कुशल बद्रिकेने इशारा दिलेल्या ठाण्यातील ‘त्या’च जागी ट्रकने महिलेला उडवले

वाघबीळ ब्रीज या ठिकाणी एका चारचाकी मालवाहतूक गाडीचा आणि दुचाकीचा अपघात झाला. (Kushal Badrike Facebook Post on waghbil brigade)

कुशल बद्रिकेने इशारा दिलेल्या ठाण्यातील 'त्या'च जागी ट्रकने महिलेला उडवले
Follow us
| Updated on: Sep 12, 2020 | 4:37 PM

ठाणे : अभिनेता कुशल बद्रिके यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत वाघबीळ उड्डाणपुलाजवळ दिशादर्शक फलक लावण्याची विनंती केली होती. ही विनंती करुन 24 तास उलटत नाही, तोच घोडबंदरजवळील वाघबीळ उड्डाण पुलाजवळ अपघात झाला आहे. यात एका महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. कुशल बद्रिके यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात त्याने घोडबंदरजवळील वाघबीळ उड्डाण पुलाजवळ वारंवार अपघात होत असतात. यामुळे त्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावावा, अशी विनंती केली होती. मात्र या ठिकाणी घडणाऱ्या अपघातांची मालिका अद्याप कायम आहे. (Kushal Badrike Facebook Post on waghbil brigade)

वाघबीळ ब्रीज या ठिकाणी एका चारचाकी मालवाहतूक ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्या डोक्याला आणि हाता-पायाला मार लागला. या महिलेला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तसेच तिच्या सोबत असणाऱ्या व्यक्तीलाही दुखापत झाली. या अपघातामुळे वाघबीळ ब्रिज पुन्हा चर्चेत आला आहे.

या घटनेनंतर घटनास्थळी mmrd रिजन आणि भाजप आमदार संजय केळकर यांनी पाहणी केली. या पाहणीनंतर ठेकेदार आणि प्रशासनावर कारवाईचीही मागणी केली आहे.

तर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी msrdc, पालिका प्रशासन, पालिका विद्युत विभागाशी आणि कुशल बद्रिके यांच्याशी बोलणे केले. तसेच येत्या दहा दिवसात हे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

तसेच घटनास्थळी मनसेने सावधगिरीचा बोर्ड लावला आहे. यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच युवक काँग्रेसकडून देखील फलक आणि डिवायडर लावून केला प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

कुशल बद्रिकेची फेसबुक पोस्ट

अभिनेता कुशल बद्रिके याने काल रात्रीच्या सुमारास एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात त्याने ठाण्यातील घोडबंदर रोडजवळील वाघबीळ उड्डाणपुलाची दुर्दशा मांडली होती. घराच्या समोरच असलेल्या महामार्गावर जिथे उड्डाण पूल संपतो त्या ठिकाणाहून दुसऱ्या रस्त्यावर जाण्यासाठी अंधार असता. तसेच इथे कोणतेही दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे तिथे वारंवार अपघात होत असतात.

कुशलने आपल्या व्हिडिओत एका कंटनेरला अपघात झाल्याचंही दाखवलं आहे. एक कंटनेर हा डिव्हायडरवर जाऊन विजेच्या खांबाला धडकल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान होत असून प्रशासनाने याप्रकरणी काही तरी करावं, अशी मागणी त्याने व्हिडीओच्या माध्यमातून केली आहे.

मला या व्हिडीओतून कोणतीही नाराजी व्यक्ती करायची नाही. तसेच कोणत्याही राजकीय पक्षावर बोट ठेवायचे नाही. ही माझी कोणतीही स्टंटबाजी नाही. फक्त या ठिकाणी दररोज होणारे अपघातांचे प्रमाण आटोक्यात यावं. ते कुठे तरी थांबावे या भावनेतून हा व्हिडीओ केला आहे, असे त्याने या व्हिडीओच्या माध्यमातून म्हटलं आहे. (Kushal Badrike Facebook Post on waghbil brigade)

संबंधित बातम्या : 

Poonam Pandey | मॉडेल-अभिनेत्री पूनम पांडे ‘या’ दिग्दर्शकासोबत लग्नाच्या बेडीत

आम्ही सुरुवातीपासून काँग्रेसी, तरीही मोदी-शाहांचा पाठिंबा, कंगनाच्या आईकडून केंद्राचे आभार

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.