औरंगाबाद : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरुच होता. मात्र, सोमवारी रात्री मराठवाड्यातील अनेक भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे सोयाबीन, ऊसाचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेती पिकांसह जमीन खरवडून गेल्यानं शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढावलं आहे. आधीच पाचवीला पुजलेला दुष्काळ आणि आता अतिवृष्टी यामुळे मराठवाड्यातील शेतकरी पुरता खचला आहे. नदीला पूर आल्यानं अनेक भागात घरात पाणी शिरल्याचं चित्रही पाहायला मिळालं. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यामुळे पंचनाम्याचा फक्त सोपस्कार पार न पाडता सरसकट मदत देण्याची मागणी मराठवाड्याती शेतकरी आणि लोकप्रतिनिधी करत आहेत. (Marathwada Heavy Rain loss of agriculture and Crop in Marathwada all districts)