manoj Jarange: नितेश राणे तर चुचुंद्री, हा कसला 96 कुळी मराठा? मनोज जरांगेंनी पुरती काढली
मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते नितेश राणे यांच्यावर सकडून टीका केली आहे. त्यांनी नितेश राणेंचा उल्लेख चुचुंद्री केला आहे. जरांगे पाटील यांनी याबाबत नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहेत. अशातच आता मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते नितेश राणे यांच्यावर सकडून टीका केली आहे. त्यांनी नितेश राणेंचा उल्लेख चुचुंद्री केला आहे. जरांगे पाटील यांनी याबाबत नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.
नितेश राणेंनी जरांगेंना दिला होता इशारा
मनोज जरांगे यांनी एका सभेत बोलताना ह्याआयचं देवेंद्र फडणवीस असं विधान केलं होतं. यावर बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले होते की, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आईबद्दल ते अपशब्द वापरत असतील तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याचे सामर्थ्य आमच्यासारख्या 96 कुळी मराठ्यांमध्ये आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं.’ याला आता जरांगे पाटलांनी उत्तर दिले आहे.
जरांगे पाटलांचे उत्तर
आज पत्रकारांशी संवाद साधताना जरांगे पाटील म्हणाले की, नितेश राणे चुचुंद्री आहे काहीही म्हणतो, बरळतो. चुचुंद्री काहीही बोलती लगेच हागती आणि निघती. हा कसला 96 कुळी मराठा. तू 96 चा 9 काढून टाका 6 ठेव आणि मग रातभर चाट त्याला, फडणवीस ला. तू दादाचे अस्सल रक्त आहे ना मराठ्यांना सोडून असा का वागतोय, दादा आणि निलेश साहेब त्याला समजावून सांगा. तो नीट नाही राहिला तर त्याला लाल करतो. मी तुझ्या गुंडांच्या टोळ्या कोलतो. मी परिणामाचा विचार करणार नाही असंही जरांगे पाटलांनी म्हटलं आहे.
आरक्षणाबाबत काय म्हणाले?
आज माध्यमांच्या प्रतिनिधींनी जरांगे पाटलांना सरसकट मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्याच्या मागणीबाबत असलेला कायदेशीर पेच याबाबत प्रश्न विचारला. यावर बोलताना जरांगे पाटलांनी, ‘मराठा समाजाला आरक्षण देताना सरसकट हा शब्द तुम्ही लावूच नका. मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीची आज दोन वेळा बैठक झाली. याबाबत मला कल्पना नाही. सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारचा या शब्दाला काही आक्षेप असेल तर त्याला दुसरा पर्याय आहे. सरकारकडे 58 लाख कुणबी नोंदी आहेत. याच आधारावर मराठा आणि कुणबी एक आहे यावरच शासन निर्णय काढावा. तसेच ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहे किंवा ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या नाहीत त्यांची पोटजात, उपजात म्हणून आरक्षण द्या. आरक्षण देताना सरसकट शब्दच वापरू नका, असा नवा सल्ला सरकारला दिला आहे.
