Manoj Jarange: मोठी अपडेट! मराठा आरक्षणाबाबत मोठं विधान करत बडा मंत्री शिर्डीहून मुंबईकडे तातडीने रवाना; घडामोडींना प्रचंड वेग

आता सरकारकडून मनोज जरांगेंच्या आंदोलनाला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे तातडीने शिर्डीवरून मुंबईकडे रवाना झाले आहेत.

Manoj Jarange: मोठी अपडेट! मराठा आरक्षणाबाबत मोठं विधान करत बडा मंत्री शिर्डीहून मुंबईकडे तातडीने रवाना; घडामोडींना प्रचंड वेग
Jarange and CM
| Updated on: Aug 29, 2025 | 4:23 PM

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरु केले आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आझाद मैदान सोडणार नाही अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे. अशातच आता सरकारकडूनही जरांगेंच्या आंदोलनाला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे तातडीने शिर्डीवरून मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे आता मोठा काही निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सरकार चर्चा करण्यासाठी तयार – विखे पाटील

मुंबईकडे रवाना होताना राधाकृष्ण विखे पाटलांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले की, ‘मराठा आंदोलन मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांच्याशी काही संपर्क होतो का यासाठी मी मुंबईला जात आहे. त्यांनी चर्चेची इच्छा व्यक्त केली आहे. सरकारही चर्चा करण्यासाठी तयार आहे. मुंबईत गेल्यानंतर याबाबत स्पष्ट निर्णय होईल.’

जरांगे पाटलांच्या मागण्यांना सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद

राधाकृष्ण विखे पाटलांनी पुढे बोलताना सांगितले की, ‘याबाबत माझी मुख्यमंत्री किंवा जरांगेसोबत चर्चा झालेली नाही. सद्यस्थितीला मी मुंबईत असायला हवं म्हणून मी जात आहे. आम्ही याआधीही त्यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता जरांगे पाटील हे मुंबईत पोहोचले आहेत. त्याच्याशी जर संपर्क झाला तर मी त्यांच्याशी याबाबत चर्चा करेल. त्यानंतर जरांगे पाटील काय भूमिका घेतात ते पाहूयात.

ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा धक्का लावणार नाही – विखे पाटील

सरसरकट ओबीसीतून आरक्षण द्यावं ही जरांगे पाटलांची मागणी आहे. हे शक्य आहे का? यावर बोलताना विखे पाटील म्हटले की, कायद्याच्या बऱ्याच चौकटी आहे. आपण याआधी 16 टक्के आणि नंतर 10 टक्के आरक्षण दिले आहे. मात्र फडणवीसांनी दिलेलं 16 टक्के आरक्षण महाविकास आघाडीने घालवलं आहे. त्यानंतर पुन्हा आरक्षण देण्यात आलं आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा धक्का लावायचा नाही अशी आमची भूमिका आहे असंही विखे पाटलांनी सांगितले आहे.