AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Marathi Sahitya Sammelan : तीन प्रांतांना जोडणारी ग्रंथदिंडी ठरणार आकर्षणाचे केंद्रबिंदू, संमेलनासाठी उदयगिरीचा मुलुख सज्ज

95 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची तयारी ही पूर्ण झाली असून संमेलनाच्या पुर्वसंध्येलाच कार्यक्रमांची रेलचल सुरु झाली आहे. प्रथमच लातूर जिल्ह्यामध्ये संमेलन पार पडत असून त्यापेक्षा या संमेलन हे तीन राज्याच्या सीमावर्ती भागात होत असल्याने अगळेवेगळे ठरणार आहे. संमेलनासाठी येणाऱ्या सारस्वतांच्या स्वागतासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणाचा सीमाप्रांतही सज्ज झाला आहे. संमेलन जरी लातूर जिल्ह्यात पार पडत असले तरी याला कर्नाटक, तेलंगणा येथील संस्कृतीची किनार राहणार आहे.

Marathi Sahitya Sammelan : तीन प्रांतांना जोडणारी ग्रंथदिंडी ठरणार आकर्षणाचे केंद्रबिंदू, संमेलनासाठी उदयगिरीचा मुलुख सज्ज
लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे होत असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Apr 21, 2022 | 2:28 PM
Share

उदगीर : 95 व्या अखिल भारतीय (Marathi Sahitya Sammelan) मराठी साहित्य संमेलनाची तयारी ही पूर्ण झाली असून संमेलनाच्या पुर्वसंध्येलाच कार्यक्रमांची रेलचल सुरु झाली आहे. प्रथमच (Latur District) लातूर जिल्ह्यामधील (Udgir) उदगीर येथे संमेलन पार पडत असून त्यापेक्षा या संमेलन हे तीन राज्याच्या सीमावर्ती भागात होत असल्याने अगळेवेगळे ठरणार आहे. संमेलनासाठी येणाऱ्या सारस्वतांच्या स्वागतासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणाचा सीमाप्रांतही सज्ज झाला आहे. संमेलन जरी लातूर जिल्ह्यात पार पडत असले तरी याला कर्नाटक, तेलंगणा येथील संस्कृतीची किनार राहणार आहे. शिवाय तीन प्रातांना जोडणारी ग्रंथदिंडी संमेलनाच्या पहिल्या दिवशी निघणार आहे. त्यामुळे संमेलनातील भरगच्च कार्यक्रमाची मेजवाणी तर राहणार आहेच पण सीमावर्ती भागामुळे वेगळेपण आले आहे.

उदयगिरीच्या 36 एकरांमध्ये व्यासपीठे अन् विविध दालने

उदगीर हे ऐतिहासिक शहर असून या संमेलनामुळे ते एका इतिहासाचे साक्षीदारही होणार आहे. येथील उदयगिरी महाविद्यालयाच्या लगतच्या भागातील 36 एकरामध्ये व्यासपीठांसह विविध दालने ही उभारण्यात आली आहेत. साहित्यनगरीचे प्रवेशद्वार हे उदगीर किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या प्रतिकृतीने बनवण्यात आले आहे तर या संमेलनाला भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे नाव देण्यात आले आहे. मुख्य मंडपाला छत्रपती शाहू महाराज सभागृह तर व्यासपीठाला उदयगिरी महाविद्यलयाचे प्राचार्य डॉ. ना.य.डोळे व्यासपीठ असे नाव देण्यात आले आहे.

ग्रंथदिंडीचे असे हे वेगळेपण

उदगीर हे तीन राज्याच्या सीमावर्ती भागात वसलेले शहर आहे. तीन्ही राज्याच्या संस्कृतीचा या शहरावर प्रभाव आहे. त्यामुळे ग्रंथदिंडी तीन वैशिष्ट्यांच्या पालखीतून मिरवली जाणार आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या सीमांना एकसंघ कारणाऱ्या या दिंडीचे नेतृत्व हे महिला करणार आहेत. तर कर्नाटकातील गुगल नृत्य प्रकारनुसार नृत्य करीत देवतेची पूजा केली जाणार आहे. तर मराठी भाषेच्या नवरसांची समृद्धी दर्शवणारी नवरंगदिंडी हे ग्रंथदिंडीचे तिसरे वैशिष्ट राहणार आहे. यामध्ये 500 विद्यार्थी हे 9 रंगाच्या टोप्या घालून सहभागी होणार आहेत.

स्वागतध्यक्षांचे काय आहे आवाहन?

अखिल भारतीय संमेलन हे उदगीर नगरीत पार पडत असून ही अभिमनाची बाब आहे. याची इतिहासात नोंद होणार असून साहित्यिकांच्या स्वागतासाठी ही नगरी सज्ज झाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून अनेकांचे हात या संमेलनासाठी राबत आहेत. त्यामुळे रसिकांनी संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन संमेलनाचे स्वागतध्यक्ष तथा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले आहे.

इतर बातम्या :

Vidrohi Sahitya Sammelan : विद्रोही साहित्य संमेलनाचे पडघम जोरात; सुफी विचारवंत सरवर चिश्ती यांच्या हस्ते उदघाटन, समारोपाला नागराज मंजुळे

Marathi Sahitya Sammelan: ‘उद्घाटक म्हणून स्वागत पण भोंग्यावरही बोला’ ‘आप’ने शरद पवार यांना लिहलेल्या पत्रात दडलंय काय?

Sugarcane : ऊस तोडणीसाठी आता परराज्यातील यंत्रे, महिन्याभरात लागणार अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.