उदय सामंतांची स्टेजवरच सही, शिवेंद्र राजेंचा शब्द अन् विखे पाटलांची शिष्टाई; मनोज जरांगे आंदोलन संपवणार?
मराठा उपसमितीच्या सदस्यांनी आज मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळी विखे पाटलांनी सरकारने तयार केलेला मसुदा जरांगे पाटलांना दाखवला. यावेळी शिवेंद्रराजेंनी सातारा गॅझेट लागू करण्याचा शब्द दिला आहे. यावेळी उदय सामंतांनी स्टेजवर सही केली.

मराठा उपसमितीच्या सदस्यांनी आज मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळी विखे पाटलांनी सरकारने तयार केलेला मसुदा जरांगे पाटलांना दाखवला. यावेळी शिवेंद्रराजेंनी सातारा गॅझेट लागू करण्याचा शब्द दिला आहे. यावेळी उदय सामंतांनी स्टेजवर सही केली. या समितीत राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव कोकाटे, शिवेंद्रराजे भोसले, उदय सामंत, गोरे यांचा समावेश होता.
यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की शिवेंद्रराजे सातारा संस्थानचा गॅझेटच्या अंमलबजावणीची जबाबदारी तुमच्यावर आहे. आमचा तुमच्यावर विश्वास आहे. राजे म्हटल्यावर आम्ही काही बघत नाही. ही जबाबदारी तुमची असं म्हटलं. यावर शिवेंद्रराजेंनी ही जबाबदारी माझी आहे. माझा शब्द आहे असं विधान केलं.
पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, तुम्हाला 15 दिवस हवेत. मी तुम्हाला महिना देतो. पण पश्चिम महाराष्ट्रातील माझ्या बांधवांचं नुकसान होऊ देऊ नका. आमचं गॅझेटिअर आहे. त्यामुळे आम्हाला मिळालं पाहिजे. एक महिन्याच्या आत सातारा गॅझेटचा प्रश्न निकाली लावा. शिंदे समितीला फक्त सातारा संस्थानच्या गॅझेटचं काम पाहायला लावा. यावेळी कागदावर स्टेजवर उदय सामंत यांनी सही केली.
मनोज जरांगे पाटलांनी या आंदोलनात बलिदान दिलेल्या व्यक्तींना तात्काळ मदत आणि नोकरी देण्याची मागणी केली होती. यावर सरकारने काय म्हटलं याची माहिती जरांगे पाटलांनी म्हटलं. जरांगे पाटील म्हणाले की, कुटुंबीयांच्या वारसांना 15 कोटींची मदत यापूर्वी दिली आहे. उर्वरीत कुटुंबीयांना एका आठवड्याच्या आत आर्थिक मदत खात्यावर येईल. नोकरी राज्य परिवहन मंडळात नोकरी देऊ असं सरकार म्हणालं. एखादा पोरगा खूप शिकलेला असेल तर ड्रायव्हर नाही होणार. शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी द्या. असून असून किती लोकं असतील. तेवढं केलं तरी बरं राहील. नाही तर हे केलं तरी चालेल. पण लवकर द्या. एमआयडीसीत द्या, महावितरणमध्ये द्या. उदय सामंत साहेब एमआयडीसी तुमच्या हातात आहे. कचाकचा सही करा. तुमच्या हातात आहे. कुठे तरी शाई विकत आणायची आहे.
