AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तुमच्यामुळे माझी जात हरू नये, माझी तुम्हाला शेवटची विनंती’, मनोज जरांगे पाटलांचे आंदोलकांना आवाहन

मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. आज या आंदोलनाच्या विरोधात हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी याचिकाकर्त्यांनी आंदोलन नियम मोडत असल्याचे म्हटलं. आता मनोज जरांगे पांटलांनी आंदोलकांना नियम न मोडण्याची विनंती केली आहे.

'तुमच्यामुळे माझी जात हरू नये, माझी तुम्हाला शेवटची विनंती', मनोज जरांगे पाटलांचे आंदोलकांना आवाहन
jarange and protesters
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Sep 01, 2025 | 7:32 PM
Share

मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. आज या आंदोलनाचा चौथा दिवस आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी जरांगे पाटलांची मागणी आहे. आज या आंदोलनाच्या विरोधात हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी याचिकाकर्त्यांनी आंदोलन नियम मोडत असल्याचे म्हटलं. त्यामुळे कोर्टाने आंदोलकांना नियम पाळण्याची सूचना केली आहे. यानंतर आता मनोज जरांगे पांटलांनी आंदोलकांना नियम न मोडण्याची विनंती केली आहे. ते नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

आपल्याला न्यायालयाच्या आदेशाचे पालन करायचे आहे – जरांगे पाटील

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ‘आपल्याला न्यायालयाच्या आदेशाचे पालन करायचे आहे. आपल्याला शेजारी एक मैदान मोकळं करुन दिलं आहे. तिथे गाड्या लावा आणि मैदानावर झोपा. तुम्हाला आरक्षण पाहिजे नसेल तर तुम्ही गावाकडे जाऊ शकता. मला किती त्रास होत आहे हे तुम्हाला माहिती नाही. तुमच्या लेकराबाळांसाठी मी कष्ट सहन करत आहे. आरक्षण देऊन लेकरांच्या पिढ्यांचा उद्धार करायचा आहे. मला माझी जात मोठी करायची आहे.

तुम्ही शांत रहा एवढंच माझं म्हणणं आहे

पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मला त्रास होत आहे. मला तुमच्यासोबत बोलण्यासाठी पाणी प्यावे लागत आहे. माझी तुम्हाला शेवटची विनंती आहे, मुंबईकरांना त्रास देऊ नका. तुमच्यामुळे माझी जात हरू नये, माझी तुम्हाला शेवटची विनंती आहे. सर्वांनी मैदानात गाड्या लावा आणि झोपा, गावाकडून लोक जेवण पाठवत आहेत, त्यांना आपली काळजी आहे. आपल्याला न्यायालयाच्या नियमाचे पालन करायचे आहे. तुम्ही शांत रहा एवढंच माझं म्हणणं आहे, ज्याला ऐकायचं नाही त्यांनी गावाकडे जा असंही जरांगे पाटलांनी म्हटले आहे.

ओबीसी समाजाकडून आंदोलनाची घोषणा

आज छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी छगन भुजबळांनी आंदोलनाची घोषणा केली आहे. छगन भुजबळांनी म्हटलं की, ‘ते लोक काय करणार याबाबत आम्हाला काहीही कर्तव्य नाही. आपण आता तयारीला लागा, अनेक ठिकाणी उपोषणे सुरु करायची आहेत. तहसीलदारापासून कलेक्टरपर्यंत सगळीकडे मोर्चे काढा. त्यांना आमच्या ओबीसीच्या वाट्यामध्ये दुसरे वाटेकरी नकोत ही मागणी करा असा आदेश भुजबळांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी