AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगेंना मस्साजोगच्या ग्रामस्थांचा धक्का? घेतला मोठा निर्णय!

मोठी बातमी समोर येत आहे, आज भाजपा आमदार सुरेश धस हे मस्साजोगच्या दौऱ्यावर होते. या भेटीनंतर त्यांनी मोठा दावा केला आहे. हा मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मनोज जरांगेंना मस्साजोगच्या ग्रामस्थांचा धक्का? घेतला मोठा निर्णय!
| Updated on: Feb 22, 2025 | 4:07 PM
Share

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात सुरुवातीपासूनच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली. मात्र त्यानंतर सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीची बातमी समोर आली. या भेटीवरून मनोज जरांगे पाटील यांनी सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता.

त्यानंतर आता सुरेश धस यांनी आज मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची तसेच तेथील ग्रामस्थांनी भेट घेतली. आपल्या भेटीनंतर त्यांनी मोठा दावा केला आहे. मस्साजोग येथील ग्रामस्थांनी आपल्याला पाठिंबा दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील हे सुरेश धस यांच्यावर टीका करत असताना, दुसरीकडे धस यांच्या दाव्यानुसार मस्साजोगच्या ग्रामस्थांनी धस यांना दिलेला पाठिंबा हा मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी मोठा धक्का असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया? 

धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांची भेट झाल्यानंतर तुम्ही टीका केली होती, मात्र ग्रामस्थांनी धस यांना पाठिंबा जाहीर केला आहे, असा प्रश्न यावेळी जरांगे पाटील यांना विचारण्यात आला. यावर त्यांची प्रतिक्रिया आता समोर आली आहे.

‘त्या विषयात मला काही बोलायचं नाही, तो विषय माझ्यासाठी संपला आहे. मी एवढा जीव लावला होता, समाजाने देखील तळ हातावर घेतलं होतं, एवढ्या क्रूर माणसाला जाऊन भेटण्याची काहीच गरज नव्हती.  तुमच्यावर पक्षाचा दबाव होता ना, तर तुम्ही सरळ सांगायला पाहिजे होतं, मी समाजाची गद्दारी करू शकत नाही. माझ्यावर पक्षाचा दबाव आहे असं आमदार धस यांनी म्हणायला पाहिजे होतं. मी माझ्या समाजासाठी पक्ष आणि आमदारकीचा राजीनामा देतो, मात्र मी धनंजय मुंडे यांना भेटू शकत नाही, असं धस यांनी सरळ सांगायला पाहिजे होतं, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Follow Us
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत